पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्याच्या क्लासमेटशी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या सातत्याने येत होत्या, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. हारिसच्या लग्नाला पाकिस्तानी संघाचे अनेक विद्यमान आणि माजी दिग्गज खेळाडू उपस्थित होते. शाहिद आफ्रिदी आणि शाहीन शाह आफ्रिदीसारखे खेळाडू हरिसच्या लग्नात उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हारिसची पत्नी मुजना मसूद मलिक व्यवसायाने मॉडेल आहे. तिने हारिस सोबत शिक्षण घेतले आहे. अलीकडच्या काळात दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. तेव्हापासून ते नात्यात असल्याची बाब समोर आली. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत हारिसचा विवाह सोहळा सुरू राहणार आहे. त्यात त्यांच्या वलीमाचाही समावेश असेल. मुजनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मॉडेलिंगचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

मुजनाने लग्नाआधी हातावर सुंदर मेहंदी काढली होती, जी एका खास कारणासाठी ट्रेंडमध्ये येऊ लागली आहे. मेहेंदी काढताना तिने हारिस रौफच्या नावाची दोन अक्षरं एचआर आणि त्याच्या वेगाचा आकडा १५० यांचा उल्लेख केला होता.ही मेहंदी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांनी देखील HR150 चा योग्य अंदाज लावला आहे. आता हारिस रौफच्या पत्नीचे फोटो मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रौफ दुखापतीतून सावरत आहे –

हेही वाचा – PCB Update: पाकिस्तान क्रिकेट सेटअपमधील फेरबदलानंतर, शाहिद आफ्रिदीला मिळाली मोठी जबाबदारी

टी-२० विश्वचषक २०२२ च्या फायनलनंतर रौफने एकही सामना खेळलेला नाही. अंतिम सामन्यानंतर त्याच्या दुखापतीची बाब समोर आली होती. तेव्हापासून तो तंदुरुस्त होत आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या घरच्या कसोटी मालिकेत रौफने भाग घेतला नव्हता. या मालिकेत पाकिस्तानला ३-० ने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मालिका गमावल्यानंतर कर्णधार बाबर आझमनेही मुख्य गोलंदाजांच्या दुखापतीमुळे आपल्या संघाला या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मान्य केले होते.