गेले काही दिवस दानिश कनेरिया हे नाव चर्चेत आहे. पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया फिरकीपटू म्हणून खेळत होता. पण दानिश हिंदू असल्याने त्याला पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंच्या रोषाला आणि त्रासाला सामोरे जावे लागले. पाक खेळाडू त्याला अतिशय हीन दर्जाची वागणूक देत होते, असा गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला. त्यामुळे पाकिस्तानातच हिंदू आणि मुस्लीम असा भेदभाव केला जातो, अशी टीका भाजपा खासदार गौतम गंभीरने केली. त्या मुद्द्यावर वातावरण तापलेले असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

“हिंदू होता म्हणून त्याला पाकिस्तानचे क्रिकेटपटू द्यायचे त्रास”; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट

एका टीव्ही चॅनलला शाहिद आफ्रिदीने मुलाखत दिली असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ‘तुम्ही टीव्ही का फोडला होतात?’ असा प्रश्न अँकरने विचारला. त्यावर उत्तर देताना आफ्रिदी म्हणाला की भारतीय चॅनेल स्टार प्लसवर काही कौटुंबिक मालिका लागत असत. त्या मालिका पाकिस्तानातही बघितल्या जात. माझी पत्नीदेखील त्या मालिका पाहायची. तिला मी सांगितलं होतं की त्या मालिकांमध्ये खूप ‘ड्रामा’ दाखवला जातो. त्यामुळे आपल्या लहान मुलींना त्या मालिका पाहून देऊ नको. एके दिवशी जेव्हा मी घरात होतो, तेव्हा माझी मुलगी त्या भारतीय मालिकेतील दृश्य पाहून आरतीची थाळी घेऊन आरती करत होती. ते पाहून मला राग आला आणि मी थेट टीव्हीच फोडून टाकला.

Wisden T20 team of decade : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना संधी

आफ्रिदीने ही गोष्ट मान्य केल्यानंतर तेथे उपस्थित असलेले प्रेक्षक हसू लागले. आफ्रिदीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. हिंदू प्रथांबद्दल पाकिस्तानी लोकांच्या मनाच खूप मत्सर आहे अशी भावना हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader