Men’s Javelin Throw Final Highlights Neeraj Chopra Won Silver : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.४५ मीटर थ्रो करत रौप्य पदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाचा बचाव त्याला करता आला नाही, कारण यावेळी सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे (९२.९७ मीटर थ्रो) गेले आहे. नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र नदीमने सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिक विक्रम मोडून संपूर्ण जगाला चकित केले आहे. २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पाचवे पदक आहे, याआधी भारताने ४ कांस्यपदके जिंकली होती. ज्यापैकी ३ नेमबाजीत आणि एक हॉकीत पटकावले.
India at Olympic Games Paris 2024 Highlights , 08 August 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १३व्या दिवसाचे हायलाइट्स
भारताचे १४व्या दिवसातील वेळापत्रक
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821600389977838042
नीरज चोप्राने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिकमधील भारताचे हे पाचवे पदक होते. याआधी भारताने चार पदके जिंकली होती. यापैकी तीन कांस्य नेमबाजीत आणि एक हॉकीमध्ये आले. पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो केला. नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रोसह सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्स 88.54 मीटरसह कांस्यपदक जिंकले.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821634193048142222
पाकिस्तानी खेळाडूने केला ऑलिम्पिक विक्रम -
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नीरज चोप्राप्रमाणेच त्याचा पहिला प्रयत्नही रिकामा होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने 92.97 मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम केला. त्याच्या आधी, भालाफेकचा ऑलिम्पिक विक्रम नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्डकिलसेनच्या नावावर होता, ज्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटर भालाफेक केली होती. अर्शद नदीमचा शेवटचा थ्रो देखील 90 मीटरच्या वर होता, जो 91.79 मीटर अंतरावर पडला.
पाच थ्रोनंतर टॉप-8 खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी
1. अर्शद नदीम (पाकिस्तान)- 92.97
2. नीरज चोप्रा (भारत) – 89.45 मीटर
3. अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – 88.54 मीटर
4. जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक) – 88.50 मीटर
5. ज्युलियस येगो (केनिया) – 87.72 मीटर
6. ज्युलियन वेबर (जर्मनी) – 87.40 मीटर
7. केशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो) – 86.16 मीटर
8. लस्सी एटेलटालो (फिनलंड) – 84.58 मीटर
नीरजचा पाचवा थ्रोही फाऊल झाला
नीरज चोप्राने सलग तिसरा थ्रो फाऊल केला आहे. त्याने पाचपैकी एकूण चार थ्रो फाउल केले आहेत. नीरजचा दुसरा थ्रो अचूक होता जेव्हा त्याने 89.45 मीटर अंतरावर भालाफेक केली.
रौप्य पदकावर नीरज चोप्रा
पहिल्या ४ थ्रोनंतरही नीरज चोप्रा रौप्य पदकाच्या स्थानावर कायम आहे. पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या स्थानावर आहे.
1. अर्शद नदीम (पाकिस्तान) – 92.97 मीटर
2. नीरज चोप्रा (भारत) – 89.45 मीटर
3. जाकुब वालाच (चेक प्रजासत्ताक) – 88.50 मी
अर्शदची चौथी फेक अशी होती
अर्शद नदीमचा चौथा थ्रो 79.50 मीटर होता. अर्शद अजूनही अव्वल स्थानावर आहे कारण अर्शदने पहिला फेक 92.97 मीटर टाकला होता.
नीरज चोप्राचा चौथा थ्रो फाऊल होता. नीरज चोप्रा अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता हे खेळाडू पदकाच्या शर्यतीत उरले आहेत
हे 8 खेळाडू पुरुषांच्या भालाफेकमध्ये पदकाच्या शर्यतीत उरले आहेत. हे सर्व खेळाडू प्रत्येकी तीन आणखी थ्रो करतील. तीन फेऱ्यांनंतर नीरज चोप्रा 89.45 मीटर फेकसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या स्थानावर आहे.
नीरज चोप्रा (भारत)
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा)
ज्युलियन वेबर (जर्मनी)
अर्शद नदीम (पाकिस्तान)
ज्युलियस येगो (केनिया)
जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक)
केशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो)
लस्सी एटेलातलो (फिनलंड)
मार्डर-दा सिल्वा स्पर्धेतून बाहेर
एड्रियन मार्डरेचा तिसरा थ्रो 77.77 मीटर होता. मार्डर सध्या 12 व्या क्रमांकावर असून उर्वरित तीन फेऱ्यांमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही. फक्त अव्वल 8 खेळाडूंना प्रत्येकी तीन आणखी थ्रो फेण्याची संधी मिळेल. ऑलिव्हर हेलँडरचा तिसरा थ्रो फाऊल होता. लुईस मॉरिसिओ दा सिल्वाचा तिसरा थ्रोही फाऊल होता.
