टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या नागपूर कसोटीत शानदार गोलंदाजी करत आहे. पहिल्या डावात त्याने ९ षटकात १८ धावा देत १ बळी घेतला. गेल्या काही वर्षांत शमी भारतीय गोलंदाजी आक्रमणातील सर्वात धोकादयक खेळाडू म्हणून उदयास आला आहे. अशात शमीबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडू अझहर महमूदने एक खुलासा केला आहे.

मोहम्मद शमी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्स संघासाठी खेळतो. परंतु २०१२ आणि २०१३ च्या मोसमात तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रमुख खेळाडू होता. त्यादरम्यान त्याने माजी अष्टपैलू खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडू अझहर महमूदसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. हा अष्टपैलू खेळाडू ब्रिटिश नागरिकत्वाखाली आयपीएल खेळला होता. महमूदने आता खुलासा केला आहे की शमीने एकदा त्याच्या सीम पोझिशनच्या मुद्द्यावरून त्याच्याशी संपर्क साधला होता.

Pakistan Hockey Team Support China with Their Flags in Asian Champions Trophy 2024
India vs China Hockey: चेहऱ्यावर मास्क अन् हातात चीनचा झेंडा, हॉकी फायनलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा चीनला पाठिंबा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Moin Khan strong warning to BCCI Team India
IND vs PAK : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नाही तर…’, मोईन खानने दिला इशारा
Pakistan Creates Unwanted Record Becomes 2nd Team to Lose 20 Consecutive Test Matches At Home
PAK vs BAN: पाकिस्तानच्या नावे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणा रेकॉर्ड, घरच्या मैदानावरचं केला नकोसा विक्रम
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं

डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीग टी-२० (ILT20) दरम्यान एका मुलाखतीत महमूदने सांगितले की, आयपीएलमध्ये शमी, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंसोबत काम करण्याची आपली इच्छा आहे. त्याला आता आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करायचे आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: पदार्पणातच टॉड मर्फीचे ‘पंचक’! लायन-टेलरच्या विशेष क्लबमध्ये सामील होत रचला नवा इतिहास

खेळाला कोणती सीमा नसते –

तो म्हणाला, ”मला माझा अनुभव सर्वांसोबत शेअर करायचा आहे. मला पर्वा नाही कारण खेळाला कोणती सीमा नसते. मी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलो आहे. मी शमीसोबत काम केले आहे. मला आठवते की जेव्हा त्याला त्याच्या सीम पोझिशनमध्ये समस्या येत होत्या, तेव्हा त्याने मला एक टेक्सट मेसेज पाठवला होता.”

हेही वाचा – IND vs AUS: पहिल्या कसोटीत कांगारू संघाला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूला अचानक रुग्णालयात केले दाखल

मी या लोकांच्या संपर्कात राहतो –

तो पुढे म्हणाला की, ”मी या लोकांच्या संपर्कात राहतो. मी जेव्हा जेव्हा शमी, भुवनेश्वरला पाहतो, तेव्हा ते येऊन मला समस्यांबद्दल विचारतात. मला कोणासोबत ही काम करायला अडचण नाही. ते भारतीय आहेत की पाकिस्तानी याने काही फरक पडत नाही. मी एक प्रशिक्षक आहे. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे आणि आता खेळाला काहीतरी परत देण्याची वेळ आली आहे.” पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू सध्या आयएलटी-२० मध्ये डेझर्ट व्हायपर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.