Paris 2024 Paralympics India’s Top Medal Contenders: पॅरिस पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडला असून खेळांना सुरूवात झाली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पॅरा अ‍ॅथलेटिक्सने सर्वाेत्कृष्ट कामगिरी करत यंदा पदकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी, भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह १९ पदकं जिंकली होती. या खेळांप्रमाणेच, यंदाही पुन्हा एकदा भारताच्या पदकांची सर्वाधिक टक्केवारी पॅरिसमध्येही अपेक्षित आहे. परंतु यावेळी, पॅरा बॅडमिंटन, नेमबाजी पॅरा स्पोर्ट आणि पॅरा तिरंदाजी या खेळांचे निकालही भारताच्या पदकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. पॅरालिम्पिकमधील असे काही महत्त्वाचे ७ खेळाडू आपण पाहणार आहोत, ज्यांच्याकडून पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे.

हेही वाचा – Ravindra Jadeja Wife: रवींद्र जडेजाची आमदार पत्नी कबरेभर पाण्यात उतरून करतेय लोकांची मदत, जडेजाच्या कमेंटनेही वेधलं लक्ष, पाहा VIDEO

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

सुमित अंतिल (भालाफेकपटू – F64)

टोकियो पॅरालिम्पिकमधून सुमित अंतिल सर्वांच्या परिचयाचा झाला. त्याने टोकियोमध्ये जागतिक विक्रमी थ्रोच्या मालिकेसह सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जिथे त्याने अखेरीस ६८.५५ मीटरसह सुवर्ण जिंकले. सुमितने त्यानंतर दोनदा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये (पॅरिस २०२३ आणि कोबे २०२४), तसेच गेल्या वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हांगझोऊमध्ये त्याने ७३.२९ मीटर थ्रोसह पुन्हा जागतिक विक्रम मोडला. तो केवळ उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक नाही तर भारताच्या पॅरा ॲथलेटिक्स कार्यक्रमाचा ध्वजवाहक देखील आहे.

मरियप्पन थंगावेलू (पुरुष उंच उडी – T63)

मरियप्पन थंगावेलू हा दोन वेळचा पॅरालिम्पिक पदक विजेता आहे. त्याने रिओ २०१६ (T42) मध्ये १.८९ मीटर क्लिअरन्ससह सुवर्ण जिंकले आणि टोकियोमध्ये १.८६ सह रौप्यपदक पटकावले. गेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये थंगवेलूने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती आणि त्याची हिच शानदार कामगिरी आपण यंदा पॅरिसमध्येही पाहणार आहोत. शरद कुमार आणि शैलेश कुमार हे देखील ८ जणांच्या शर्यतीत मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे भारतासाठी पदकाच्या दृष्टीने ही एक चांगली बाब आहे. अमेरिकेचे सॅम ग्रेवे आणि एझरा फ्रेच हे पदकासाठी भारतीयांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील.

हेही वाचा – Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल

अवनी लेखरा (नेमबाजी)

पॅरिसमध्ये मनू भाकेरच्या आधी टोकियोमध्ये अवनी लेखरा हिने नेमबाजीत मोठी कामगिरी केली आहे. गेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या अवनी हिने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या इतिहासातील पहिली महिला पॅरालिम्पिक चॅम्पियन बनलेल्या अवनीने सुवर्णपदकासह दोन पदके जिंकली होती. पॅरिसमध्ये, ती तीन स्पर्धांमध्ये भाग सहभागी होणार आहे. महिलांची १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, मिश्रित १० मीटर एअर रायफल प्रोन, महिलांची ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स SH1. १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत ती पुन्हा एकदा सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असेल. नेमबाजीमध्ये, मनीष नरवाल हा पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल SH1 मध्ये एक मजबूत स्पर्धक आहे जिथे तो राज्याचा पॅरा अ‍ॅथलीट आणि जागतिक चॅम्पियन आहे.

हेही वाचा – David Malan Retirement: इंग्लंडच्या वर्ल्ड नंबर वन खेळाडूची क्रिकेटधून निवृत्ती, कसोटीमधील कामगिरीबद्दल मनात खंत; पाहा नेमकं काय म्हणाला?

