Waqar Younis on Virat Kohli Century: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली प्रत्येक सामन्यात नवनवीन विक्रमांना स्पर्श करत आहे. त्याने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधील ४७वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७७वे शतक झळकावले. आशिया चषक २०२३च्या सुपर-फोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांची नाबाद खेळी खेळल्यानंतर कोहलीने हा पराक्रम केला. या काळात त्याने सर्वात जलद १३ हजार वन डे धावा पूर्ण करण्याचा पराक्रमही केला. या प्रकरणात त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. कोहलीने २६७ डावात तर सचिनने ३२१ डावात हा आकडा गाठला आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने किंग कोहलीबाबत अजब भविष्यवाणी केली आहे.

३४ वर्षीय कोहली आता सचिनचा आणखी एक मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे, जो वन डेतील सर्वाधिक शतकांशी संबंधित आहे. सचिनने या फॉरमॅटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. जर याबाबतील सचिनला मागे टाकायचे असेल तर कोहलीला आगामी काळात फक्त तीन शतकांची गरज आहे. एकूणच सचिनने आपल्या कारकिर्दीत १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज वकार युनूस म्हणतो की, “जेव्हा कोहलीची कारकीर्द संपेल तेव्हा त्याच्या खात्यात इतकी शतके असतील ज्याचा लोकांना अंदाजही आला नसेल. आपण विचारही करू शकणार नाही एवढी त्याने शतके ठोकलेली असतील.”

aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Salman Khan And Hema Sharma
“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Ruturaj Gaikwad Speaks About Controversial Decision of Ankit Bawne Catch Out in the Ranji Trophy Game Between Services and Maharashtra
Ruturaj Gaikwad: “अपील करायला लाज वाटली पाहिजे…”, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्रासाठी धावून आला ऋतुराज गायकवाड, रणजीमधील कॅचचा व्हीडिओ केला शेअर

हेही वाचा: SL vs PAK, Asia Cup: ‘करो या मरो’ सामन्यात पाकिस्तानने निम्मा संघ बदलला, प्लेईंग ११मध्ये कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या

किंग कोहलीच्या ७७व्या शतकानंतर युनूसने ही विचित्र भविष्यवाणी केली आहे. युनूसने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, “विराट आणि इतर खेळाडूंमध्ये, अगदी सचिन तेंडुलकरमध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा सचिन तेंडुलकरने वन डे कारकीर्द पूर्ण केली तेव्हा त्याच्या नावावर ४९ शतके होती. मी हे खात्रीशीर सांगू इच्छितो की, विराटची क्रिकेट कारकीर्द संपण्यास अजून खूप काळ आहे. विराट खूप जास्त शतके करेल, ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. त्याची कारकीर्द ज्यावेळी संपुष्टात येईल त्यावेळी विराटच्या खात्यात कोणाच्याही कल्पनेपेक्षा जास्त शतके झळकावेलेले असतील.

हेही वाचा: SL vs PAK: पावसाने वाढवली पाकिस्तान-श्रीलंका संघाची धाकधूक, सामना रद्द झाल्यास कोण जाणार फायनला? जाणून घ्या समीकरण

उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २४ वर्षाची होती. तो १९८९ ते २०१३ पर्यंत खेळला आणि फलंदाजीत अनेक विक्रम केले. कसोटी (१५९२१) आणि एकदिवसीय (१८४२६) मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो क्रिकेटपटू आहे. दरम्यान, कोहलीने २००८ मध्ये पदार्पण केले आणि अनेक विक्रम मोडले. मात्र, कसोटीत शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहली सध्या सचिनपेक्षा खूपच मागे आहे. या फॉरमॅटमध्ये कोहलीने आतापर्यंत २९ तर सचिनने ५१ शतके झळकावली आहेत.