Mohammad Amir May Debut in IPL 2024: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला २०२४ मध्ये ब्रिटीश पासपोर्ट मिळणार आहे, मग तो यानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? असे प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात विचारले जात आहेत. मोहम्मद आमिरने २०१६ मध्ये ब्रिटीश नागरिक आणि वकील नरजीस खान यांच्याशी लग्न केले होते. मोहम्मद अमीर २०२० पासून इंग्लंडमध्ये राहत आहे. ब्रिटिश पासपोर्टसाठी, यूकेमध्ये ४ वर्षे राहणे आवश्यक आहे. मोहम्मद अमीर पुढील वर्षी ब्रिटनमध्ये ४ वर्षे पूर्ण करणार आहे. यानंतर पाकिस्तानच्या या माजी वेगवान गोलंदाजाला ब्रिटिश पासपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे यानंतर तो आयपीएलमध्ये खेळणार का? जाणून घ्या.

आयपीएल खेळण्यावर काय म्हणाला मोहम्मद आमिर?

आयपीएल २०२४मध्ये खेळणार का? या प्रश्नाच्या उत्तरात मोहम्मद अमीर म्हणाला की, “यात अजून एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. त्यावेळी काय परिस्थिती असेल, आत्ताच सांगता येणार नाही… मी पुढे जात असलो तरी एक वर्षानंतर मी कुठे असेल माहीत नाही. माझे भविष्य कोणालाच माहीत नाही… एकदा मला पासपोर्ट मिळाला की नक्की मी यावर विचार करेन. मात्र, मी अजून चांगली संधी शोधणार आहे.”

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम

हेही वाचा: Ashes Series 2023: तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, जेम्स अँडरसन ऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

मोहम्मद अमीरने स्पष्टपणे सांगितले की, “ब्रिटिश पासपोर्ट मिळाल्यानंतर तो इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही.” तो पुढे म्हणतो की, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. जर भविष्यात मला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी तयार आहे. आयपीएल २०२४मध्ये खेळण्याचा माझा विचार आहे पण संधी मिळेल का? हे आताच सांगू शकत नाही.”

हेही वाचा: Ajit Agarkar Salary: मुख्य निवडकर्त्याचे वेतन तीन पटीने वाढले, BCCI अजित आगरकरवर का आहे मेहरबान? जाणून घ्या

जर अल्लाची इच्छा असेल तर मी पुन्हा पाकिस्तानकडून खेळेन– मोहम्मद आमीर

मोहम्मद अमीर पुढे म्हणाला की, “जर अल्लाहची इच्छा असेल तर मी नक्कीच पुन्हा पाकिस्तानसाठी खेळेल.” खरे तर पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर रमीझ राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. रामजी राजा यांनी पीसीबीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर मोहम्मद अमीरच्या पुनरागमनाबद्दल अटकळ बांधली जात आहे. याशिवाय ब्रिटिश पासपोर्ट मिळाल्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळू शकतो, असे मानले जात आहे. विशेष म्हणजे IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच २००८ मध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला होता.