Smriti Mandhana Playing Piano Video : भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटर स्मृती मंधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्मृती मंधाना पियानोवर सरगम वाजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्मृतीचा हा खास व्हिडीओ प्रसिद्ध गायक पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्मृती मंधाना आणि गायक पलाश मुच्छल यांच्या रिलेशनबद्दल चर्चा अजूनही सुरू आहेत. मात्र या दोघांनीही यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, स्मृती मंधानाने काही दिवसांपूर्वी पलाश मुच्छलच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो आणि कॅप्शन पोस्ट केले होते.
स्मृती मंधानाचा व्हिडीओ व्हायरल –
प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक पलाश मुच्छलने शुक्रवारी रात्री आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन त्याने लिहले की, ‘माझी नवीन विद्यार्थीनी.’ शेअर केलेल्या या व्हिडीओ नॅशनल क्रश आणि स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना पियानोवर सरगम वाजवताना दिसत आहे. त्यानंतर आनंदाने हात उंचावताना दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. तसेच हा व्हिडीओ १६ तासात एक लाख तीस हजारहून अधिक लोकांना आवडला आहे.
स्मृतीने पलाश दिल्या होत्या शुभेच्छा –
काही दिवसांपूर्वी स्मृती मंधानाने आपल्या कथित बॉयफ्रेंडला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या होत्या. स्मृतीने एक फोटो पोस्ट करत पलाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण यावेळी तिने शेअर केलेला फोटो खूपच खास होता. त्यामुळे त्यांच्या रिलेशनबद्दल चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना कॅप्शन लिहले होते, ‘माझ्या सर्वात मोठ्या फॅनला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
पलाश मुच्छलच्या हातावरील टॅटूची चर्चा –
पलाश मुच्छलच्या हातावर ‘एसएम १८’ असा टॅटू आहे. चाहत्यांनी या टॅटूचा संबंध स्मृती मानधनच्या जर्सी क्रमांकाशी जोडला आणि हा टॅटू खास तिच्यासाठी असल्याचे सांगितले. स्मृती आणि पलाश अनेकदा एकमेकांसोबत फोटो स्टोरी शेअर करतात. पलाश स्मृतींचे सामने बघायला जातो आणि स्मृती पलाशच्या विविध कार्यक्रमात भाग घेते. स्मृती मंधाना आजपर्यंत तिच्या आणि पलाशच्या नात्याबद्दल बोलली नाही, पण या पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल पुष्टी कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा – Brydon Carse : इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजावर बंदी, सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई
कोण आहे पलाश मुच्छल?
पलाश मुच्छल हा गायक आणि संगीतकार आहे. पलाश मुच्छल हा गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. गायनासोबतच पलाश दिग्दर्शनातही सक्रिय आहे. त्याचा जन्म २२ मे १९९५ रोजी झाला अलून तो हा मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी आहे. त्याचे वडील राजकुमार मुच्छल हे एका खाजगी कंपनीत काम करतात आणि आई अमिता मुच्छल या गृहिणी आहेत. पलाश मुच्छाल आणि तिची मोठी बहीण पलक मुच्छल गरीब मुलांसाठी निधी उभारण्यासाठी भारतात आणि परदेशात स्टेज शो करतात. ते हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या मुलांना उपचारासाठी मदत करतात. अहवालानुसार, त्यांनी आतापर्यंत हजारो हृदयरोगी मुलांचे प्राण वाचविण्यात मदत केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd