Asia Cup 2023, IND vs PAK: आशिया चषक २०२३च्या वेळापत्रकाच्या अधिकृत घोषणेसह, आता सर्व क्रिकेटप्रेमी २ सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ कॅंडीच्या मैदानावर आमनेसामने येतील. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात प्रथमच दोन्ही संघांमध्ये ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत आता पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार वकार युनूसने मोठे वक्तव्य करत आपल्या संघाच्या विजयाचा मोठा दावा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आशिया चषक २०२३चे वेळापत्रक समोर येताच चाहते आणि क्रिकेट तज्ञांना भारत-पाकिस्तान सामन्याची आठवण झाली आहे. दोन्ही देशांतून जल्लोषही सुरू झाला आहे. अलीकडेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने वक्तव्य केले होते की, “अलीकडच्या काळात भारत-पाकिस्तान सामने एकतर्फी होत आहेत. आता त्याला प्रत्युतर देत पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वकार युनूसने म्हटले आहे की, “त्यांचा संघ भारताला कुठेही हरवू शकतो.” एकप्रकारे माइंड गेम सुरु झाला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांची पहिली भेट १९९२ च्या विश्वचषकात झाली होती, तेव्हापासून भारत आयसीसी स्पर्धांमध्ये वन डे फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध अपराजित आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने अलीकडेच टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताचा पराभव केला, परंतु भारताने टी२० विश्वचषक २०२२ मधील सर्वात मोठ्या विजयासह त्या पराभवाचा बदला घेतला.
गांगुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रियेवर उत्तर देताना वकार युनूस म्हणाला की, “मी यावर भाष्य करू इच्छित नाही. मला वाटते की आम्ही चांगले सामने खेळलो आहोत. पाकिस्तानने जिंकलेला सामना अतिशय एकतर्फी (२०२१ टी२० विश्वचषक) होता. पण २०२२ साली ज्यांना आम्ही हरवले तो सामना देखील अटीतटीचा झाला होता. त्यामुळे तुम्हाला जे हवे ते तुम्ही म्हणू शकता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने हे जगातील सर्वात मोठे सामने आहेत. जेव्हा मोठ्या स्तरावर खेळता तेव्हा कोणाचीही टिप्पणी फारशी महत्त्वाची नसते.”
याशिवाय पाकिस्तानने आपल्या क्षमतेनुसार खेळ केल्यास भारताविरुद्ध कुठेही विजय मिळवू शकतो, असे युनूस म्हणाला. बुधवारी लाहोरमध्ये आशिया चषकाच्या ट्रॉफीच्या अनावरणप्रसंगी बोलताना युनूस म्हणाला, “जर तुम्ही आमच्या काळाकडे बघितले तर, आम्ही त्यांच्याविरुद्ध कधीही मोठ्या स्पर्धेत जिंकलेलो नाही. आता एक चांगली गोष्ट ही आहे की आताचे जे युवा खेळाडू आहेत ते मागे काय झाले याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कुठलेच दडपण नसते.”
माजी गोलंदाज पुढे म्हणाला की, “आमच्या संघात जेवढे टॅलेंट आहे, जर ते त्यांच्या क्षमतेनुसार खेळले तर ते भारताला पराभूत करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. ते कुठे खेळतात याने काही फरक पडत नाही. मग तो भारत असो, पाकिस्तान असो. श्रीलंका असो. जर आम्ही त्यांना ओव्हलवर पराभूत करू शकलो तर आम्ही त्यांना कुठेही हरवू शकतो.”
युनूसच्या या वक्तव्यानंतर भारतातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत, मात्र सोशल मीडियाशिवाय अद्याप कोणत्याही क्रिकेट तज्ज्ञाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, या दोन संघांबद्दल बोलायचे झाले तर, यंदाच्या विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबरला आशिया कपमध्ये भिडतील आणि स्पर्धेच्या सुपर-४ टप्प्यातही आमनेसामने येतील. दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र झाल्यास ते अंतिम फेरीत देखील एकमेकांविरुद्ध खेळातील. त्यामुळे चाहत्यांना आशिया चषकात भारत-पाकिस्तानचे ३ सामने पाहायला मिळतील.