शीतल देवी (तिरंदाजी)

अवघ्या १७ वर्षांची शीतल देवी सर्वांच्या परिचयाची आहे, जिने आपल्या अद्वितीय कामगिरीने सर्वांनाच प्रेरित केलं आहे. आर्मलेस तिरंदाज जगात दुर्मिळ आहेत आणि शीतलने या खेळात उतरल्यानंतर अल्पावधीतच वेगवान प्रगती केली. ती स्वतः पायोनियर मॅट स्टुटझमन आणि पिओटर व्हॅन मॉन्टॅगू यांच्यासह पायांच्या मदतीने तिरंदाजी करणाऱ्या तीन तिरंदाजांपैकी एक आहे. शीतल महिला वैयक्तिक कंपाऊंड ओपन आणि मिश्र सांघिक कंपाऊंड ओपन या दोन स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. तिने गेल्या वर्षी प्लझेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. टोकियोमध्ये इतिहास रचणारा हरविंदर सिंग, याने भारताचे पहिले तिरंदाजी पदक जिंकले होते.

कृष्णा नगर (बॅडमिंटन पुरूष एकेरी SH6)

पॅरिसमधील पुरुष बॅडमिंटनपटूंमध्ये बरेच खेळाडू पदकांचे दावेदार आहेत, परंतु सर्वांच्या नजरा कृष्णा नगरवर असतील, जो टोकियोमधील सुवर्णपदक विजेता आहे. अलीकडेच १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई झालेल्या प्रमोद भगतच्या अनुपस्थितीत, कृष्णा हा तीन वर्षांपूर्वीचा एकमेव पुनरागमन करणारा चॅम्पियन आहे. तो तिसरा सीडेड बॅडमिंटनपटू आहे. टोकियो कांस्यपदक विजेते सुहास यथीराज (SL4) आणि नितेश कुमार (SL3) या भारतीय पुरुषांना टॉप सीडिंग देण्यात आले आहे.

मनिषा रामदास (बॅडमिंटन, महिला एकेरी SU5)

१९ वर्षीय मनिषा रामदास हिच्यावर महिला बॅडमिंटन सामन्यांमध्ये नजर असेल. मनिषाने २०२२ च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकआणि यंदाच्या खेळांमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. भारताची तुलसीमाथी मुरुगेसन ही या प्रकारात टॉप सीडेड खेळाडू आहे, परंतु मनीषाने बॅडमिंटन एकेरीमध्ये अधिक यश मिळवले आहे. चीनचा यांग किउ झिया विद्यमान पॅरालिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन म्हणून पसंतीची सुरुवात करेल. इतरत्र, निथ्या श्री सुमाथी सिवन ही SH6 मध्ये अव्वल मानांकित आहे तर टोकियो पॅरालिम्पियन पलक कोहली दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेईल आणि ती तिचे पहिले पदक मिळविण्यासाठी उत्सुक आहे.

भाविना पटेल( महिला एकेरी – WS4)

टोकियोमध्ये भारतीय संघाने पटकावलेल्या पदकांपैकी एक महत्त्वपूर्ण पदक टेबल टेनिसमध्ये आले होते. भाविना पटेलने टेबल टेनिसच्या जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावर असताना रौप्यपदक जिंकले, हे देशाचे ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमधील पहिले टेबल टेनिस पदक आहे. तिने उपांत्य फेरीत रिओ २०१६ची सुवर्णपदक विजेता बोरीस्लाव्हा पेरिक-रॅन्कोविक आणि उपांत्य फेरीत रौप्यपदक विजेत्या मियाओ झांगचा पराभव करून उच्च श्रेणीतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. भाविनाचा चीनविरुद्धचा विजय विशेषतः प्रभावी होता. यावेळी, भाविना या स्पर्धेत चौथी सीडेड खेळाडू म्हणून प्रवेश करत आहे आणि तिला पुन्हा एकदा पेरिक-रॅन्कोविच आणि काही चिनी प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अटीतटीची लढत द्यायची आहे. भाविनाने सोनल पटेलसह महिला दुहेरी – WD10 मध्ये देखील प्रवेश केला आहे.