Paris Olympic 2024 7 Aug Schedule: पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा ११ वा दिवस भारतासाठी खास ठरला. आता यासोबतच ७ ऑगस्टचं वेळापत्रक कसं असेल आणि विनेश फोगटचा अंतिम सामना कधी असेल जाणून घ्या. भारताने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली महिला कुस्तीपटू आहे. विनेश फोगटने पहिल्या सामन्यात विश्वविजेती जपानच्या युई सुसाकीचा पराभव केला. भारताच्या विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या खेळाडूचा ७-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत क्युबाचा कुस्तीपटूचा ५-० असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, नीरज चोप्राने याआधीच पहिल्या थ्रोमध्ये पात्रता मिळवली आहे. नीरज चोप्राने भालाफेक पात्रता फेरीच्या गट ब मध्ये ८९.३४ मीटर पहिला थ्रो केला. हा थ्रो त्याच्या सर्वोत्तम थ्रोपेक्षा ०.६० मीटर कमी आहे. तर भारताचा अखेरच्या क्षणांमध्ये हॉकीच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. जर्मनीने भारताचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. भारत त्यांचा कांस्यपदकाचा सामना ८ तारखेला खेळणार आहे.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Day 11 Live Updates: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या ११ व्या दिवसाचे लाईव्ह अपडेट्स

00:24 (IST) 7 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ७ ऑगस्टचं भारताचं वेळापत्रक

सकाळी ११ वा. – मिक्स्ड मॅरेथॉन रेस वॉक रिले (मेडल मॅच)

सुरज पन्वर, प्रियांका गोस्वामी

१२. वा – महिला एकेरी गोल्फ

दिक्षा डागर, अदिती अशोक

१.३० वा- टेबल टेनिस महिला संघ (उपांत्यपूर्व फेरी)

भारत वि जर्मनी

१.३५ वा – पुरूष उंच उडी (पात्रता फेरी)

सर्वेश कुशारे

१.४५ वा. – महिला १०० मी. अडथळा शर्यत

ज्योती याराजी

१.५५ वा. – महिला भालाफेक (पात्रता फेरी)

अन्नू राणी

२.३० पासून ५३ किलो वजनी गट कुस्ती

अंतिम पंघाल

९.४५ वा – महिला ५० किलो वजनी गट अंतिम फेरी

विनेश फोगट वि सारा हिल्डेब्रँडट

१०.४५ वा – पुरूष तिहेरी उडी (पात्रता फेरी)

प्रविण चित्रावळे, अब्दुल्ला अबुबकेर

११.०० वा – महिला ४९ किलो वजनी गट (मेडल मॅच)

मीराबाई चानू

मध्यरात्री १.१३ वा – पुरूष ३००० मी अडथळा शर्यत (अंतिम फेरी)

अविनाश साबळे

00:11 (IST) 7 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताचा पराभव

चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवली. भारतीय संघाने अखेरच्या सेकंदापर्यंत चांगली झुंज दिली पण अपयशी ठरले. आता भारतीय संघ कांस्य पदकासाठीचा सामना खेळणार आहे. भारतीय संघ ८ ऑगस्टला हा कांस्यपदकासाठीचा सामना खेळणार आहे.

00:03 (IST) 7 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: जर्मनीकडे आघाडी

उपांत्य सामन्यात जर्मनीने अखेरच्या क्वार्टरमध्ये गोल करत जर्मनीने ३-२ अशी आघाडी घेतली आहे. भारताला सामन्यात टिकून राहायचं असेल तर अखेरच्या ४ मिनिटात एक गोल करणं गरजेचं आहे.

23:45 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिसरा क्वार्टर

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ करत हा क्वार्टर आपल्या नावे केला. हरमनप्रीत आणि सुखजीतने मिळून गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला आहे. आता सामना संपायला शेवटची १५ मिनिटं शिल्लक आहेत.

