Paralympics 2024 Day 4 Manisha Ramdas and Nitya Sri Sivan reached semifinals: पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकूण पाच पदके जिंकली आहेत. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. चौथ्या दिवशी, पदकांची संख्या दुहेरी अंकात पोहोचू शकेल असे वाटले होते, मात्र भारताची पदरी निराशा आली आहे. परंतु, बॅडमिंटनपटू मनीषा रामदास आणि नित्या श्री सिवनने उपांत्य फेरीत आणि तिरंदाज राकेश कुमारने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनीषा-नित्या उपांत्य तर राकेश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक –

भारताची बॅडमिंटन स्टार मनीषा रामदास हिने महिला एकेरीच्या SU5 प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मामिको टोयोडा हिचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला. त्याचबरोबर नित्या श्री सिवनने चमकदार कामगिरी केली आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकून तिने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. नित्याने पोलंडच्या ऑलिव्हियाचा २१-४, २१-७ असा पराभव केला आहे. आता तिचा सामना चीनच्या लिन एस हिच्याशी होईल.

तसेच तिरंदाज राकेश कुमारने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. राकेशने इंडोनेशियन आर्चरचा पराभव केला आहे.

पॅरालिम्पिकच्या चौथ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खूपच खराब झाली. बॅडमिंटनपटू मनदीप कौरचा पॅरालिम्पिक २०२४ मधील प्रवास संपला आहे. तिचा नायजेरियाच्या मरियम बोलाजीने २१-८, २१-९ असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर पलक कोहलीलाही बॅडमिंटनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तिला इंडोनेशियाच्या खेळाडूने २१-१९, २१-१५ ने पराभूत केले.

हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज! काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावत दिले संकेत

रवी रोंगालीकडून निराशा –

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या रवी रोंगालीकडून पदक मिळवण्याची अपेक्षा होती, परंतु पुरुषांच्या F40 शॉट पुटच्या अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर राहून तो पदकापासून वंचित राहिला. गेल्या वर्षी चीनमधील आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या रवीने १०.६३ मीटरची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली असली, तरी तो पहिल्या तीनमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paralympics 2024 day 4 updates badmoton players manisha ramdas and nitya sri sivan reached semifinals rakesh kumar vbm