2024 Paris Olympic Day 12 Live Updates: पॅरिस ऑलिम्पिकच्या १२व्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. भारताची सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आले आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि ३ हजार मी अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत असलेला अविनाश साबळे यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती, पण यामध्ये भारत अपयशी ठरला. ७ ऑगस्टला रात्री उशिरा झालेल्या सामन्यांमध्ये मीराबाई चानू चौथ्या स्थानी राहिली तर अविनाशने ११व्या स्थानी राहत पॅरिस ऑलिम्पिकमधील आपली मोहिम पूर्ण केली. आता ८ ऑगस्टला भारताची नजर हॉकी संघ आणि नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर असेल. ८ ऑगस्टला भारताचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या.
India at Paris Olympic 2024 Day 12 Highlights:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १२व्या दिवसाचे हायलाईट्स आणि ८ ऑगस्टचे वेळापत्रक
१२.३० वा - गोल्फ महिला एकेरी (राऊंड दुसरा)
दिक्षा डागर, अदिती अशोक
२.०५ वा - महिला १०० मी अडथळा शर्यत (रिपेजेच)
ज्योती याराजी
२.३० वाजल्यापासून पुरूष आणि महिला ५७ किलो फ्रिस्टाईल कुस्तीचे सामने
अमन सेहरावत आणि अंशु मलिक
५.३० वा - भारताचा हॉकी सामना (कांस्यपदक सामना)
भारत वि स्पेन
रात्री ११.५५ वा - पुरूष भालाफेक (मेडल मॅच)
नीरज चोप्रा
भारताचा अविनाश साबळे ३००० मी अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. अविनशाने सुरूवात चांगली केली पण तो शर्यतीत नंतर मागे पडला. यासह अविनाश अंतिम फेरीत ८१४१८ या वेळेसह ११ व्या स्थानी राहिला. अशारितीने भारताला १२व्या दिवशी दोन पदके मिळवण्यात अपयश आले आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821273927022465506
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या मीराबाई चानू यंदा चौथ्या स्थानी राहिली आहे. मीराबाईला तिसऱ्या प्रयत्नात वजन उचलण्यात अपयश आल्याने तिने १९९ गुणांसह आपली पॅरिस ऑलिम्पिकमधील मोहिम पूर्ण केली आहे. अशारितीने मीराबाई चौथ्या स्थानी आल्याने भारताचं अजून एक पदक हुकलं आहे. मीराबाईकडून यंदा पदकाची अपेक्षा होती पण अगदी थोडक्यासाठी मागे राहिली आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821270763262890011
मीराबाई चानूने दुसऱ्या फेरीत १११ किलो वजन दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीपणे उचलले आहे. आता इतर खेळाडूंच्या कामगिरीवर नजर असणार आहे.
मीराबाई चानू ८८ किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरली आहे. यासह मीराबाई आता दुसऱ्या स्थानावर आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821251675182829721
वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झालेली मीराबाई चानू ८८ किलो वजन उचलण्यात तिच्या दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरली होती.
मीराबाई चानूचा वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पहिला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलत चांगली सुरूवात केली आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821246520433545540
पुरूषांच्या तिहेरी उडी स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतभारताचे दोन खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रविण चित्रावेळ पहिल्या प्रयत्नात १५.९९ वर उडी मारली आहे तर अब्दुल्ला अबुबकरयानेही पहिल्या प्रयत्नात १५.९९ वर उडी मारली आहे. पात्र होण्यासाठी १७.१० मी इतकी उडी घेणं गरजेचं आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821239170007961626
मीराबाई चानूच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेला सुरूवात झाली आहे. मीराबाई चानू काहीच वेळात अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंग विभागात भारताची मीराबाई चानू काहीच वेळात दिसणार आहे. यासाठी स्टेज सज्ज झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकासाठी मीराबाई चानू आज मैदानात उतरणार आहे. रात्री ११ वाजता मीराबाई चानू वेटलिफ्टिंगच्या मेडल मॅचमध्ये खेळताना दिसणार आहे.
रात्री १०.४५: पुरुषांची तिहेरी उडी (पात्रता): प्रवीण चित्रवेल आणि अब्दुल्ला अबुबकर नारंगोलिंतेविदा
रात्री ११.०० : महिला ४९ किलो (पदक फेरी) : मीराबाई चानू
दुपारी १.१३ (बुधवार-गुरुवारची मध्यरात्री): पुरुषांची ३,००० मीटर स्टीपलचेस: अविनाश साबळे
काय म्हणाल्या नीता अंबानी?
इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनच्या सदस्या आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी म्हणाले, 'आज संपूर्ण देश विनेशच्या वेदना आणि दु:खात सहभागी आहे. ती एक चॅम्पियन फायटर आहे आणि ती आणखी मजबूत पुनरागमन करेल यात मला शंका नाही. तिच्याइतकी ताकद कोणाकडे नाही हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. केवळ तिच्या अविश्वसनीय विजयांमध्येच नाही तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची तिची क्षमता. येणाऱ्या पिढ्यांसाठी ती प्रेरणास्थान आहे.
आयओए अध्यक्ष पीटी उषा यांनी विनेश फोगटची घेतली भेट
अविनाश साबळेकडून पदकाची आशा
पात्रता फेरीत चांगली कामगिरी करणारा भारतीय खेळाडू अविनाश साबळे याच्याकडूनही आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. साबळेने अंतिम फेरीसाठी पात्र ठरून भारताच्या आणखी एका पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.
चानूकडून टोकियोच्या करिष्म्याची पुनरावृत्ती अपेक्षित
मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि पुन्हा एकदा तिच्याकडून त्या पराक्रमाची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे. मीराबाई जर पदक मिळवण्यात यशस्वी ठरली तर ती त्या भारतीय खेळाडूंमध्ये सामील होईल, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. आत्तापर्यंत सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकेर हे तीन भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.
आजचा दिवस भारतासाठी वाईट होता
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी खूप वाईट होता. विनेश फोगट अपात्र ठरली. अंतिम पंघालला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्योती याराजी या सातव्या क्रमांकावर राहिली. भारताला टेबल टेनिसच्या क्वार्टरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. अन्नू, सर्वेश, प्रियांका आणि सूरज हे पराभूत होऊन बाहेर पडले.
अंतिम पंघाल 16 राउंड मधून बाहेर
अंतिम पंघालने महिलांच्या फ्रीस्टाइल 53 किलो गटाच्या 16व्या फेरीत तुर्कीच्या झेनेप येटगिलविरुद्धचा पहिला सामना गमावला. 0-10 च्या अंतिम स्कोअरसह पराभूत होऊनही, पॅरिस 2024 मधील पंघालची मोहीम अद्याप संपलेली नाही. यातेगीलने अंतिम फेरी गाठली तर तिला अजूनही रिपेचेज फेरीत भाग घेण्याची संधी आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821126828838297721
पीटी उषा यांचे प्रतिपादन
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटच्या अपात्रतेबद्दल निराशा व्यक्त केली.
भारताचे टेबल टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले
टेबल टेनिसमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. मनिका बत्रा आणि श्रीजा हरले. जर्मनीने विजयाची नोंद केली आहे. भारताचे टेबल टेनिसमधील आव्हान आता संपले आहे. भारतीय महिला संघाला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून 1-3 ने पराभव पत्करावा लागला. मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि आचना कामथ यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळू शकले नाही.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821128017734767030
टेबल टेनिसमध्ये जर्मनीची भारतावर आघाडी
टेबल टेनिसमध्ये भारताचा सामना जर्मनीशी होत आहे. टीम इंडिया १-२ ने पिछाडीवर आहे. अर्चना कामथ भारताकडून खेळत आहे. भारताच्या श्रीजा अकुलाचा सामना लवकरच सुरू होणार आहे.
ज्योती रिपेचेजला पोहोचली
पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारतीय ॲथलीट ज्योती याराजीने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या चौथ्या फेरीत 13.16 सेकंदांची वेळ नोंदवली. तिने सातव्या स्थानावर राहून उपांत्य फेरीसाठी थेट पात्रता गाठली नसली तरी याराझीला उद्या रिपेचेज फेरीत आणखी एक संधी मिळेल.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821105964046504401
अन्नू राणीची अंतिम फेरी हुकली
महिलांच्या भालाफेक स्पर्धेत अन्नू राणीने तिसऱ्या प्रयत्नात 53.55 मीटर अंतर कापले. तिला अंतिम फेरी गाठू शकली नाही. तिने अ गटात 55.81 मीटर्सच्या सर्वोत्तम प्रयत्नाने 15 वे स्थान पटकावले.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821112744772317497
मनिका बत्राही बाहेर
महिला टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत भारत 0-2 ने मागे पडली. मनिका बत्राची प्रतिस्पर्धी ऍनेट कॉफमनकडून 11-8, 5-11, 7-11, 5-11 असा पराभव झाला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821111216414056761
विनेश फोगटची प्रकृती खालावली
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटची प्रकृती खालावली आहे. विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजच ती जास्त वजनामुळे अपात्र ठरली आहे.
महिलांचा टेबल टेनिस संघाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. जर्मनीविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात प्रथम डबल्सचा सामना होत आहे. ज्यात श्रीजा आणि अर्चनाने दुसरा सेट जिंकत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821101659918942458