Paris Paralympics 2024 Hokato Sema Wins Bronze in Mens Shot Put F57 : असे म्हणतात की जेव्हा तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असते, तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये F57 श्रेणीतील शॉट पुट स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकून आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या माजी भारतीय लष्करी अधिकारी होकात होतोजे सेमाचींही अशीच कहाणी आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणारे ४० वर्षीय होकाटो हे नागालँडचे एकमेव खेळाडू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होकाटो यांनी १४.६५ मीटर फेक करून या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले, जे त्यांचे वैयक्तिक सर्वोत्तम देखील होते. या स्पर्धेत इराणच्या यासिन खोसरावीने चौथ्या प्रयत्नात १५.९६ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले, तर ब्राझीलच्या थियागो पॉलिनो डॉस सँटोसने १५.०६ मीटर फेक करून दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकले.

सीमेवर लढताना गमावला पाय –

होकाटो होतोजे ​​सेमा यांचा जन्म २४ डिसेंबर १९८३ रोजी नागालँडमधील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी असून चार भावंडांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. होकाटो मोठे झाल्यावर देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले. लहानपणापासूनच होकातो यांना देशसेवा करण्याची इच्छा होती. सैन्यात सेवा करत असताना, १४ ऑक्टोबर २००२ रोजी काउंटर घुसखोरी ऑपरेशन दरम्यान शोकांतिका घडली, जेव्हा ते माइन स्फोटाचे बळी ठरले आणि त्याचा डावा पाय गुडघ्याच्या खालून कट झाला.

हेही वाचा – Josh Inglis : जोश इंगलिसने ४३ चेंडूत झळकावले शतक, फक्त षटकार-चौकारांसह केल्या ७० धावा, मोडला मॅक्सवेल-फिंचचा विक्रम

२०१६ पासून खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली –

मात्र, असे असूनही होकाटो यांनी हार मानली नाही. या अपघातातून सावरल्यानंतर, होकाटो भारताचा समर्पित एक पॅरा ॲथलीट बनले. कारण सेमा यांचा फिटनेस पाहून पुण्यातील आर्टिफिशियल लिंब सेंटरमधील एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने त्यांना शॉटपुटमध्ये भाग घेण्याची प्रेरणा दिली. ज्यामुळे त्यांनी २०१६ पासून खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. यानंतर अवघ्या ८ वर्षांत ते पॅरालिम्पिक पदक विजेते बनले. होकाटो शॉट पुटमध्ये F57 वर्गात स्पर्धा करतात. F57 श्रेणी अशा खेळाडूंद्वारे लढविली जाते ज्यांना एका पायात सौम्य कमजोरी किंवा दोन्ही पायांमध्ये मध्यम कमजोरी आहे.

हेही वाचा – ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?

होकाटो सेमांची आतापर्यंतची कामगिरी –

होकाटोने शॉटपुटमधील अनेक पॅरा स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, प्रामुख्याने आशियाई पॅरा गेम्स २०२२. होकाटोने दमदार कामगिरी दाखवत आशियाई पॅरा गेम्समध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकले. याशिवाय २०२४ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये होकाटो चौथ्या स्थानावर होते. त्याचबरोबर मोरक्कन ग्रांप्री २०२२ मध्ये, होकाटो यांनी दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paralympics 2024 who is hokato sema win bronze in mens shot put f57 at paris paralympics for india ex army officer vbm