टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑस्ट्रेलियाचा डाव
कप्तान आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने फिंचला पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी संघाला आधार दिला. सहा षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ५२ धावा केल्या. पुढच्याच षटकात फिरकीपटू शादाब खानने पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले. त्याने मार्शला झेलबाद करत भागीदारी मोडली. माशने ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या. मार्शनंतर ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. दुसऱ्या बाजूला वॉर्नर झुंज देत होता. पण शादाब खानने ११व्या षटकात गोलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला यष्टीपाठी झेलबाद केले. वॉर्नरनचे अर्धशतक हुकले. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. या पडझडीनंतर मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी धावफलक हलता ठेवला. सुरुवातीला स्टॉइनिस फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून १९वे षटक आफ्रिदीने टाकले. या षटकात हसन अलीने वेडचा झेल सोडला. पुढच्या तीन चेंडूवर वेडने लागोपाठ तीन षटकार ठोकत सामना आपल्या नावावर केला. या षटकात आफ्रिदीने २२ धावा खर्च केल्या. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ तर स्टॉइनिसने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा ठोकल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने २६ धावांत ४ बळी घेतले.
हेही वाचा – T20 WC: पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले…
पाकिस्तानचा डाव
कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत पाकिस्तानला उत्तम सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी सातव्या षटकात पाकिस्तानने अर्धशतक फलकावर लावले. बाबरने आक्रमक तर रिझवानने संयमी पवित्रा धारण करत धावफलक हलता ठेवला. १०व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने बाबरला झेलबाद केले. बाबरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बाबर-रिझवान यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावा केल्या. बाबरनंतर फखर झमान मैदानात आला. स्पर्धेत चांगल्या फॉर्मात नसलेल्या जमानला आज सूर गवसला. त्याने रिझवानसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. १४व्या षटकात ऱिझवानने संघाचे शतक आणि आपले अर्धशतर फलकावर लावले. रिझवानचे हे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठकले. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा रिझवान पहिला क्रिकेटपटू ठरला. १८व्या षटकात रिझवान स्टार्कचा बळी ठरला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने आसिफ अली आणि शोएब मलिकला स्वस्तात गमावले. शेवटच्या षटकात जमानने स्टार्कला लागोपाठ दोन उत्तुंग षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. या षटकात पाकिस्तानने १५ धावा वसूल केल्या. २० षटकात पाकिस्तानने ४ बाद १७६ धावा केल्या. जमानने ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.
१५ षटकात पाकिस्तानने १ बाद ११७ धावा केल्या.
१४व्या षटकात ऱिझवानने संघाचे शतक आणि आपले अर्धशतर फलकावर लावले. १४ षटकात पाकिस्तानने १ बाद १०६ धावा केल्या. रिझवानचे हे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठकले. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा रिझवान पहिला क्रिकेटपटू ठरला.
Another sensational knock from Mohammad Rizwan ?#T20WorldCup | #PAKvAUS | https://t.co/W7izrV7PAI pic.twitter.com/CW63heIp6t
— T20 World Cup (@T20WorldCup) November 11, 2021
१३ षटकात पाकिस्तानने १ बाद ९२ धावा केल्या.
१२ षटकात पाकिस्तानने १ बाद ८९ धावा केल्या. या षटकात रिझवानने झम्पाला षटकार खेचला.
११ षटकात पाकिस्तानने १ बाद ७५ धावा केल्या.
१०वे षटक झम्पाने टाकले. या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. कप्तान बाबर आझम मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. बाबरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बाबर-रिझवान यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावा केल्या. बाबरनंतर फखर झमान मैदानात आला आहे. १० षटकात पाकिस्तानने बिनबाद ७१ धावा केल्या.
Zampa strikes ?

