भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पांड्या टी२० मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये होणार असून त्यासाठी दोन्ही संघ येथे पोहोचले आहेत. रांचीला पोहोचल्यावर पांड्याने प्रथम संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग यांची भेट घेतली. हार्दिकने त्याच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोबतचे त्याचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन्ही खेळाडू विंटेज बाइकवर एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत पांड्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शोले २ चा दुसरा भाग लवकरच येत आहे.’
धोनी-हार्दिक यांचे खास नाते आहे
जेव्हा जेव्हा भारतीय संघ रांचीला जातो तेव्हा संघातील खेळाडू धोनीला नक्कीच भेटतात. तर हार्दिक पांड्याला धोनीसोबत एकत्र मानले जाते. पांड्याने स्वतः अनेकदा सांगितले आहे की तो माहीभाईकडून प्रेरणा घेतली असून मैदानावर कर्णधार म्हणून शांत कसे राहायचे हे शिकलो आहे. पांड्या अनेकदा धोनीसोबत वेगवगळ्या पार्टीमध्ये दिसला आहे.
टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार हार्दिक पांड्या
असे मानले जाते की भारतीय संघ संक्रमण बदलाच्या टप्प्यातून जात आहे आणि हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून तयार केले जात आहे. यामुळेच त्याच्याकडे सलग दोन टी२० मालिकेत भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर रोहित शर्माने अलीकडेच वन डे मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे. न्यूझीलंडपूर्वी हार्दिक श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतही भारतीय संघाचा कर्णधार होता. वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन रोहित शर्माला फक्त कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून कायम ठेवण्याच्या बाजूने आहे तर हार्दिक पांड्याला २०२४ च्या टी२० विश्वचषकापूर्वी नेता म्हणून तयार केले जात आहे.
भारत न्यूझीलंड टी२० मालिका वेळापत्रक
भारताने नुकतीच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. त्याचवेळी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारीला रांची येथे खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, दोन्ही संघांमधील दुसरा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जाईल, तर तिसरा आणि अंतिम टी२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.