मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत. उर्वशीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर उर्वशी आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह यांचे नाव एकमेकांसोबत जोडले जात आहे. सोशल मीडियावरदेखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नसीम शाहने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने उर्वशी रौतेला कोण आहे, हे मी ओळखत नाही. सध्या माझा चांगले क्रिकेट खेळण्यावर भर आहे, असे नसीम शाह म्हणाला आहे.

हेही वाचा >> Video : ‘पाकिस्तानचा कर्णधार मी आहे,’ बाबर आझमवर आली पंचाला सांगण्याची वेळ; पाहा भर मैदानात नेमकं काय घडलं?

नसीम शाह काय म्हणाला?

नसीम शाहला उर्वशी रौतेलाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना “उर्वशी रौतेला कोण आहे, हे मला माहिती नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते याबाबत मला काहीही माहिती. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे,” असे नसीम शाह म्हणाला.

हेही वाचा >> पाकिस्तान-श्रीलंका अंतिम लढतीत कोण बाजी मारणार? ‘ही’ बाब ठरणार महत्त्वपूर्ण; भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने केले भाकीत

“मी मैदानावर क्रिकेट खेळत असतो. मला याबाबत कशाहीची कल्पना नाही. जे लोक स्टेडियममध्ये येऊन सामना पाहतात, त्यांचे आभार मानायला हवेत. कोणाला मी आवडत असेन तर ती चांगली गोष्ट आहे.” असेदेखील नसीम शाह म्हणाला.

हेही वाचा >> ‘सध्याच्या खेळाडूंपेक्षा तू अधिक सरस,’ मारिया शारापोवाने टेनिसपटू सेरेना विल्यम्सला दिला होता विवृत्ती न घेण्याचा सल्ला

उर्वशी रौतेलाने नेमकं काय केल होतं?

दरम्यान उर्वशी रौतेलाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर तिचे नाव नसीम शाहसोबत जोडले जात आहे. ४ सप्टेंबर रोजी ती भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहायला गेली होती. याच सामन्यातील व्हिडीओ तिने इन्साटाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये नसीम शाह हसताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उर्वशीदेखील स्टेडियममध्ये बसून हसत आहे. एका फॅन पेजने बनवलेला व्हिडीओ उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून पोस्ट केला होता. याआधी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबतच्या वादामुळेही उर्वशी चर्चेत आली होती. या दोघांच्या वादाचा संदर्भ घेऊन सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स मोठ्या चवीने शेअर केले गेले होते.

Story img Loader