Sehar Shinwari offered Bangladesh a fish dinner date to beat India: शनिवारी (१४ ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने पाकिस्तानचा ७ विकेटने पराभव केला होता. या पराभवानंतर अभिनेत्री सेहेर शिनवारीसह पाकिस्तानी बरेच निराश झाले. आता भारतीय संघाला हरवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडिया गुरूवारी, १९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील चौथा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशच्या खेळाडूंना एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून ऑफर दिली आहे. ती म्हणाली, जर बांगलादेशचा संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला, तर मी ढाक्याला जाईन आणि बंगाली खेळाडंसोबत ‘फिश डिनर डेट’ करेन.

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने एक्सवर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमचे बंगाली बंधू (बांगलादेश संघ) पुढच्या सामन्यात आमचा बदला घेईल. जर बांगलादेशने भारतीय संघाला हरवले, तर मी बंगाली खेळाडूंसोबत फिश डिनर डेटवर जाईन.” सहार अनेकदा तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने अफगाणिस्तानसाठी एक पोस्ट देखील केली आणि लिहिले की, ती अफगाणिस्तान संघाने विश्वचषक जिंकावा यासाठी प्रार्थना करत आहे.

हेही वाचा – NZ vs AFG, World Cup 2023: न्यूझीलंडने अफगाणिस्तानसमोर ठेवले २८९ धावांचे लक्ष्य, लॅथम-फिलिप्स यांची शानदार खेळी

कोण आहे सेहर शिनवारी?

जर आपण तिचा एक्स-बायो पाहिला तर, सेहर ही पाकिस्तानमधील अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. ती कराचीची रहिवासी आहे. ती अनेकदा राजकीय आणि राष्ट्रीय विषयांवर सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबतही तिने अनेक पोस्ट्स केल्या आहेत. तिच्या बहुतांश पोस्ट्सही भारतविरोधी आहेत.

हेही वाचा – IND vs PAK: पीसीबीने आयसीसीकडे भारताची तक्रार केल्याने संतापला दानिश कनेरिया; म्हणाला, “इतरांमध्ये दोष शोधणे…”

टीम इंडियाने केली आहे विजयाची हॅट्ट्रिक –

टीम इंडियाने विश्वचषकातील पहिले तीनही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. चेन्नईत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. आता भारतीय संघाची नजर बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actress sehar shinwari offered bangladesh a fish dinner date to beat india in world cup 2023 vbm