PAK vs NZ Match Today: अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर विश्वचषक २०२३ हा आयसीसीऐवजी “बीसीसीआय इव्हेंट” असल्याचे पाकिस्तानी टीम डिरेक्टरनी म्हटले होते. त्यानंतर आता शुक्रवारी मिकी आर्थर यांनी आणखीन एका अशाच विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता ‘करा किंवा मरा’ची स्थिती समोर उभी ठाकली आहे. तत्पूर्वी, भारतातील अति कठोर सुरक्षा योजना व पाकिस्तानच्या संघाला हॉटेलच्या खोल्यांमध्ये बंद करून ठेवल्याने पाकिस्तान भारतात चांगली कामगिरी करू शकत नसल्याचं आर्थर यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानी टीम डिरेक्टर मिकी आर्थरनी पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर भारतातील कठोर नियमांना जबाबदार धरले आहे. आर्थर म्हणाले की, “यापूर्वी कोविड दरम्यान अशी स्थिती आली होती. संघाला त्यांना नेमून दिलेल्या हॉटेलच्या खोल्या व मजल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हते पण आता सुद्धा त्याच स्थितीत राहावे लागत आहे. “

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“भारतात सुरक्षेसाठी इतके कठोर नियम केले आहेत की अगदी नाष्टा सुद्धा प्रत्येकासाठी वेगळ्या खोलीत असतो. आमच्या खेळाडूंना मोकळं जगण्याची सवय आहे. जेव्हा आम्ही यापूर्वी भारतात आल्यावर हॉटेल बाहेर पडायचो तेव्हा निदान स्वतःच्या मर्जीने जेवायला, फिरायला जाता येत होते पण यावेळेस हे सगळं करताना खूप बंधने असल्याने फार कमी वेळा शक्य झाले आहे. ही स्थिती खेळाडूंसाठी अस्वस्थ करणारी आहे. ज्या दिवशी सराव नसेल तेव्हा सुद्धा हॉटेलच्या बाहेर पडण्याऐवजी खेळाडूंनी रूममध्येच विश्रांती घ्यावी लागते. यावेळी तुम्ही स्वतः टीमसाठी रूममध्ये एकत्र येऊन काही खेळ किंवा गोष्टी करू शकत असाल तर तेवढंच करण्याची मुभा आहे. भारतात आल्यापासून पाकिस्तानचे खेळाडू केवळ तीनदा बाहेर जेवणासाठी गेले आहेत. “

हे ही वाचा << “सारा सारा काय, हा आहे ना..”, शुबमन गिलला चिडवणाऱ्यांना कोहलीचा इशारा; IND vs SL सामन्यात मग जे घडलं..

दरम्यान, पॉइंट टेबलच्या सहाव्या स्थानासाठी पाच पैकी चार सामने गमावलेल्या पाकिस्तानची वर्ल्ड कप मोहीम आता एका निकालावर अवलंबून आहे. विश्वचषक स्पर्धेतील इतके सलग परभव पाकिस्ताला पहिल्यांदा सहन करावे लागले आहेत. आज शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बाबर आझमच्या संघाने दुखापतग्रस्त न्यूझीलंडच्या संघाला हरवल्यास लीग सामन्यांमध्ये पाकिस्तानला प्रवेश करण्याची संधी मिळू शकते.

Story img Loader