झिम्बाब्वेमध्ये आयसीसी वर्ल्डकप २०२२ साठी पात्रता फेरीचे सामने सुरु आहेत. या पात्रता फेरीसाठी पापुआ न्यू गिनी संघानं आपला संघ पाठवण्यास असमर्थता दर्शवली आहे. महिला क्रिकेट संघातील काही जणांना करोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीचा संघ ६ नोव्हेबंरला झिम्बाब्वेला जाण्यापूर्वी क्वारंटाइन होता. या दरम्यान काही जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच पर्यायी खेळाडू नसल्याने पापुआ न्यू गिनी बोर्डाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्डकपसाठी कैया अरुआच्या नेतृत्वाखालील संघ वेस्ट इंडिड, नेदरलँड, आयर्लंड आणि श्रीलंकेसोबत खेळणार होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पापुआ न्यू संघ वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी येणार नसल्याचं आम्हाला दु:ख होत आहे. संघातील अनेकांना करोनाची लागण झाल्याने पर्याय नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. करोना नियम पाळत आम्ही पुढे जाऊ. पापुआ न्यू गिनी संघाबद्दल आम्हाला वाईट वाटतं. त्यांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली होती. आम्हाला आशा आहे की, लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील आणि एक संघ म्हणून नावलौकिक मिळवतील”, असं आयसीसी आयोजक प्रमुख ख्रिस टेटली यांनी सांगितलं.

झिम्बाब्वेमध्ये आयोजित पात्रता फेरीचे सामने महत्त्वाचे आहेत. पुढच्या वर्षी ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये आयीसीसी महिला वर्ल्डकप आहे. त्यामुळे पात्रता फेरीतून तीन महिला संघांची निवड होणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघाची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Papua new guinea withdrawn from women world cup qualifier 2021 rmt