Paris 2024 Paralympics Schedule, Live Streaming, Start Date, Full Schedule : उन्हाळी ऑलिम्पिकनंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा खेळाडूंचा मेळावा होणार आहे. पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा ॲथलीट येथे पोहोचतील. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेतील २२ खेळांमध्ये ४४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५४९ पदके असतील, त्यापैकी २३६ पदके महिलांसाठी असतील.

भारत यावेळी पॅरालिम्पिकमध्येही आपले सर्वात मोठे पथक पाठवत आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १८ पदके जिंकली असून यावेळी २५ पदके जिंकण्याच्या निर्धारानाने भारत या स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतातील पॅरालिम्पिक खेळाडूंची पहिली तुकडी पॅरिसला रवाना झाली आहे. ही तुकडी शेवटचा पॅरालिम्पिक सुवर्णपदक भालाफेकपटू सुमित अंतिलच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी रवाना झाली आहे.

IND vs ENG ODI Series Live Streaming Details How to Watch India vs England 1st ODI Match
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे मालिका दोन विविध स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
India Women's Won U19 T20 World Cup 2025 2nd Time in a Row vs South Africa
India Won U19 Women’s T20 WC: भारताच्या महिला संघाने घडवला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावले U19 टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
India to Play Against South Africa in U19 Womens T20 World Cup 2025 What is the Match Timing
U19 Women’s T20 World Cup Final: भारताचा महिला संघ U19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत कोणाविरूद्ध भिडणार? जाणून घ्या सामन्याची वेळ
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
mumbai mega block in between Vangaon-Dahanu Road station for flyover foundation work on saturday and sunday
वाणगाव, डहाणू रोडदरम्यान शनिवार, रविवारी ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
  • पॅरालिम्पिक गेम्स २०२४ कधी सुरू होतील?

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणार आहे, जिथे काही काळापूर्वी उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – Paralympic 2024 : कोण आहेत चंदू चॅम्पियन? ज्यांनी देशासाठी ९ गोळ्या झेलल्या आणि सुवर्णपदकही पटकावलं

  • पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा कधी होणार?

पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

  • किती भारतीय सहभागी होतील?

या स्पर्धेत भारतातील एकूण ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरालिम्पिक तुकडी आहे. यापूर्वी टोकियोमध्ये भारतातील ५४ खेळाडू सहभागी झाले होते.

  • किती भारतीय महिला खेळाडू सहभागी होतील?

भारतीय तुकडीमध्ये ३२ महिला पॅरा ॲथलीट्सचा समावेश आहे.

हेही वाचा – Mohammad Rizwan : नाबाद १७१ धावांवर माघारी परतल्यानंतर मोहम्मद रिझवानने फेकली बॅट, VIDEO होतोय व्हायरल

  • भारत किती खेळांमध्ये सहभागी होणार आहे?

पॅरालिम्पिक स्पर्धेत २२ खेळांमध्ये खेळाडू आव्हान देतील. भारतीय खेळाडू १२ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.

  • भारत कोणत्या नवीन खेळांमध्ये सहभागी होणार आहे?

भारत प्रथमच पॅरा सायकलिंग, पॅरा रोइंग आणि ब्लाइंड ज्युडोमध्ये सहभागी होणार आहे.

हेही वाचा – Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

  • पॅरालिम्पिक खेळांचे लाइव्ह टेलिकास्ट आणि लाइव्ह स्ट्रिमिंग कोठे होईल?

पॅरालिम्पिक खेळांचे लाइव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स १८ चॅनेलवर होईल. त्याचबरोबर जिओ सिनेमावर या खेळांचे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.

Story img Loader