पॅरिस : क्रीडा वर्तुळातील सर्वात मोठी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना स्पर्धा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पॅरिस शहराला लष्करी तळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पॅरिसच्या सर्व रस्त्यांवरून पोलिसांच्या तुकड्या अहोरात्र गस्त घालताना दिसत आहेत. आकाशातून लढाऊ विमानांची गस्त वाढत आहे. सैनिकांचा ताफा मोक्याच्या जागांवर तळ ठोकून आहे. सीन नदीच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पडद्यासारखे भासणारे धातूचे कुंपण ऑलिम्पिकसाठी असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची जाणीव करून देत आहेत.

पॅरिसला अनेकदा दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. युक्रेन आणि गाझामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे हा तणाव अधिक वाढत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. फ्रान्सचे अफाट पोलीस सामर्थ्य, लष्कराची तसेच विविध ४० देशांकडून आलेली सुरक्षा मदत यामुळे पॅरिसमधील वातावरण अक्षरश: एखाद्या युद्ध तयारीसारखे भासत आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

ऑलिम्पिकसाठी यजमान पॅरिसने बहुतेक स्पर्धा केंद्र राजधानीतच केंद्रित केल्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था येथेच एकत्रित आलेली दिसून येत आहे. त्यातच उद्घाटन सोहळा बंदिस्त मैदानाऐवजी सीन नदीत उघड्यावर घेण्याच्या धाडसी निर्णयामुळे या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्याच वेळी सायबर हल्ल्यापासूनही बचाव करण्यासाठी तंत्रज्ञांच्या मदतीने ‘एआय’ या आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे.

हेही वाचा >>>ऑलिम्पिक मोहिमेसाठी बीसीसीआयने उघडला खजिना; ८.५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा!

अवकाशही सुरक्षा उपकरणांनी व्यापलेले आहे. राफेल लढाऊ विमाने, हवाई वाहतुकीवर पाळत ठेवणारी विमाने, ड्रोन आणि शार्पशूटर्सला घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स आणि दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केलाच तर, असे ड्रोन अक्षम करणारी उपकरणेही तैनात करण्यात आल्यामुळे आकाशातही वेगळीच छावणी दिसून येत आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी १५० कि.मी.चे हवाई परिसर नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच

ऑलिम्पिकसाठी ठेवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व अशीच आहे. स्पर्धेसाठी दाखल होणाऱ्या १०,५०० खेळाडूंसह लाखो क्रीडा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तब्बल ४५ हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, त्यांना १० हजार लष्करी सैनिकांच्या तुकडीची जोड देण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या छावण्या अशा आहेत की, शहरातील कोणत्याही ऑलिम्पिक केंद्रावर सुरक्षा जवान ३० मिनिटांत पोहोचू शकतात. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठी लष्करी छावणी असल्याचे मानले जात आहे.