Paris Olympics 2024 Day 10 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशीही भारताच्या पदकसंख्येत कोणतीही वाढ झाली नाही. सोमवारी भारताच्या हातातून दोन पदकं निसटली. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनकडून पदकाची अपेक्षा होती पण त्याला चांगल्या खेळीनंतरही पराभव पत्करावा लागला.. कांस्यपदकाच्या लढतीत त्याला मलेशियाच्या ली जी जियाने पराभूत केले. नेमबाजीत महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका या जोडीला स्कीट मिक्स सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत १ गुणाने चीनकडून पराभव पत्करावा लागला.
कुस्तीपटू निशा दहियाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे आघाडी घेतल्यानंतरही महिलांच्या ६८ किलो वजनी गटातील कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला उत्तर कोरियाच्या पाक सोल गमकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर भारताचा धावपटू अविनाश साबळेने ३००० मी. अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. पॅरिसमध्ये भारताने आतापर्यंत केवळ तीन पदके जिंकली आहेत.
India at Paris Olympic 2024 Day 10 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या दहाव्या दिवसाचे हायलाईट्स
१.३० वा - टेबल टेनिस पुरूष संघ
भारत वि चीन
१.५० वा - पुरूष भालाफेक (पात्रता फेरी)
नीरज चोप्रा, किशोर जेना
२.५० वा - महिला ४०० मी शर्यत रिपेचेज राऊंड
किरन पहल
३.०० वा - महिला ५० किलो वजनी गट कुस्ती
विनेश फोगाट
रात्री १०.३० वा - हॉकी उपांत्य सामना
भारत वि जर्मनी
भारताचा धावपटू अविनाश साबळेने ३००० मी अडथळा शर्यतीच्या पात्रता फेरीत चाणाक्षपणे शर्यत करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ३००० मी. अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठणारा अविनाश साबळे पहिला भारतीय ठरला आहे. अविनाश पात्रता फेरीत पाचवा येत त्याने 8:15.43 अशी वेळ नोंदवली.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820513637129167248
भारताचा सर्वात्कृष्ट धावपटू अविनाश साबळेच्या ३००० मी. अडथळा शर्यतीला सुरूवात झाली आहे. यामध्ये अविनाश साबळे पुढे आहे.
भारताचा धावपटू अविनाश साबळेची पात्रता फेरी सुरू होणार आहे. अविनाश पुरूषांच्या 3000 मी. अडथळा शर्यतीत सहभागी होणार आहे.
भारताची कुस्तीपटू निशा दहिया सुरूवातीपासून चांगल्या लयीत होती आणि हा सामना तीच जिंकणार हे निश्चित दिसत होतं, पण तिला सामना खेळतानाच झालेल्या दुखापतीमुळे उपांत्यपूर्व सामन्यात 8-10 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. निशा दहियाच्या पराभवासह तिचा ऑलिम्पिकमधील प्रवासही संपला आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820473407831433493
भारताची कुस्तीपटू निशा दहिया ६७ किलो वजनी गटात युक्रेनच्या तेतियानाचा ६-४ ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिचा सामना आता दक्षिण कोरियाच्या कुस्तीपटूविरूद्ध होणार आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820454469143777676
बॅडमिंटन पुरूष एकेरीमधील कांस्यपदकाचा सामना सुरू होता. लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकत चांगली सुरूवात केली पण दुसरा आणि तिसरा सेट गमावत पराभव पत्करावा लागला आहे. लक्ष्यने चौथ्या स्थानी राहत ऑलिम्पिक २०२४ च्या मोहिमेचा शेवट केला आहे. पण एकंदरीतच भारताच्या या २२ वर्षीय खेळाडूने बड्या बड्या बॅडमिंटनपटूंना तगडी टक्कर दिली आणि संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. लक्ष्य सेनच्या पराभवासह गेल्या १२ वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवण्याची भारताची परंपरा यंदा मोडली गेली.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820455347154280734
लक्ष्य सेन कांस्यपदकासाठीचा सामना खेळत आहे. या सामन्यात लक्ष्यच्या उजव्या हाताला झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होत आहे. त्यावर पट्टी बांधून लक्ष्य हा अटीतटीचा सामना खेळत आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820452730353205300
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका यांच्या स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत एका गुणाने 43-44 मागे राहिले. यासह भारताच्या या जोडीने चौथे स्थान पटकावले. तर चीनच्या जोडीने कांस्यपदक आपल्या नावे केले आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820450535948054530
लक्ष्य सेन आणि मलेशियाच्या ली मधील कांस्यपदकातील दुसरा सामना सुरू आहे. पहिला सेट लक्ष्यने तर दुसरा सेट 16-21 च्या फरकाने मलेशियाने जिंकला आहे. आता तिसरा आणि निर्णायक सेट खेळवला जाणार आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820448827389923751
लक्ष्य सेन आणि ली चा दुसरा सेट खूप अटीतटीचा सुरू आहे. लक्ष्यने सुरूवातीला आघाडी मिळवली होती. पण आता आघाडी मलेशियाच्या लीकडे आहे. 16-19 सह ली पुढे आहे.
