2024 Paris Olympic Day 12 Live Updates: पॅरिस ऑलिम्पिकच्या १२व्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. भारताची सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आले आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि ३ हजार मी अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत असलेला अविनाश साबळे यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती, पण यामध्ये भारत अपयशी ठरला. ७ ऑगस्टला रात्री उशिरा झालेल्या सामन्यांमध्ये मीराबाई चानू चौथ्या स्थानी राहिली तर अविनाशने ११व्या स्थानी राहत पॅरिस ऑलिम्पिकमधील आपली मोहिम पूर्ण केली. आता ८ ऑगस्टला भारताची नजर हॉकी संघ आणि नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर असेल. ८ ऑगस्टला भारताचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या.
India at Paris Olympic 2024 Day 12 Highlights:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १२व्या दिवसाचे हायलाईट्स आणि ८ ऑगस्टचे वेळापत्रक
भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने भारताचं चौथं पदक निश्चित केलं होतं. पण आता ती ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकल्यानंतर नेमबाज मनू भाकर ८ ऑगस्ट रोजी सकाळी देशात परतली, त्यावेळी विमानतळावर चाहत्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. मनूसोबत तिचे प्रशिक्षक जसपाल राणा आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषाही होत्या.
महिला कुस्तीमध्ये पदक निश्चित केल्यानंतर, पॅरिस ऑलिम्पिकच्या १२व्या दिवशी भारतीय खेळाडू आणखी एका पदकासाठी आपली लढाई सुरू ठेवतील. कुस्तीपटू विनेश फोगट हिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली आणि गतविजेत्या जपानच्या युई सुसाकी हिला फेरीच्या-16 मध्ये पराभूत केले. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव केला. आता तिची ऑलिम्पिक२०२४ मध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या साराह ॲन हिल्डब्रँडशी सामना होईल. वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू कृतीत उतरणार आहे. अन्नू राणी, ज्योती याराजी आणि अविनाश साबळे यांसारखी ऍथलेटिक्समधील अव्वल नावेही कृतीत उतरतील.