‘‘आयपीएल स्पर्धेत अन्य परदेशी खेळाडूंना मुक्त प्रवेश देताना आमच्या खेळाडूंना मनाई केल्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा मलिन झाली आहे,’’ असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले.
‘‘आमच्या खेळाडूंना प्रवेशबंदी करणे ही खरोखरीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या खेळाडूंचे व क्रिकेटचे खूप नुकसान झाले आहे. मात्र त्यापेक्षाही भारताचे राजकीय धोरण किती विसंगत आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. उभय देशांमध्ये क्रिकेटमुळेच सौख्याचे संबंध होतील, अशी मला खात्री आहे,’’ असे आफ्रिदीने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘२०१५च्या विश्वचषक स्पर्धेनंतर मी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. अर्थात शारीरिक तंदुरुस्ती पाहूनच मी हा निर्णय घेणार आहे. छ’

Story img Loader