Pakistani Journalist Compared Imam ul Haq with Sourav Ganguly : भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची तुलना होणे ही काय आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यांची सर्वांनाच प्रतीक्षा असते. पण सध्या एक पाकिस्तानी पत्रकार क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य आहे. फरीद खान नावाचा हा पत्रकार भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या खेळाडूबाबत सोशल मीडियावर पोल घेत आहे. पण पोल घेण्यासाठी ज्या खेळाडूंची तुलना करतोय त्यावरुन तो सातत्याने ट्रोल होत. आता त्याने पाकिस्तानच्या इमाम उल हकची तुलना भारताचा माजी खेळाडू सौरव गांगुलीशी केल्याने प्रचंड ट्रोल होत आहे.

पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने एक्सवर भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीची तुलना पाकिस्तानी सलामीवीर इमाम उल हकशी केली आहे. त्याने गांगुली आणि इमामचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सर्वोत्तम खेळाडू निवडण्यास सांगितले. चाहत्यांना ही तुलना आवडली नाही आणि त्यांनी फरीद खानवर टीका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप स्वत:ला स्थिर न करु शकलेल्या इमामशी गांगुलीची तुलना करण्याचे योग्य नाही, असे चाहत्यांनी सांगितले.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

इमामची तुलना सौरव गांगुलीशी केली –

पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने एक्सवर पोस्ट करताना लिहिले, ‘सौरव गांगुली आणि इमाम उल हक? चांगला खेळाडू कोण आहे? मला प्रामाणिकपणे सांगा.’ यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या झेंड्यांचे इमोजीही वापरले. यानंत चाहते त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली आहे. तसेच काही चाहते म्हणाले गांगुला आणि इमाम यांच्यात तुलना होऊ शकत नाही, परंतु सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळविण्यासाठी हा प्रयत्न आहे. कारण या अगोदर त्याने मोहम्मद रिझवानची धोनीशी तुलना केली होती.

हेही वाचा – IND vs SL : हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादवला ‘जादू की झप्पी’ देत वेधले सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

चाहत्याने केलेल्या मजेशीर कमेंट्स पाहा –

हेही वाचा – IND vs SL : रवींद्र जडेजाला टीम इंडियातून का देण्यात आला डच्चू? अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं कारण

सौरव गांगुलीच्या नावावर १८ हजारांहून अधिक धावांची नोंद –

सौरव गांगुलीने ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आणि १८,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहे. तो बराच काळ भारतीय संघाचा कर्णधार होता. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. दुसरीकडे, २८ वर्षीय इमामने २४ कसोटी, ७२ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने ५००० पेक्षा कमी आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. याशिवाय तो संघातून बाहेर आहे.

हेही वाचा – IND vs SL : हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादवला ‘जादू की झप्पी’ देत वेधले सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

सौरव गांगुलीने बीसीसीआयचा अध्यक्षही राहिला –

सौरव गांगुलीला प्रेमाने ‘दादा’ म्हणतात. तो भारतातील सर्वात प्रभावशाली क्रिकेट कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षही राहिले आहेत. २००० ते २००५ पर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करत गांगुलीने आपल्या आक्रमक कर्णधार शैलीने आणि निर्भय वृत्तीने भारतीय क्रिकेटला कलाटणी दिली. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००२ मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. त्याचा कार्यकाळ वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, आशिष नेहरा, झहीर खान, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या युवा प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जातो.

Story img Loader