टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियाचा डाव

कप्तान आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने फिंचला पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी संघाला आधार दिला. सहा षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ५२ धावा केल्या. पुढच्याच षटकात फिरकीपटू शादाब खानने पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले. त्याने मार्शला झेलबाद करत भागीदारी मोडली. माशने ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या. मार्शनंतर ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. दुसऱ्या बाजूला वॉर्नर झुंज देत होता. पण शादाब खानने ११व्या षटकात गोलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला यष्टीपाठी झेलबाद केले. वॉर्नरनचे अर्धशतक हुकले. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. या पडझडीनंतर मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी धावफलक हलता ठेवला. सुरुवातीला स्टॉइनिस फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून १९वे षटक आफ्रिदीने टाकले. या षटकात हसन अलीने वेडचा झेल सोडला. पुढच्या तीन चेंडूवर वेडने लागोपाठ तीन षटकार ठोकत सामना आपल्या नावावर केला. या षटकात आफ्रिदीने २२ धावा खर्च केल्या. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ तर स्टॉइनिसने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा ठोकल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने २६ धावांत ४ बळी घेतले.

हेही वाचा – T20 WC: पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले…

पाकिस्तानचा डाव

कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत पाकिस्तानला उत्तम सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी सातव्या षटकात पाकिस्तानने अर्धशतक फलकावर लावले. बाबरने आक्रमक तर रिझवानने संयमी पवित्रा धारण करत धावफलक हलता ठेवला. १०व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने बाबरला झेलबाद केले. बाबरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बाबर-रिझवान यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावा केल्या. बाबरनंतर फखर झमान मैदानात आला. स्पर्धेत चांगल्या फॉर्मात नसलेल्या जमानला आज सूर गवसला. त्याने रिझवानसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. १४व्या षटकात ऱिझवानने संघाचे शतक आणि आपले अर्धशतर फलकावर लावले. रिझवानचे हे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठकले. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा रिझवान पहिला क्रिकेटपटू ठरला. १८व्या षटकात रिझवान स्टार्कचा बळी ठरला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने आसिफ अली आणि शोएब मलिकला स्वस्तात गमावले. शेवटच्या षटकात जमानने स्टार्कला लागोपाठ दोन उत्तुंग षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. या षटकात पाकिस्तानने १५ धावा वसूल केल्या. २० षटकात पाकिस्तानने ४ बाद १७६ धावा केल्या. जमानने ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.

Live Updates
23:15 (IST) 11 Nov 2021
ऑस्ट्रेलिया विजयी

पाकिस्तानकडून १९वे षटक आफ्रिदीने टाकले. या षटकात हसन अलीने वेडचा झेल सोडला. पुढच्या तीन चेंडूवर वेडने लागोपाठ तीन षटकार ठोकत सामना आपल्या नावावर केला. या षटकात आफ्रिदीने २२ धावा खर्च केल्या. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ तर स्टॉइनिसने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा ठोकल्या.

23:03 (IST) 11 Nov 2021
१८ षटकात ऑस्ट्रेलिया

पाकिस्तानकडून १८वे षटक हसन अलीने टाकले. या षटकात ऑस्ट्रेलियाने १५ धावा वसूल केल्या. याच षटकात वेड-स्टॉइनिसने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १८ षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद १५५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला आता १२ चेंडूत २२ धावांची गरज आहे.

22:58 (IST) 11 Nov 2021
सामना रंगतदार स्थितीत

पाकिस्तानकडून १७वे षटक हॅरिस रौफने टाकले. स्टॉइनिसने झुंज देत पहिल्या दोन चेंडूवर १० धावा वसूल केल्या. १७ षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद १४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला आता १८ चेंडूत ३७ धावांची गरज आहे.

22:51 (IST) 11 Nov 2021
१६ षटकात ऑस्ट्रेलिया

१६ षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद १२७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला आता २४ चेंडूत ५० धावांची गरज आहे.

22:47 (IST) 11 Nov 2021
शादाब खानची जबरदस्त कामगिरी

शादाब खान!

22:45 (IST) 11 Nov 2021
१५ षटकात ऑस्ट्रेलिया

१५ षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद ११५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला आता ३० चेंडूत ६२ धावांची गरज आहे.

22:40 (IST) 11 Nov 2021
१४ षटकात ऑस्ट्रेलिया

१४ षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद १०९ धावा केल्या.

22:37 (IST) 11 Nov 2021
नक्की वाचा!

T20 WC : गजबच..! पाकिस्तानच्या गोलंदाजानं टाकला दोन टप्पा चेंडू; स्ट्राईकवर असलेल्या वॉर्नरनं दिली ‘अशी’ शिक्षा; पाहा VIDEO

22:35 (IST) 11 Nov 2021
शादाब खानचा चौकार!

शादाबने १३व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलला झेलबाद करत आपला चौथा बळी घेतला. मॅक्सवेलला ७ धावा करता आल्या. त्याच्यानंतर मॅथ्यू वेड मैदानात आला आहे. याच षटकात स्टॉइनिसने षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे शतक पूर्ण केले. १३ षटकात ऑस्ट्रेलियाने ५ बाद १०३ धावा केल्या.

22:30 (IST) 11 Nov 2021
१२ षटकात ऑस्ट्रेलिया

१२ षटकात ऑस्ट्रेलियाने ४ बाद ९५ धावा केल्या.

22:26 (IST) 11 Nov 2021
रिझवान दमदार!

T20 WC: मोहम्मद रिझवानकडून धावांचा पाऊस; कँलेंडर वर्षात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू!

