Pakistan vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी विश्वचषक २०२३ चा २२ वा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. आजही पाकिस्तान हरला तर उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होईल. तत्पूर्वी पाकिस्तान संघाला एक मोठा झटका बसला आहे.
पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत विजय आवश्यक –
कर्णधार बाबर आझमने सामन्यापूर्वी एक वाईट बातमी सांगितली आहे. संघाचा एक खेळाडू ताप आल्यामुळे सामन्यातून बाहेर झाला आहे. हा सामना आणि आगामी महत्त्वाच्या सामन्यांच्या दृष्टीने पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे. पाकिस्तानला सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.
मोहम्मद नवाज आजारी –
पाकिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजला ताप आला आहे. बाबर आझमने नाणेफेकीच्या वेळी ही माहिती दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. खेळपट्टी कोरडी दिसते. चेंडू फिरू शकतो. संघात बदल करण्यात आला आहे. नवाजला ताप आल्याने त्याच्या जागी शादाब खान आजचा सामना खेळत आहे. आम्हाला प्रत्येक सामन्यात १०० टक्के देणे आवश्यक आहे आणि पुढे जाणे आवश्यक आहे. मला संघातील खेळाडूंकडूनही हेच हवे आहे. रात्रीच्या वेळी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते.”
अफगाणिस्तान संघात एक बदल करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज नूर अहमदच्या जागी फजलहक फारुकीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार हशमतुल्ला शाहिदी म्हणाला, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, पण नाणेफेक ही आपल्या हातात नसते. आमच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. फजलहक फारुकीच्या जागी नूर अहमद खेळत आहे. आम्ही श्रीलंकेत पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळली आहे. त्यामुळे आम्हाला फिरकीचे आणखी पर्याय हवे होते. आम्ही पाकिस्तानला २५० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू.”
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शौद शकीन, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ, उसामा मीर.
हेही वाचा – Asian Para Games 2023: पुरुषांच्या उंच उडी टी-४७ फायनलमध्ये भारताच्या निषाद कुमारने जिंकले सुवर्णपदक
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हसमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला झाझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नूर अहमद.