Paralympics 2024 Apan Tokito Oda celebration video viral : जपानच्या टोकिटो ओडाने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी व्हीलचेअर टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास घडवला आहे. आहे. मात्र, यानंतर टोकिटो ओडा ज्या पद्धतीने सुवर्णपदक जिंकल्याचे सेलिब्रेशन केले, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

अल्फी हेवेट एकेरीमध्ये आपल्या कारकीर्दीतील ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करू शकला नाही. त्याला पॅरालिम्पिक व्हीलचेअर टेनिस पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या २६ वर्षीय खेळाडूला जपानच्या टोकिटो ओडाने रोलँड गॅरोस येथे ६-२, ४-६, ७-५ असे पराभूत केले. या विजयानंतर ओडाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने जमिनीवर झोपून सेलिब्रेशन करताना आपल्या व्हीलचेअरची चाके पण काढली.

Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Mahavir Phogat Statement on Vinesh Phogat after join Congress party
Mahaveer Phogat on Vinesh : ‘विनेशला राजकारणातच रस होता तर तिने…’, काका महावीर फोगट यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता तिचा प्रचारही…
russian spy whale death
नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
musheer khan
Duleep Trophy: मुशीर खान ठरला भारत ‘ब’ संघाच्या विजयाचा शिल्पकार

टोकिटो ओडाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ –

यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली, तर कोर्ट फिलीप चॅटियर येथे खचाखच भरलेल्या प्रेक्षकांनी नेत्रदीपक सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंचे जोरदार स्वागत केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.

हेही वाचा – ‘पाकिस्तानला गौतम गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज…’, दानिश कनेरियाचे वक्तव्य; म्हणाला, तो मागे न बोलता समोरच…

पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदकतालिकेत अव्वल कोण?

पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदकतालिकेबद्दल बोलायचे झाले, तर चीनचा दबदबा कायम आहे. पदकतालिकेत चीन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ९४ सुवर्ण पदकांसह चीन ७३ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांसह अव्वल स्थानावर आहे. अशा प्रकारे चीनने २१६ पदके जिंकली आहेत. भारत ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह १६ व्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी २९ पदके जिंकली आहेत. सध्या चीन व्यतिरिक्त टॉप-५ देशांच्या यादीत ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नेदरलँड आणि इटली यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Mahaveer Phogat on Vinesh : ‘विनेशला राजकारणातच रस होता तर तिने…’, काका महावीर फोगट यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता तिचा प्रचारही…

ग्रेट ब्रिटनने ४७ सुवर्ण पदकांव्यतिरिक्त ४२ रौप्य आणि ३१ कांस्य पदके जिंकली आहेत. अशा प्रकारे ग्रेट ब्रिटनने १२० पदके जिंकली आहेत. यानंतर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या खेळाडूंनी ३६ सुवर्ण पदके, ४१ रौप्य पदके आणि २५ कांस्य पदके जिंकली आहेत. अशा प्रकारे, अमेरिकेच्या खेळाडूंनी १०२ पदके जिंकली आहेत. तर नेदरलँड चौथ्या स्थानावर आहे. २६ सुवर्ण पदकांसह, नेदरलँड्सने १७ रौप्य पदके आणि १२ कांस्य पदके जिंकली आहेत. तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या इटलीने 24 सुवर्ण पदकांसह १५ रौप्य पदके आणि ३१ कांस्य पदके जिंकली आहेत.