22:26 (IST) 11 Nov 2021
नक्की वाचा!

T20 WC PAK vs AUS : बाप रे बाप..! पाकिस्तानच्या फलंदाजाचा जोरदार फटका अन् अंपायर कोसळला जमिनीवर; पाहा VIDEO

22:26 (IST) 11 Nov 2021
११ षटकात ऑस्ट्रेलिया

११ षटकात ऑस्ट्रेलियाने ४ बाद ९२ धावा केल्या.

22:23 (IST) 11 Nov 2021
ऑस्ट्रेलियाला ‘जबर’ धक्का

फिरकीपटू शादाब खानने ११व्या षटकात गोलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला यष्टीपाठी झेलबाद केले. वॉर्नरनचे अर्धशतक हुकले. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. वॉर्नरनंतर मार्कस स्टॉइनिस मैदानात आला आहे. वॉर्नर हा शादाबचा तिसरा बळी ठरला.

22:17 (IST) 11 Nov 2021
१० षटकात ऑस्ट्रेलिया

१० षटकात ऑस्ट्रेलियाने ३ बाद ८९ धावा केल्या. वॉर्नर ४९ धावांवर नाबाद आहे.

22:13 (IST) 11 Nov 2021
स्मिथ माघारी

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्मिथ (३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. नवव्या षटकात त्याला शादाबने तंबूचा मार्ग दाखवला. ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला आहे. नऊ षटकात ऑस्ट्रेलियाने ३ बाद ८० धावा केल्या.

22:09 (IST) 11 Nov 2021
आठ षटकात ऑस्ट्रेलिया

पाकिस्तानचा अनुभवी फिरकीपटू मोहम्मद हफीजने आठवे षटक टाकले. पहिलाच चेंडू त्याने दोन टप्पा टाकला. या चेंडूवर वॉर्नरने खणखणीत षटकार ठोकला. पंचानी हा चेंडू नो बॉल ठरवला. आठ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद ७० धावा केल्या.

22:02 (IST) 11 Nov 2021
सात षटकात ऑस्ट्रेलिया

सात षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद ५७ धावा केल्या.

22:00 (IST) 11 Nov 2021
मार्श माघारी

फिरकीपटू शादाब खानने पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले. त्याने मार्शला झेलबाद करत भागीदारी मोडली. माशने ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या. मार्शनंतर स्टीव्ह स्मिथ मैदानात आला आहे.

21:57 (IST) 11 Nov 2021
पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलिया

पॉवरप्लेचे शेवटचे षटक वेगवान गोलंदाज हसन अलीने टाकले. या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. सहा षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ५२ धावा केल्या.

21:52 (IST) 11 Nov 2021
पाच षटकात ऑस्ट्रेलिया

पाचवे षटक वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने टाकले. पहिल्याच चेंडूवर मार्शने त्याला षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. पाच षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ४४ धावा केल्या.

21:48 (IST) 11 Nov 2021
चार षटकात ऑस्ट्रेलिया

चौथ्या षटकात वॉर्नरने इमाद वसीमला एक षटकार आणि दोन चौकार ठोकले. चार षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ३० धावा केल्या.

21:44 (IST) 11 Nov 2021
तीन षटकात ऑस्ट्रेलिया

तीन षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद १४ धावा केल्या. या षटकात मार्शने आफ्रिदीला एक चौकार ठोकला.

21:37 (IST) 11 Nov 2021
दोन षटकात ऑस्ट्रेलिया

फिंचनंतर मिचेल मार्श मैदानात आला आहे. दोन षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ६ धावा केल्या.

21:30 (IST) 11 Nov 2021
ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात, पण..

कप्तान आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने फिंचला पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडले.

21:16 (IST) 11 Nov 2021
पाकिस्तानचे ऑस्ट्रेलियाला १७७ धावांचे आव्हान

२०वे षटक स्टार्कने टाकले. या षटकात पाकिस्तानने अनुभवी शोएब मलिकला (१) गमावले. त्यानंतर जमानने स्टार्कला लागोपाठ दोन उत्तुंग षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. या षटकात पाकिस्तानने १५ धावा वसूल केल्या. २० षटकात पाकिस्तानने ४ बाद १७६ धावा केल्या. जमानने ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.

21:05 (IST) 11 Nov 2021
फिनिशर आसिफ अलीला शून्यावर बाद

१९व्या षटकात कमिन्सने फिनिशर आसिफ अलीला शून्यावर बाद करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. अलीनंतर शोएब मलिक मैदानावर आला आहे. पुढच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने आक्रमक जमानचा सोपा झेल सोडला. १९ षटकात पाकिस्तानने ३ बाद १६१ धावा केल्या.

21:01 (IST) 11 Nov 2021
रिझवान माघारी

१८वे षटक स्टार्कने टाकले. या षटकात रिझवान झेलबाद झाला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. रिझवाननंतर आसिफ अली मैदानात आला आहे. १८ षटकात पाकिस्तानने २ बाद १५७ धावा केल्या.

20:55 (IST) 11 Nov 2021
१७ षटकात पाकिस्तान

१७वे षटक हेझलवूडने टाकले. या षटकात जमानने आणि रिझवानने प्रत्येकी एक षटकार ठोकला. या षटकात पाकिस्तानने धावा कुटल्या. १७ षटकात पाकिस्तानने १ बाद १४३ धावा केल्या.

20:48 (IST) 11 Nov 2021
१६ षटकात पाकिस्तान

१६ षटकात पाकिस्तानने १ बाद १२२ धावा केल्या.