Pakistani policemen Champions Trophy 2025 : तीन दशकांनंतर पाकिस्तानला आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोरील आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नाहीत. आधी भारतीय क्रिकेट संघाचा विरोध, मग सुरक्षेचा प्रश्न, त्यानंतर मैदानांची दुरवस्था, स्टेडियमची डागडुजी अशा अनेक अडचणींवर मात करून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा २०२५ चं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आता पीसीबीसमोर नवं आव्हान उभं ठाकलं आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस दलातील १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक २०२५ दरम्यान सुरक्षा कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्यामुळे या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा