चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत, पण दीर्घकाळापासून या दोन क्षेत्रांमध्ये खूप घनिष्ठ नाते आहे. क्रिकेटपटू आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यांच्याबाबत तर नेहमी चर्चा रंगत असतात. अनेक क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा असतात. तर विराट-अनुष्का सारख्या जोड्या या नाते पूर्णत्वास नेतात. पण सध्या पाकिस्तानची अभिनेत्री आणि न्यूझीलंडचा क्रिकेटपटू यांच्याबाबत एक वेगळीच चर्चा रंगत आहे.
न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे न्यूझीलंडचा जिमी नीशम चर्चेत आला होता. तो सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला होता. त्यामुळे नीशमने युवा खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे वळू नये असे ट्विट केले होते. त्यामुळे त्याच्या ट्विटची चर्चा झाली होती. पण आता त्याला एका पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्विटरवर थेट प्रपोझ केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने नीशमला ट्विटरवर थेट प्रपोझ केले आहे. हे प्रपोझदेखील “माझा जोडीदार होशील का?” किंवा “माझ्याशी लग्न करशील का?” असे न विचारता “तू माझ्या मुलांचा बाबा होशील का?” असा सवाल केला.
Jimmy would you like to be daddy of my future kids
— Sehar Shinwari (@SeharShinwari) August 28, 2019
तिने केलेल्या या भन्नाट प्रपोझची चर्चा होत असतानाच नीशमने तिला तितक्याच भन्नाट पद्धतीने उत्तर दिले. तु विचारलेल्या प्रश्नाच्या शेवटी इमोजीची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया नीशमने दिली. त्याच्या या उत्तराने एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
I really feel like the emojis were unnecessary https://t.co/tH3g0jCWe4
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) August 28, 2019
दरम्यान, नीशमच्या या प्रतिक्रियेवर तिने पुन्हा ट्विट केले. “नीशमने माझ्या प्रपोझच्या ट्विटला रिप्लाय दिल्यापासून भारतात मिरच्यांचा पाऊस पडला आहे. तू तिच्यापासून दूर रहा, ती दहशतवाद्यांच्या देशातील आहे असे सगळे त्याला सांगत आहेत, जसं काय तो माझ्याशी खरंच लग्न करायला तयार झाला आहे”, असेही ती म्हणाली.
Jimmy Neesham ne merey marriage propsal waley tweet ka reply kya diya India mein to jaisey kisi ne mirchyon ki barsaat kardi. Jimmy ko bata rahey k is se door raho yeh terrorist country ki hai jaisey jimmy sach mein mujh se shadi karney k liye tayara hogaya ho #BurnolForIndia
— Sehar Shinwari (@SeharShinwari) August 28, 2019
दरम्यान, तिच्या या ट्विटनंतरही तिला ट्रोल करण्यात येत आहे.