IND vs PAK T-20 World Cup Match Today : भारतीय क्रिकेट संघातील सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेट मधील जगातील प्रथम क्रमाकांचा फलंदाज आहे. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सूर्यकुमारची बॅट अनेकवेळा तळपली आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार-षटकार ठोकण्याची किमया लिलया साधणाऱ्या यादवला टी-२० फॉरमॅटमध्ये चांगलाच सुर गवसलेला आहे. आयसीसी क्रमवारीतही तो प्रथम स्थानावर आहे. आज न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या भारत वि. पाकिस्तान सामन्यात सूर्यकुमारच्या कामगिरीकडे भारतासह पाकिस्तानचेही लक्ष असणार आहेच.

IND vs PAK: भारतीय चाहत्यांनी शाहीन आफ्रिदीला घेरलं; म्हणाले, “आज बॉलिंग करताना…”

Babar Azam Resigns as Pakistan White ball team Captain by Social Media Post PCB
Babar Azam: “आता वेळ आली आहे की…,” बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा दिला राजीनामा, वर्षभरात दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Nicholas Pooran breaks Mohammad Rizwan world record
CPL 2024 : निकोलस पूरनने मोडला मोहम्मद रिझवानचा विश्वविक्रम, केला ‘हा’ खास पराक्रम
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
IND vs BAN Basit Ali Slams PCB After India beat Bangladesh in Chennai Test
IND vs BAN : “वो जाहिल लोग है, उनको…”, भारताच्या विजयानंतर बासित अलीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फटकारले
IND vs BAN Adam Gilchrist on Rishabh Pants comeback
IND vs BAN : ‘ऋषभ पंतचे कसोटीतील पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील…’, ॲडम गिलख्रिस्टचे वक्तव्य

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने तर त्याला थेट आव्हानच दिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अकमलने म्हटले की, भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी करून स्वतःला सिद्ध केले आहे. तर सूर्यकुमार यादव आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असूनही त्याला पाकिस्तानच्या गोलंदाजांविरोधात चांगला खेळ करता आलेला नाही.

सूर्यकुमार जर नंबर एक असेल तर…

कामरान अकमल म्हणाला, विरोट कोहली अव्वल आहेच. आता सूर्यकुमारकडेही आशेने पाहिलं जातं. पण पाकिस्तानविरुद्ध त्याची कामगिरी दिसलेली नाही. रोहित शर्मानेही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली आहे. आता सूर्यकुमारला स्वतःला सिद्ध करावे लागेल. जर तो आयसीसीच्या क्रमवारीत नंबर एकवर असेल तर त्याने पाकिस्तानविरुद्ध धावा करून दाखवाव्यात. सूर्यकुमार ३६० अंशाच्या कोनात फटकेबाजी करतो, त्यामुळे त्याची फलंदाजी पाहणे ही पर्वणी असते.

टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठा सामना म्हणून आजच्या सामन्याकडे पाहिले जात आहे. न्यूयॉर्कमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या स्टेडियममध्ये आजचा सामना होत आहे. यासाठी ३४ हजार प्रेक्षक बसतील, अशी सोयही करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये असलेल्या भारताने आयर्लंडशी पहिला सामना सहज जिंकला. तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात युएसए सारख्या नवख्या संघाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज पाकिस्तान त्वेषाने उतरून विजय मिळविणार की भारत आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवणार, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतूर झाले आहेत.

पाकिस्तानच्या फलंदाजांची कसोटी

अमेरिकेविरुद्धच्या मोहम्मद रिझवान, उस्मान खान आणि फखर झमान हे फलंदाज झटपट माघारी परतले होते. आता पाकिस्तानच्या फलंदाजांना बुमरासारख्या अलौकिक दर्जाच्या गोलंदाजाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांची कसोटी लागेल. पाकिस्तानची मदार पुन्हा बाबर आझमवरच असेल. बाबरने अमेरिकेविरुद्ध ४३ चेंडू खेळताना केवळ ४४ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याने आपला स्ट्राईक रेट वाढवणे गरजेचे आहे. वेगवान गोलंदाजी ही पाकिस्तानची सर्वांत भक्कम बाजू आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमीर, नसीम शाह आणि हॅरिस रौफ हे वेगवान गोलंदाज निर्णायक भूमिका बजावू शकतील.