Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया चषकमध्ये, प्रत्येकाला भारत अ संघाकडून (IND A) ट्रॉफी जिंकण्याच्या पूर्ण आशा होत्या, परंतु अंतिम सामन्यात भारतीय संघ पाकिस्तान अ (PAK A) संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. भारत अ संघातील एकाही खेळाडूला आंतरराष्ट्रीय अनुभव नव्हता, तरीही संघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी. मात्र नुकतेच याप्रकरणी पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हारिसचे एक वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही भारताला लहान मुलांना पाठवण्यास सांगितले नव्हते.” हारिस त्यांच्या वक्तव्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला असून त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान अ संघाने १२८ धावांनी भारत अ संघावर दणदणीत विजय मिळवला होता. सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बरीच तुलना झाली. ज्यामध्ये चाहत्यांनी सांगितले की, “पाकिस्तान अ संघाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे, तर भारतीय संघाच्या ज्युनियर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय अनुभवाशिवाय स्पर्धेत प्रवेश केला होता.”

अलीकडेच झालेल्या पॉडकास्टमध्ये, मोहम्मद हारिस म्हणाला की, “ज्या प्रकारे लोक म्हणतात की त्यांनी मोठ्यांना आणले, आम्ही लहान मुले होतो. म्हणून आम्ही बीसीसीआय एक प्रश्न विचारतो की, आम्ही तुम्हाला लहान पोरांना आणायला सांगितले नाही. त्यात पुढे म्हटले आहे की, तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभव होता. किती आंतरराष्ट्रीय अनुभव आहे आमच्याकडे? एका तर सॅमकडे पाच सामने, माझ्याकडे सहा सामने आहेत आणि तेही सर्व टी२० सामने आहेत. तुमच्याकडे आयपीएलमधील २६० सामन्यांचा अनुभव होता. आयपीएल हा छोटासा खेळ आहे का? गेल्या १५ वर्षांपासून सुरु आहे.”

हेही वाचा: Asia Cup 2023: तमिमचा तडकाफडकी राजीनामा अन् ‘या’ खेळाडूला कॅप्टन्सीची संधी, बांगलादेश क्रिकेट बोर्ड उचलणार मोठे पाऊल

मोहम्मद हारिसच्या वक्तव्याची ही क्लिप पाकिस्तानातच नाही तर भारतातही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे भारतीय चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत. माहितीसाठी की, पाकिस्तान अ संघाचा कर्णधार मोहम्मद हारिसचे हे पहिले विधान नाही, ज्यानंतर तो चर्चेत आला आहे. याआधीही त्यांनी सूर्यकुमार यादव याच्याबाबत वक्तव्य केले होते.

हेही वाचा: Team India: चहल गेल्या सहा महिन्यांपासून एकही वन डे खेळू शकला नाही, काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

भारत अ चा कर्णधार यश धुलने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले होते. संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ८४ चेंडूत २० चौकार आणि १ षटकारासह १०८ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. धुलने कर्णधार म्हणून अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans captain hit back at team india said why did small children come to play asia cup avw