पाकिस्तानमध्ये दररोज मंदिरांचे नुकसान होत आहे. या देशात हिंदूंवरील हल्ल्याच्या बातम्या रोज समोर येत असतात. नुकतेच कराचीमध्येही एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले. याबाबत पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक व्हिडिओ पोस्ट करून हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कनेरियाने पंतप्रधान इम्रान खान यांना धार्मिक स्वातंत्र्य वाचवण्याचे आवाहन केले आहे. दानिश कनेरिया हा काही हिंदू क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यांना पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली. कनेरियाने आज बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ एका मंदिराचा आहे. यामध्ये मंदिराची आतून तोडफोड करण्यात आली असून, दुर्गेच्या मूर्तीचीही विटंबना करण्यात आली आहे.

हेही वाचा – ICC Test Rankings : Marvelous मार्नस..! स्मिथचा बदली खेळाडू म्हणून संघात आला अन् बनला १ नंबरी फलंदाज!

४१ वर्षीय दानिश कनेरियाने आपल्या कु पोस्टमध्ये लिहिले, ”कराचीत हे घडले आहे. धार्मिक स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ नये. यामुळे पाकिस्तानची बदनामी होत आहे. मी पंतप्रधान इम्रान खान यांना कारवाई करण्याची विनंती करतो.”

https://www.kooapp.com/koo/kan_261/f8af0b13-95ac-437a-bdc3-217fa7fad42f

कोण आहे कनेरिया?

दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी ७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या कनेरियाने यापूर्वीही आपल्या सहकारी क्रिकेटपटूंवर भेदभावाचे आरोप केले होते. कनेरियाने काही वर्षांपूर्वी दावा केला होता, की त्याचे अनेक सहकारी क्रिकेटपटू धर्माच्या आधारावर आपल्याशी भेदभाव करतात. याशिवाय कनेरियावर मॅच फिक्सिंगचेही आरोप आहेत. त्याच्यावर आजीवन बंदीही घालण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात दानिश कनेरियाने सिंध उच्च न्यायालयात अपील केले आहे.

Story img Loader