Paralympics 2024 Jodie Grinham won bronze medal at Paris : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गर्भवती पॅरा-तिरंदाज जोडी ग्रिनहॅमने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये पॅरालिंपिक्सजीबी संघ सहकारी आणि गतविजेत्या फोबी पॅटरसन पेनला हरवून कांस्यपदक जिंकले. तिने सात महिन्यांची गर्भवती असून कांस्यपदक जिंकले. जोडीला आशा आहे की तिची कामगिरी इतर अनेक मातांना प्रेरणा देईल. कारण जोडीच्या जन्मापासूनचा प्रवास सोपा नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोडी ग्रिनहॅमचा जन्म झाला तेव्हा तिच्या डाव्या हाताला बोटं नव्हती. फक्त अर्धा अंगठा होता. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. याआधी ती तीनदा गरोदर राहूनही ती आई होऊ शकली नव्हती. अशा परिस्थितीत गर्भधारणेदरम्यान तिरंदाजी करणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही कठीण असते. सेमीफायनल सामन्यादरम्यान जोडी ग्रिनहॅमला खूप त्रास झाला. या सामन्यादरम्यान तिचे मूल पोटात हालचाल करत होते आणि ती हरली. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

जगात येण्यापूर्वी पोडियमवर पोचणारे पहिले मूल –

पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी, जोडीने शेवटचा शनिवार व रविवार पॅरिसमधील रुग्णालयात घालवला होताा. कारण तिचे बाळ हालचाल करत नव्हते. तिच्या मुलाच्या हृदयावर सतत लक्ष ठेवण्यात येत होते. प्रशिक्षणादरम्यान, ती मुलाच्या अनपेक्षित हालचालींची तयारीही करत होती. ती आता तिच्या मुलाला सांगू शकणार आहे की, जगात येण्यापूर्वीच तो पोडियमवर पोहोचला होता.

हेही वाचा – Paris Paralympics 2024 : रुबिना फ्रान्सिसने नेमबाजीत जिंकले कांस्यपदक, भारताला तिसऱ्या दिवशी मिळाले पाचवे पदक

जोडी ग्रिनहॅमचा गर्भवती महिलांना संदेश –

जोडी ग्रिनहॅमने तिच्याच देशाची ऍथलीट फोबी पॅटरसन पाइन हिला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिनी आहेत. ३१ वर्षीय जोडीने कांस्यपदक जिकून इतिहास घडवला आणि गर्भवती महिलांना एक संदेश दिला. ती म्हणाली, “आयुष्यात तुम्हाला जे करायचं ते करा. जर तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल आणि बाळ निरोगी आणि सुरक्षित असेल, तर तुम्ही तुमचे कोणतेही काम करत राहू शकता. यामध्ये कोणतीही अडचण येत नाही.”

हेही वाचा – Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी

जोडी ग्रिनहॅम पुढे म्हणाली, “ऑर्थोडॉक्स श्रद्धा पाळू नयेत. तुम्हाला जॉगिंग करायचे असेल किंवा जिमला जायचे असेल तर काही फरक पडत नाही. त्याचा तुमच्यावर किंवा बाळावर कोणताही परिणाम होणार नाही ना याची काळजी घ्या. या सर्वांसाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. जर तुमच्या डॉक्टरांनी परवाणगी दिली, तर तुम्ही तुम्हाला हवं ते करु शकता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paralympics 2024 archer jodie grinham first pregnant woman to win medal in history at paris know about her vbm