भारताच्या देवेंद्र झाझरियाने पॅरालिम्पिक जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास रचला आहे. फ्रान्समधल्या लिऑन येथे अपंगांसाठी जागतिक अ‍ॅथलेटिक्सचे आयोजन करण्यात आले होते. पॅरालिम्पिक जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा देवेंद्र पहिला भारतीय ठरला आहे. ३२ वर्षीय देवेंद्र झाझरियाने सहाव्या प्रयत्नात (एफ-४६ गटात) ५७.०४ मीटर अंतरावर केलेली भालाफेक स्पर्धेत सर्वोत्तम ठरली आहे. स्पर्धेत मिळालेल्या यशावर देवेंद्र खूश असून गेल्या नऊ वर्षांपासून मी मेहनत करत होतो पण, त्या मेहनीतीचे योग्य ते चीज होत नव्हते. आज मी भरपूर खूश आहे. असे देवेंद्रने म्हटले आहे.   

Story img Loader