Pakistan lose their first wicket and it's the big one of Babar Azam, who is gone for 39. #T20WorldCup | #PAKvAUS | https://t.co/W7izrV7PAI pic.twitter.com/GePh85gs8M
नववे षटक मॅक्सवेलने टाकले. नऊ षटकात पाकिस्तानने बिनबाद ६८ धावा केल्या.
आठ षटकात पाकिस्तानने बिनबाद ६२ धावा केल्या.
सातव्या षटकात फिरकीपटू अॅडम झम्पा गोलंदाजीला आला. त्याच्या षटकात पाकिस्तानने अर्धशतकी पल्ला ओलांडला. सात षटकात पाकिस्तानने बिनबाद ५१ धावा केल्या.
कमिन्सने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात बाबर-रिझवानने ९ धावा काढल्या. सहा षटकात पाकिस्तानने बिनबाद ४७ धावा केल्या.
A ? start from Pakistan in Dubai!

At the end of the Powerplay, they are 47/0.#T20WorldCup | #PAKvAUS | https://t.co/W7izrV7PAI pic.twitter.com/z4UzlXsr98
वेगवान गोलंदाज हेझलवूडने पाचवे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिझवानने सुंदर षटकार ठोकला. पाच षटकात पाकिस्तानने बिनबाद ३८ धावा केल्या.
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने चौथे षटक टाकले. या षटकात बाबरने एक चौकार ठोकला. चार षटकात पाकिस्तानने बिनबाद २९ धावा केल्या.
तिसरे षटक फिंचने फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलला दिले. तीन षटकात पाकिस्तानने बिनबाद २१ धावा केल्या.
दुसरे षटक जोश हेझलवूडने टाकले. दोन षटकात पाकिस्तानने बिनबाद ११ धावा केल्या.
स्टार्कच्या पहिल्या षटकात बाबरने एक चौकार ठोकला. पहिल्या षटकात पाकिस्तानने बिनबाद ६ धावा केल्या.
पाकिस्तानचा कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे पाकिस्तानचे सलामीवीर मैदानात आले आहेत. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक टाकत आहे.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
ऑस्ट्रेलिया – आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
आजच्या सामन्यात फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Toss news from Dubai ?

Australia have won the toss and elected to field.
Who are you backing in this one? #T20WorldCup | #PAKvAUS | https://t.co/W7izrV7PAI pic.twitter.com/S7FwrBCdRg
या मैदानावर आतापर्यंत एकूण ७२ टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ सामने जिंकले आहेत, तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ३७ सामने जिंकले आहेत. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४१ आणि दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १२३ आहे.
सामन्यादरम्यान दुबईचे हवामान सामान्य असेल. तापमान ३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रात्री तापमानात काही प्रमाणात घट दिसून येते. आर्द्रता ४५ ते ५५ अंशांच्या आसपास असेल.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. येथे दव हा एक मोठा घटक आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा फायदा होतो. मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना फिरकीपटूंना मदत मिळाली, तर वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकतात. या मैदानावर नाणेफेक हा महत्त्वाचा घटक आहे.
रंगतदार सामन्याची आशा…
Expect ????????? ?#T20WorldCup pic.twitter.com/pEh8sSFois

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान पाकिस्तानचे वर्चस्व दिसून आले. पाकिस्तानने १३ सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियन संघ ९ वेळा जिंकला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांपैकी तीन वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आणि दोनदा ऑस्ट्रेलियाने विजयाची चव चाखली. दुबईच्या मैदानावर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-२० सामने झाले, ज्यात बाबर आझमच्या संघाने तीन सामने जिंकले. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ६ सामने खेळले गेले आहेत आणि दोन्ही संघांना प्रत्येकी तीन वेळा यश मिळाले आहे.

२०१० च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत माईक हसीच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला.या खेळीमुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यत्तुरात ऑस्ट्रेलियाचा संघ एका वेळी १७.१ षटकांत ७ विकेट्स गमावून १४४ धावांवर संघर्ष करत होता. शेवटच्या १७ चेंडूत संघाला विजयासाठी ४८ धावांची गरज होती. माइक हसीने २४ चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.