23:35 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: सामना बरोबरीत

भारत-जर्मनीतील सेमीफायनल हॉकी सामना आता २-२ असं बरोबरीत आला आहे. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला दोन वेळा पेनल्टी शूटआऊटची संधी मिळाली. शेवटी दुसऱ्या वेळेला हरमनप्रीत सिंगने कमालीचा गोल करत स्कोअर बरोबरीत आणला.

23:25 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिसऱ्या क्वार्टरला सुरूवात

भारत वि जर्मनीमधील उपांत्य सामन्याचा तिसरा क्वार्टर सुरू झाला आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने एक गोल केला तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने दोन गोल करत आघाडी मिळवली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करत आघाडी घ्यायची आहे.

23:12 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: हॉकी सामना

भारत वि जर्मनीच्या हॉकी सामन्यात जर्मनीने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करत आघाडी मिळवली आहे. भारतीय संघ दुसरा गोल करण्याच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. सामना खूपच अटीतटीचा सुरू आहे.

22:45 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगट अंतिम फेरीत

विनेश फोगटने सेमीफायनल सामन्यात क्युबाच्या खेळाडूला ५-० अशा मोठ्या फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. विनेशने एकही संधी न देता डिफेंड करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. साक्षी मलिकनंतर कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश दुसरी खेळाडू आहे.

22:42 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताचा पहिला गोल

भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. या तिन्ही पेनल्टी कॉर्नरमध्ये भारताला तीन वेळा तीन रिपेनल्टी मिळाली आणि हरमनप्रीतने तिसऱ्या वेळेला पहिला गोल केला आहे. अशारितीने भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

22:40 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: हॉकी सामना

भारत वि जर्मनीच्या हॉकी उपांत्य सामन्यात कोणत्याही संघाने अजून एकही गोल करण्यात आलेला नाही. भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते पण भारत गोल करण्यात अपयशी ठरला.

22:37 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेशच्या सामन्याला सुरूवात

५० किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्याला सुरूवात झाली आहे. विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी होत आहे. यात विनेश १-० ने पुढे आहे.

22:26 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: हॉकी सामन्याला सुरूवात

भारत वि जर्मनीच्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील हॉकीच्या उपांत्य फेरीतील सामन्याला सुरूवात होत आहे. जर्मनी देशाचे राष्ट्रगीत आता सुरू आहे. तर त्यानंतर भारताचं राष्ट्रगीत होऊन सामन्याला सुरूवात होईल.

21:18 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: हॉकी सामना

भारताच्या हॉकी संघाचा उपांत्य फेरीचा सामना जर्मनीविरूद्ध रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे.

21:16 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगट

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिचा सेमीफायनल सामना १०.२५ वाजता क्युबाचा कुस्तीपटूशी खेळणार आहे.

17:32 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगटचा उपांत्य सामना

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने पाऊण तासात दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेशचा हा उपांत्य फेरीचा सामना आजच होणार आहे. विनेशचा उपांत्य फेरीचा सामना क्युबाची कुस्तीपचू गुझामीन हिच्याविरूद्धा रात्री १०.१३ ला होणार आहे.

16:22 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगटची सेमीफायनलमध्ये धडक

विनेश फोगटने युक्रेनच्या कुस्तीपटूचा पराभव करत ५० किलो वजन गटात ओक्साना लिवाचचा ७-५ च्या फरकाने विजय मिळवला. यासगह फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेशने धडक मारली.

16:12 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगाटच्या सामन्याला सुरूवात

भारताची धाकड गर्ल विनेश फोगाटने उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहे. यासह पहिल्या फेरीत शानदार पकड करत विनेशने २ गुणांची आघाडी मिळवली.

15:53 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भालाफेक

भालाफेकमध्ये भारताचा दुसरा खेळाडू किशोरी जेनाला भालाफेकच्या अंतिम फेरीत स्थान पटकावता आले नाही. जेनाने ८०.७३ च्या सर्वोत्तम थ्रोसह ही फेरी पूर्ण केली. आता भालाफेकीत पदकाच्या आशा नीरज चोप्रावर आहेत.

