यूएई येथे होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभूत केले. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा या फलंदाजांनी धडाकेबाज खेळी करत पाकिस्तानच्या हातून विजय खेचून आणला. दरम्यान, भारताच्या या विजयानंतर पाकिस्तामधील क्रिकेटप्रेमी चांगलेच नराज आहेत. पाकिस्तानमधील एका पत्रकाराने भारत हा नशिबाने जिंकला आहे. नशिबाने साथ दिली नसती तर भारताचा विजय झालाच नसता, अशा आशयाचे ट्वीट केले आहे. पाकिस्तानी पत्रकाराच्या या ट्वीटनंतर आता भारतीय क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Video : भारत-पाक सामन्यात रोहित शर्मा थोडक्यात बचावला, डोक्याला चेंडू लागून झाला असता जखमी, नेमकं काय घडलं होतं?

पाकिस्तानी पत्रकार काय म्हणाला?

भारतापेक्षा नशिबाने चांगले क्रिकेट खेळले. आज नशीब भारताच्या बाजूने नसते तर भारत विजयी होऊ शकला नसता. नशिबाने साथ दिल्यामुळे भारताचा विजय झाला आणि म्हणूनच पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा चांगले क्रिकेट खेळला, असे ट्वीट आरफा फेरोज झाके नावाच्या पत्रकाराने केले. त्याच्या या ट्वीटला अनेकांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तुम्ही क्रीडा पत्रकारीता सोडून द्यायला हवी. मी तुम्हाला ब्लॉग करत आहे, अशी प्रतिक्रिया एका ट्विटर वापरकर्त्याने दिली.

हेही वाचा >>> Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…

तर तुम्ही चुकीचे आहात. आज भारताने खरा खेळ खेळला. त्यांच्या संघाच्या खेळाडूंनी चांगली भागिदारी करून विजय मिळवला, असे दुसऱ्या एका नेटकऱ्याने सुनावले आहे.

भारत आतापर्यंत १० टी-२० सामन्यांपैकी ८ सामने जिंकलेला आहे आणि तुम्ही म्हणत आहात की भारत कधीही जिंकू शकला नसता, असा आरसा दुसऱ्या एका ट्विटर यूजरने पाकिस्तानी पत्रकाराला दाखवला आहे.