सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग सुरु आहे. भारतामध्ये ज्या प्रमाणे आयपीएल लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे ही पाकिस्तानमधील क्रिकेट स्पर्धा असून सोशल मीडियावरही याची तुफान चर्चा दिसून येत आहे. मात्र या स्पर्धेची चर्चा सध्या भारतामध्ये आहे कारण या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचं दर्शन झालंय. नाही, नाही तुम्ही समजताय तसं नाहीय. विराट या स्पर्धेत प्रत्यक्ष खेळण्यासाठी गेला नाहीय किंवा तो पाकिस्तानमध्येही नाहीय. तर विराटचं दर्शन पीएसएलमध्ये झालंय ते एका चाहत्याने पकडलेल्या पोस्टरच्या माध्यमातून.
पाकिस्तानमधील एका क्रिकेट चाहत्याने कोहलीचं पोस्टर सामन्यादरम्यान झलकावल्यानंतर त्याचा फोटो व्हायरल झालाय. या पोस्टवर विराटने पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळावं अशी इच्छा व्यक्त केलीय. पाकिस्तानमध्ये झळकलेल्या विराटच्या या पोस्टवर पाकचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही प्रतिक्रिया दिलीय.
नक्की पाहा >> Photos: ऋषभ पंतने इन्स्टा Story वरुन दिलेल्या शुभेच्छांवर गर्लफ्रेण्डने दिलेल्या रिप्लायचा Screenshot व्हायरल
अख्तरने हा व्हायरल फोटो शेअर केलाय. ट्विटवरुन अख्तरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक पाकिस्तानी क्रिकेट चाहता कोहलीचा फोटो असणारं पोस्टर घेऊन गद्दाफी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत शोएबने “गद्दाफी स्टेडियममध्ये कोणीतरी प्रेम पसरवत असताना” अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय. या फोटोमधील चाहत्याने हातात पकडलेल्या पोस्टवरच विराटचा फलंदाजी करताना फोटो आहे. या पोस्टवर “मला पाकिस्तानमध्ये तू शतक झळकावलेलं पहायचं आहे,” असं वाक्य लिहिलेलं असून खाली पीस म्हणजेच शांतता असा हॅशटॅग वापरण्यात आलाय.
नक्की वाचा >> शिखर धवन स्टाइल सेलिब्रेशन पाकिस्तानी क्रिकेटपटूला पडलं महागात; दोनदा झाली शिक्षा
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/02/Akhtar-Tweet.jpg)
मुल्तानच्या संघाकडून खेळणारा शान मसूद आणि मोहम्मद रिझवान हे अर्धशतक झळकावून फलंदाजी करताना चौकार, षटकारांमधून धावांचा पाऊस पाडत असतानाच एका चाहत्याने हे पोस्टर झळकावलं.
नक्की वाचा >> Video: …अन् सूर्यकुमार यादवने मैदानामधूनच द्रविड सरांना केला ‘स्टायलिश नमस्ते’
मागील बऱ्याच काळापासून विराट त्याच्या ७१ व्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे. त्याने २०१९ मध्ये बंगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये शतक झळखावलं होतं. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेलं नाही.