मध्यंतराला १-२ अशा पिछाडीवर असलेल्या पॅलेस्टाईन संघाने भारताविरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत ४-२ असा विजय मिळविला. अश्रफ अल्फावाघरा याने तीन गोल करीत पॅलेस्टाईनच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
अतिशय उत्साहपूर्ण झालेल्या या लढतीत भारताने पूर्वार्धात वर्चस्व गाजविले. १७व्या मिनिटाला क्लिफोर्ड मिरांडा याने गोल करत भारताचे खाते उघडले. तथापि ३०व्या मिनिटाला पॅलेस्टाईनच्या अश्रफ याने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ३९व्या मिनिटाला भारताच्या सईद नाबी याने जोरदार चाल करीत गोल केला आणि २-१ अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात पॅलेस्टाईन संघाला सूर गवसला. हुसम आबुसलाहने ४६व्या मिनिटाला गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ अश्रफने आक्रमक चाल करीत खणखणीत गोल केला. ६७व्या मिनिटाला त्याने पुन्हा एकदा सुरेख चाल करीत संघाचा चौथा गोल नोंदविला. याच ४-२ अशा आघाडीवर पॅलेस्टाईन संघाने सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा