भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांच्या वेगावर जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा फार कमी नावे समोर येतात. मात्र गेल्या काही महिन्यांत युवा स्पीड स्टार बॉलर उमरान मलिकने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जम्मू-काश्मीरच्या २३ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानातही उमरानच्या चर्चा आहेत. आजकाल पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज असलेल्या जमान खानची तुलना या भारतीय गोलंदाजाशी केली जात आहे.
आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात प्रवेश केल्यानंतर, उमरान मलिकने २०२२ च्या अखेरीस टीम इंडियामध्ये पटकन स्थान मिळवले. या युवा प्रतिभावान गोलंदाजाने सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याचे कारनामा केला आहे. त्याने अलीकडेच १५६ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आणि भारतासाठी सर्वात वेगवान गोलंदाज होण्याचा पराक्रम केला. आत्तापर्यंत मलिकने भारतासाठी ८टी-20 सामन्यात ११ विकेट्स आणि ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३ बळी घेतले आहेत. मात्र, तो कसोटी पदार्पणाची वाट पाहत आहे.
आगामी पीएसएल हंगामात लाहोर कलंदर्सकडून खेळण्यासाठी सज्ज असलेला २१ वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकशी तुलना करताना म्हणाला, त्याचे लक्ष वेगावर नाही तर कामगिरीवर आहे. पाकटीव्ही डॉट टी.व्ही. या यूट्यूब चॅनलवर बोलताना जमान खान म्हणाला, ”जर तुम्ही वेगाबद्दल बोलत असाल, तर मला वेगाची पर्वा नाही. मला कामगिरीची काळजी आहे. ही कामगिरी आहे जी अधिक महत्त्वाची आहे, वेग नैसर्गिक आहे.”
जमान खान पीएसएलमध्ये खेळताना दिसणार –
हेही वाचा – T20 World Cup 2023: ‘आम्हाला माहित आहे काय महत्वाचे आहे’; भारत-पाक सामन्यापूर्वी हरमनप्रीतची गर्जना
वेगवान गोलंदाज जमान पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामात लाहोर कलंदर संघाकडून खेळणार आहे. तो एक अनकॅप्ड खेळाडू आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय ३० टी-२० सामन्यात त्याने ४० विकेट्स घेतल्या आहेत.