Paris Olympic 2024: यंदाच्या ऑलिम्पिकचा (Paris Olympic 2024) उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असून ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली आहे. या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातून खेळाडू आले आहेत. खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकबद्दल वेगळाच उत्साह आहे. सर्वच खेळाडू पदक मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. पण याचदरम्यान ऑलिम्पिकच्या सुरुवातीला प्रेमाचे क्षणही पाहायला मिळत आहेत. नुकतेच अर्जेंटिनाच्या एका खेळाडूने आपल्या जोडीदाराला सर्वांसमोर प्रपोज केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live Updates : मनू भाकर आणि रिदम सांगवान यांच्याकडून पदकाची आशा

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

ऑलिम्पिकच्या सुरूवातीला खेळाडूने हॉकी प्लेअर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

ऑलिंपिक गेम्सने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर अर्जेंटिनाच्या दोन खेळाडूंच्या या प्रपोजलचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. अर्जंटिनाचा हँडबॉल खेळाडू पाब्लो सिमोनेट (Pablo Simonet) याने अर्जेंटिना देशाची हॉकी खेळाडू मारिया कॅम्पॉय (Maria Campoy) हिला ऑलिम्पिकच्या सुरूवातीलच प्रपोज केलं आहे. दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पाब्लो सिमोनेट हा अर्जेंटिना पुरुष हँडबॉल संघाचा सदस्य आहे. तो अर्जेंटिना संघासोबत पॅरिसमधील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आला आहे. अर्जेंटिनाच्या महिला हॉकी संघाची खेळाडू मारिया कॅम्पॉय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे.

हेही वाचा – IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अ‍ॅप

ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यापूर्वी संपूर्ण अर्जेंटिना संघाचा फोटो काढला जात होता, तेव्हा पाब्लो ग्रुपमधून बाहेर आला आणि त्याच्या हातात अंगठी होती. त्याने सर्वांसमोर मारियाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. मारियाने पाहताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिचा या क्षणावर विश्वास बसत नव्हता. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि पाब्लोने तिला अंगठी घातली. यानंतर सर्वच त्या दोघांच्या आनंदात सामील झाले.

ऑलिम्पिक खेळांबद्दल बोललो तर भारतीय पुरुष आणि महिला तिरंदाजी संघाने अप्रतिम कामगिरी केली. भारतीय महिला संघ पात्रता क्रमवारीत चौथ्या स्थानावर राहून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला. दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोनंतर संघ चौथ्या स्थानावर आहे. तर तरुणदीप राय, धीरज आणि प्रवीण जाधव यांच्या पुरुष संघाने पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Story img Loader