ईशान किशन नेतृत्वाखाली भारतीय संघाने नामिबियाचा १९७ धावांनी धुव्वा उडवून एकोणीस वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा कर्णधार ईशान किसनने ऩाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतने या सामन्यातही आपला फॉर्म कायम ठेवत शतक झळकाविले. त्याने ९६ चेंडूत १४ चौकार व २ षटकारांसह १११ धावा केल्या.
भारताने नामिबीयासमोर विजयासाठी ३५० धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव ३८.५ षटकांत १५२ धावांत आटोपला. भारताकडून मयांक डागरने आणि अनमोलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी तीन, तर वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स काढल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in