बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे साहाय्यक मयांक पारिख मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) विरोधात न्यायालयात गेले आहे. एमसीएने यंदाच्या द्वैवार्षिक निवडणुकीपासून बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना दूर ठेवण्याचा प्रस्ताव कार्यकारिणीत संमत करून घेतला होता. या निर्णयाविरोधात यापूर्वी रत्नाकर शेट्टी यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.
‘‘एमसीएच्या निर्णयाविरोधात मी शहर दिवाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. एमसीएने जो नियमांमध्ये बदल केला आहे, तो निर्णय त्यांनी सर्वसाधारण सभेत घेतलेला नाही. या माझ्या याचिकेची सुनावणी शुक्रवारी होणार आहे,’’ असे पारिख म्हणाले. एमसीएने २३ जुलैला कार्यकारिणीच्या बैठकीत बीसीसीआय, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व आयपीएल फ्रॅन्चायझींमधील कर्मचारी याचप्रमाणे प्रशिक्षक यांना एमसीएची निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा