भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये २०१२-१३ साली अखेरची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. एका दशकापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. पाकिस्तानच्या २०१२-१३ मध्ये दोन्ही संघांमध्ये तीन वनडे आणि २ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. त्यानंतर केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच दोन्ही संघ आमने सामने येताना दिसतात. पण पूर्वी मात्र दोन्ही संघ एकमेकांच्या घरच्या मैदानावर क्रिकेट खेळत असत. यादरम्यान १९७८ च्या काळातील भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर असतानाचा एक धक्कादायक किस्सा माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी सांगितला आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी खुलासा केला आहे की, १९७८ मध्ये एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय खेळाडूंना ‘काफिर’ असं म्हटलं होतं. कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानात पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने जो कँब्रिज युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊन आला होता, ज्याने अचानक भारतीय संघातील खेळाडूंना ‘काफिर’ म्हटल्याने सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले. जो व्यक्ती इस्लामला मानत नाही किंवा इस्लामच्या विरोधात बोलतो त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. मोहिंदर अमरनाथ यांनी त्यांच्या ‘फिअरलेस अ मेमॉयर’ हा चरित्रात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. या नव्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी पाकिस्तानमधील या प्रसंगाचा खुलासा केला आहे. ही टिप्पणी करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूचे नाव त्यांनी उघड केलेले नाही.

हेही वाचा – India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

रावळपिंडीतील कसोटीनंतर ही घटना घडली होती. फिअरलेसमध्ये लिहिले आहे की, “सामना संपल्यानंतर आम्ही साधारणपणे बसमध्ये चढत होतो. तितक्यात काहीच कारण नसताना अचानक तो पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला, ‘ बिठाओ बिठाओ इन काफिरों को जल्दी बिठाओ.’ अमरनाथ यांनी याबाबत पुढे लिहिलं आहे, चांगल्या शिक्षणाचा उपयोग काय जर ते इतरांबद्दलचा तुमचा नकारात्मक दृष्टिकोन बदलू शकत नाही?” मात्र, त्यांनी आपल्या संघाचे पाकिस्तानात झालेल्या स्वागताचे कौतुक केले.

हेही वाचा – Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO

अमरनाथ यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाच्या स्वागतासाठी कराची विमानतळावर ४०-५० हजार लोक उपस्थित होते. खऱं तर यापेक्षाही दुपटीने लोक स्वागतासाठी उपस्थित होते, पण विमान लँड होण्यासाठी उशीर झाल्याने काही जण निघून गेले. “कराची विमानतळापासून हॉटेलपर्यंतचे अंतर फक्त २० मिनिटांचं होतं. पण त्यांना हॉटेलमध्ये पोहोचायला त्यादिवशी ४ तास लागले. लोकांनी अक्षरश: त्या मार्गातील प्रत्येक कोपरा न कोपरा काबीज करून उभे होते आणि जोपर्यंत भारतीय खेळाडूंची एक झलक पाहत नाही आणि त्यांना हात मिळवत नाही तोपर्यंत त्यांनी तिथून जाण्यास नकार दिला”, असं अमरनाथ यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

हेही वाचा – BCCI ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला लावणार शिस्त, खेळाडूंच्या कुटुंबासाठी नवीन नियम; पत्नी आणि गर्लफ्रेंड…

Mohinder Amarnath Memoir Fearless
मोहिंदर अमरनाथ यांचं आत्मचरित्र (फोटो-एक्स)

काही पाकिस्तानी खेळाडू मात्र विचित्र आणि वेगळेच वागताना दिसले होते. अमरनाथ यांनी या पुस्तकात म्हटलं आहे की, “काही पाकिस्तानी खेळाडू पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागले. या दोन्ही संघांमधील वैमनस्य अपेक्षेपेक्षा जास्त प्रकर्षाने दिसून आले. काही पाकिस्तानी खेळाडू हे त्यांच्या वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार वागले आणि आमच्यापासून अंतर राखून होते. आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांचा सूर आक्रमक असे. त्यांच्यापैकी किमान दोन, जावेद मियांदाद आणि सरफराज नवाज आणि थोड्याफार प्रमाणात मुदस्सर नजर हे देखील या सल्ल्याप्रमाणे वागले. नाहीतर मला वाटत नाही की जावेद किंवा सरफराज कधीही मैदानावर शांत राहिले आहेत.”

मोहिंदर अमरनाथ हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत टीम इंडियाचा कणा होते. त्यांनी ६९ कसोटी खेळल्या, ज्यात त्यांनी ४,३७८ धावा केल्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ११ शतकं झळकावली. एवढेच नाही तर त्यांनी गोलंदाजीतही वाहवा मिळवली आणि ३२ विकेटही आपल्या नावावर केले. १९८३ च्या विश्वचषक फायनलमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

Story img Loader