पाकिस्तान क्रिकेटमध्ये बाबर आझम या नावाला फार वलय प्राप्त झाले आहे. क्रिकेटमधील त्याने केलेली प्रगती पाहता तो अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. २६ वर्षीय बाबरने २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि लवकरच तो सर्वांचा लाडका बनला. २०१९मध्ये बाबरला पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. एका वर्षानंतर, पाकिस्तानचा तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार झाला. बाबरचा हा प्रवास पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर बॉल बॉय म्हणून क्रिकेटला सुरुवात करणार्या बाबरने आपले कौशल्य पणाला लावत मेहनतीने हे साम्राज्य उभे केले.
आता बाबर आपली ही कहाणी लोकांपुढे आणणार आहे. बॉल बॉय ते पाकिस्तानचा कर्णधार हा प्रवास तो ‘बाबर की कहाणी’ याद्वारे सांगणार आहे. बाबरने आपल्या ट्विटरवर ‘बाबर की कहाणी’चे एक पोस्टर शेअर केले आहे, ही कहाणी उद्या लाँच होणार आहे.
हेही वाचा – सोळावं वरीस विक्रमाचं..! इंग्लंडला मिळाला नवा ‘सचिन’
Meri kahani, stay tuned! #BabarKiKahani pic.twitter.com/g3QapD3TJ8
— Babar Azam (@babarazam258) June 4, 2021
‘बाबर की कहानी’ व्हायरल!
बाबरचे हे ट्वीट अल्पावधीतच हजारो लोकांनी रिट्वीट केले. एका ट्विटर युजरने लिहिले की बाबर, तू चांगला आहेस. परंतु अद्याप अजून बराच पल्ला गाठायचा आहे. बाबरची ही कहाणी वर्ल्डकप विजयासह संपली पाहिजे, अले काहींनी म्हटले आहे. ‘बाबर की कहानी’ हे पुस्तक, बायोपिक किंवा माहितीपट किंवा अजून काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – आधी बॅट आता स्कूटर..! मोहम्मद अझरुद्दीन देतोय जुन्या आठवणींना उजाळा
नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया
Babar you are doing great BUT we have along way to go ! Please focus on the World Cup and team selection . We want that #BabarKiKahani that ends with a World Cup victory .
— Hassan Aziz, MD (@Sharpknife_Aziz) June 4, 2021
this is Babar’s life story
from 2007-2021
pic.twitter.com/yIY4vccxLN— Noor Hafeez Abbasi (@NoorHafeez56) June 4, 2021
हेही वाचा – काय सांगता..! विराटचा ‘जिगरी दोस्त’ यजुर्वेंद्र चहल CSK कडून खेळणार?
बाबर आझम सध्या अबुधाबीमध्ये असून तेथे तो पीएसएल-६चे उर्वरित सामने खेळणार आहे. या हंगामात बाबरने चांगली कामगिरी केली होती. पीएसएल थांबविण्यात आले, तेव्हा बाबर आझमने ५ सामने खेळत २५८ धावा केल्या. यात त्याने ३ अर्धशतकेही ठोकली आहेत.