Zainab Abbas, World Cup 2023: भारतात विश्वचषक २०२३ ही वर्ल्डकपची ११वी आवृत्ती खेळवली जात असून ५ ऑक्टोबरपासून याला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाव्यतिरिक्त समालोचक, क्रिकेट तज्ञ, चाहते आणि अँकर देखील भारताला भेट देत आहेत. पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानची अँकर झैनाब अब्बास भारतातील २०२३चा वर्ल्ड कप मध्येच सोडून मायदेशी परतली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिला भारत सोडण्यास सांगण्यात आले कारण तिने भारत आणि हिंदू धर्मावर टीका केली होती, ज्यामध्ये ती हिंदू धर्माबद्दल वाईट बोलत होती.
पाकिस्तानची स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि अँकर झैनाब अब्बास यांना वर्ल्ड कपच्या मध्यावर भारत सोडावा लागला. मात्र, झैनाब अब्बासचा वादांशी दीर्घकाळ संबंध आहे. जैनब अब्बास तिच्या हिंदुविरोधी पोस्ट आणि ट्वीटमुळे अनेकदा वादात सापडली आहे. मात्र, आता झैनब अब्बासला भारत सोडावा लागला आहे. त्यानंतर जैनब अब्बास भारतातून दुबईला गेली आहे. सोशल मीडियावर झैनब अब्बासचे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये ती सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्मासाठी अपशब्द वापरताना दिसत आहे.
झैनाब अब्बास भारतातून दुबईला पोहोचली…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनीत जिंदाल नावाच्या एका भारतीय वकिलाने बीसीसीआयच्या सहकार्याने झैनाब अब्बास विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा दोष झैनाब अब्बासवर पडला आहे. त्याचवेळी आता समा वृत्तवाहिनीने पाकिस्तानकडून ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये झैनाब अब्बास भारतातून दुबईला पोहोचल्याचे लिहिले आहे. भारतातील सुरक्षेबाबत झैनाब अब्बास अस्वस्थ असल्याचेही यात म्हटले आहे.
झैनाब अब्बासने वादग्रस्त ट्वीटमध्ये काय लिहिले?
झैनाब अब्बास यांनी आपल्या ट्वीटमध्ये भारत आणि हिंदू देवतांचा अपमान केला होता. झैनाब अब्बास आयसीसी ब्रॉडकास्ट टीमचा भाग होती. ती पाकिस्तान-नेदरलँड सामन्यादरम्यान दिसली होती. आयसीसी झैनाब अब्बासची इच्छा असूनही मदत करू शकणार नाही, कारण हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमधील आहे, असे बोलले जात आहे. दोन्ही देशांच्या प्रश्नांवर आयसीसी काहीही करू शकत नाही.
झैनाब ही मेकअप आर्टिस्ट आहे
झैनाब बऱ्याच काळापासून क्रिकेटचे अँकरिंग करत आहे आणि अनेक मोठ्या टूर्नामेंटमध्ये दिसली आहे. ती एका मुलाची आई आहे, पण क्रिकेटला खूप समर्पित आहे. झैनाब एक क्रिकेट अँकर असण्याबरोबरच मेकअप आर्टिस्ट देखील आहे. त्याचे वडील नासिर अब्बास हे क्रिकेटपटू राहिले आहेत. झैनाबचे पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये चाहते आहेत.