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका यांच्या स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेच्या कांस्यपदक सामन्यात दोन शॉटच्या सीरीजनंतर दोन्ही संघांची संख्या 13-13 अशी समान आहे. तीन सीरीजनंतरही संख्या 20-20 अशी समान आहे.
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका यांच्या स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेच्या कांस्यपदक सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय जोडीचा सामना चीनच्या जोडीसोबत होणार आहे. पहिल्या शॉटनंतर भारत-7 चीन-8 असा स्कोअर आहे.
बॅडमिंटनच्या कांस्यपदकासाठीच्या सामन्यात लक्ष्य सेनने १३-२१ च्या फरकाने पहिला सेट जिंकला आहे. यासह लक्ष्यकडे आता १-० अशी आघाडी आहे. लक्ष्य पहिल्यापासूनच चांगली सुरूवात करत आघाडीसह खेळत आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820442410658279535
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीचा सामना सुरू झाला आहे. लक्ष्यचा सामना मलेशियाच्या ली झी जिया याच्याशी होत आहे. लक्ष्यने आघाडी घेत सामन्याला चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने पहिले ११ गुण मिळवत सामन्याला चांगली सुरूवात केली.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820439576508276985
भारताचे खेळाडू एकाचवेळी पदकासाठी दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळणार आहेत. लक्ष्य सेन कांस्यपदकासाठी बॅडमिंटन सामना खेळणार आहे. तर स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका चीनविरूद्ध कांस्यपदकाचा सामना खेळणार आहे.
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका पॅरिस ऑलिम्पिक स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेतील कांस्यपदकासाठी पात्र ठरले आहे. भारतीय जोडीने पात्रता फेरीत १४६ स्कोअर केला. आता त्यांची कांस्यपदकासाठी चीनशी स्पर्धा होईल. कांस्यपदकाचा सामना संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820416592787738759
भारताची किरण पहल हीट रेसमध्ये सातव्या स्थानावर राहिल्यानंतर महिलांच्या ४०० मीटरमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करू शकली नाही. आता ती रिपेचेज फेरीत धावणार आहे. किरणने ५२.५१ सेकंद वेळ नोंदवली, जी तिच्या मोसमातील वैयक्तिक सर्वोत्तम ५०.९२ सेकंदापेक्षा खूपच कमी आहे. डोमिनिकाच्या विश्वविजेत्या मारिलिडी पॉलिनोने ४९.४२ सेकंद वेळेसह तिची हीट जिंकली, त्यानंतर अमेरिकेची आलिया बटलर (५०.५२) आणि ऑस्ट्रियाची सुझान गोगेल-वाली (५०.६७) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820407433128505612
भारतीय महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाच्या टेबल टेनिस संघाचा पराभव केला आहे. त्यांनी हा सामना ३-२ अशा फरकाने जिंकला. हा सामना १६व्या राउंडचा म्हणजेच प्री क्वार्टर फायनलचा होता. हा सामना जिंकून टीम इंडिया आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. ज्यामध्ये मनिकाने तिचे दोन्ही एकेरी सामने जिंकले आणि श्रीजा/अर्चनाने दुहेरीचे सामने जिंकले. मनिकाने सलग तिन्ही सेट जिंकत भारताला पुढील फेरीत नेण्यात मदत केली.
मनिका बत्राने तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत प्रतिस्पर्धी पॅडलरला ११-५, ११-९ आणि ११-९ असे पराभूत केले आणि भारतासाठी इतिहास घडवला. तत्पूर्वी, श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांनी दुहेरीच्या सामन्यात एडिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा यांच्यावर ११-९, १२-१०, ११-७ असा विजय नोंदवून सामन्याची सुरुवात केली.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1820410451135717830
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज १० वा दिवस आहे. भारताला सोमवारी आपल्या पदकांची संख्या वाढवण्याची आशा आहे. भारताच्या खात्यात सध्या तीन पदके आहेत. आजपासून कुस्तीचे सामनेही सुरू होत आहेत. आज भारताच्या टेबल टेनिस महिला संघाने इतिहास रचला आहे.