पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मला ड्रग्जचे (कोकेन) व्यसन जडले होते, असे अक्रम म्हणाला आहे. २००९ साली पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मात्र हे व्यसन सुटले, असेदेखील अक्रमने सांगितले आहे. अक्रमने आपल्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० पेक्षा जास्त बळी घेतलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>> T20 World Cup: नजमुल हुसेन शांतोचे अर्धशतक! बांगलादेशचे झिम्बाब्वेसमोर १५१ धावांचे आव्हान

वसीम अक्रमने काही दिवसांपूर्वीच आपल्या आत्मकथात्मक पुस्तकाची घोषणा केलेली आहे. त्यानंतर त्याने टाईम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मी माझ्या पुस्तकात ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सविस्तर सांगितले आहे, असे अक्रमने सांगितले आहे. “मला पार्टी करायला आवडायचे. दक्षिण आशियामध्ये लोकप्रियतेची संस्कृती मोहक आणि भ्रामक आहे. या संस्कृतीत तुम्हाला एका रात्रीत दहा पार्ट्यांना जाता येते. या संस्कृतीचा माझ्यावरही परिणाम झाला. मला या काळात कोकेनचेही व्यसन लागले होते. पुढे-पुढे तर काही काम करण्यासाठीदेखील मला याची गरज भासायला लागली. कोकेनच्या व्यसनामुळे मी अस्थिर झालो,” असे अक्रमने सांगितले आहे.

हेही वाचा >>>> T20 World Cup 2022 : पाकिस्तानविरुद्धच्या कोहलीच्या खेळीची तुलना ग्रेग चॅपेलनी केली भगवद्गीतेशी, म्हणाले विराट…!

“या काळात माझी पत्नी हुमा एकटी पडली होती. ती आपण कराचीला जाऊया असे म्हणायची. मात्र मी त्यासाठी उत्सुक नव्हतो. काम असल्यामुळे मी येऊ शकत नाही, असे मी सांगायचो. मात्र मला कोणतेही काम नसायचे. फक्त पार्टी करता यावी म्हणून मी कराचीला जाणे टाळायचो,” असेदखील अक्रम याने सांगितले आहे.

हेही वाचा >>>> T20 World Cup: झिम्बाब्वेने केलेल्या पराभवानंतर ट्रोल होणाऱ्या पाकिस्तानच्या Mr. Bean ची प्रतिक्रिया, म्हणाला “मला…”

दरम्यान, २००९ साली पत्नी हुमा यांचे निधन झाल्यानंतर अक्रमची कोकोन सेवनाचे व्यसन सुटले. हुमा यांचे निधन झाल्यानंतर अक्रमने दुसरे लग्न केले. अक्रमला एकूण तीन मुलं आहेत. अक्रमने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकदीवसीय ३५६ सामन्यांत ५०२ बळी घेतले. तर १०४ कसोटी सामन्यांत ४१४ बळी घेतलेले आहेत. पाकिस्तानने १९९२ साली विश्वचषक जिंकला होता. अक्रम या संघाचा भाग होता. १९९९ साली विश्वचषक स्पर्धेत अक्रमने पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले होते.