15:27 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: पहिल्याच थ्रोमध्ये नीरज चोप्रा अंतिम फेरीत

नीरज चोप्राने भालाफेकच्या पात्रता फेरीत पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. नीरजने पहिलाच थ्रो 89.34 मी. लांब टाकला आहे. नीरज चोप्रा पाठोपाठ पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीमनेही पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. भारताची नजर अॅथलेटिक्समध्ये दुसरं सुवर्णपदक मिळण्यावर आहे.

15:10 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगाटचा शानदार विजय

संपूर्ण कुस्ती सामन्यात २-० ने पिछाडीवर असलेल्या विनेशने अखेरच्या काही सेकंदांमध्ये नंबर वन युई सुसाकी हिला धोबीपछाड देत थेट ३ गुण मिळवून सामना जिंकला. विनेशचा पुढील सामना आज होणार आहे.

14:56 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगाट

भारताची धाकड गर्ल विनेश फोगाटच्या कुस्ती सामन्याला सुरूवात झाली आहे.

14:47 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: टेबल टेनिस

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चिनी संघाविरुद्ध दुहेरीच्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने पहिला एकेरीचा सामनाही गमावला आहे. पहिला सेट ९-११ ने गमावल्यानंतर चीनच्या खेळाडूने शरथ कमलचा पुढील तीन सेटमध्ये ११-७, ११-७ आणि ११-५ असा पराभव केला.

14:31 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भालाफेक

किशोर कुमार जेनाचा पहिला थ्रो – ८०.७३ होता, दुसरा थ्रो फाऊल ठरवण्यात आला. तर त्याचा तिसरा थ्रो हा ८०.२१ मी. होता. सध्या किशोर आठव्या स्थानी आहे.

14:23 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भालाफेक

भालाफेक स्पर्धेत जर्मनीचा वेबर ८७.७६ मी, केनियाचा जे येगो ८५.९७ मी आणि वडेलेजचने ८५.६३ मी सह अंतिम फेरीत पात्रता मिळवली आहे. किशोरच्या थ्रोवर सर्वांच्या नजरा आहेत.

14:09 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: शरथ कमल

भारताच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत शरथ कमलचा एकेरी सामना सुरू आहे. यातील पहिला सेट शरथ कमल यांनी ९-११ च्या फरकाने पहिला सेट जिंकला आहे.

14:06 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: किशोर जेनाचा पहिला थ्रो

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेक स्पर्धेची पात्रता फेरी सुरू झाली आहे ज्यामध्ये किशोर जेनाने ८०.७३ मीटरचा पहिला थ्रो केला आहे.

14:05 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भालाफेक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीला सुरूवात झैली आहे. ज्यामध्ये भारताचा किशोर जेना पहिल्या गटात सहभागी होत आहे, तर यानंतर नीरज चोप्रा देखील दुपारी ३:२० वाजता ॲक्शनमध्ये दिसणार आहे.

14:04 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: टेबल टेनिस

पॅरिस ऑलिम्पिकच्या १६व्या राउंडमध्ये म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाचा चीनी संघासोबत सामना सुरू आहे. टेबल टेनिस सांघिक स्पर्धेतील दुहेरी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. चीनच्या दुहेरी जोडीने भारतीय जोडीचा ११-२, ११-३ आणि ११-७ अशा सलग तीन सेटमध्ये पराभव झाला. आता एकेरीमध्ये शरथ कमल यांचा सामना सुरू आहे.

14:02 (IST) 6 Aug 2024
Paris Olympic 2024 Live:हॉकी सामना

सर्वांच्या नजरा भारतीय हॉकी संघावर असतील. उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीशी होणार आहे. टीम इंडिया सामना जिंकताच पदक निश्चित होईल.

India at Olympic Games Paris 2024 Live, 06 August 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज ११वा दिवस आहे. आज भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा, विनेश फोगाट आणि भारताचा हॉकी संघ मैदानात असतील.