नीरजचा तिसरा थ्रो फाऊल
नीरज चोप्राचा तिसरा थ्रो फाऊल होता. नीरज अजूनही रौप्य पदकाच्या स्थानावर आहे.
अर्शदची तिसरा थ्रोही चांगला
अर्शद नदीमने 88.72 मीटरची तिसरी थ्रो केली. अर्शद पहिल्या क्रमांकावर आहे कारण या स्पर्धेत खेळाडूने सर्वोत्तम थ्रो केलेआहेत.
दुसरी फेरी संपली
आता 12 खेळाडू तिसऱ्या फेरीत मुसंडी मारतील. यानंतर, अव्वल 8 खेळाडूंना प्रत्येकी आणखी तीन थ्रो फेकण्याची संधी मिळेल. दोन फेऱ्यांनंतर नीरज चोप्रा 89.45 मीटर फेकसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या क्रमांकावर आहे. अर्शद नदीमने 92.97 मीटरची दुसरी थ्रो फेकली, हा ऑलिम्पिक विक्रम आहे.
नीरजने दुसरा थ्रो 89.45 मीटर केला
नीरज चोप्राची दुसरा थ्रो 89.45 मीटर केला. आता नीरज दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या क्रमांकावर आहे. हा त्याचा हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो आहे, याआधी त्याचा सर्वोत्तम थ्रो ऑलिम्पिकच्या पात्रतेमध्ये आला होता, जिथे त्याने 89.34 मीटर अंतर कापले होते. मात्र, नदीमला मागे टाकण्यासाठी नीरजला आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो टाकावा लागणार आहे. नीरजने आत्तापर्यंत कधीही 90 मीटरचा थ्रो केला नसल्याची माहिती आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821620262644670542
नदीमने 90मीटरच्या पुढे थ्रो केला
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये विक्रम रचला आणि दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर फेक करून अव्वल स्थान गाठले. हा एक नवा ऑलिम्पिक विक्रम आहे. अर्शदने नॉर्वेच्या अँड्रियास थोरकिल्डसेनचा विक्रम मोडला आहे. अँड्रियासने 23 ऑगस्ट 2008 रोजी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटर भालाफेक करून हा विक्रम केला होता.
टोनी केर्ननने 80.92 मीटर आणि लुईझ मॉरिसिओ दा सिल्वाने 80.67 मीटर फेक केली. पहिल्या फेरीतील केशॉर्न वॉलकॉट अव्वल स्थानावर आहे.
नीरजचा पहिलाच प्रयत्न फाऊल
भालाफेकच्या अंतिम फेरीतील नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न फाऊल घोषित करण्यात आला आहे. प्रत्येक खेळाडूला एकूण 6 वेळा भालाफेक करण्याची संधी मिळेल.
केनियाच्या ज्युलियस येगोने 80.19 मीटरची थ्रो केली आहे. तर लस्सी अटेलातलोने 78.81मीटर फेक केली. आता नीरजची पाळी आहे.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पहिल्या थ्रोमध्ये फाऊल केला. म्हणजे त्याचा फेक वैध ठरणार नाही.
जेकब वडलेचने पहिला थ्रो घेतला, जो 84.70 होता. त्यानंतर अँडरसन पीटर्सची पाळी आली, ज्याने 80.15 मीटरचा थ्रो फेकला. यानंतर केशॉर्न वॉलकॉटचा पहिला थ्रो 86.16 मीटर होता. केशॉर्न सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. नीरज चोप्राची पाळी लवकरच येणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्टचा दिवस भारतासाठी नेहमीच लक्षात राहील, या दिवशी 2021 मध्ये स्टार खेळाडू नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर फेक करून ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते. आता नीरजला 8 ऑगस्टला इतिहास रचण्याची संधी आहे. नीरजने फायनल जिंकल्यास ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. तसेच सुवर्णपदकाचा बचाव करणारा तो पहिला भारतीय ऑलिम्पियन ठरेल.
भालाफेकचा अंतिम सामना सुरू झाला आहे. संपूर्ण देशाला नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
सलग दुसऱ्या सुवर्णपदकासाठी नीरज चोप्रा लावणार जोर
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्यासाठी जोर लावणार आहे. नीरजने पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली होती आणि पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर फेक करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. टोकियो ऑलिम्पिकप्रमाणेच येथेही नीरज काही सेकंदांनी अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, पण यावेळचे आव्हान मागील ऑलिम्पिकपेक्षा अधिक खडतर आहे. एकूण नऊ खेळाडूंपैकी नीरजसारख्या पाच खेळाडूंनी त्यांच्या पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली होती.
दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा चौथा भारतीय ठरणार
नीरजने कोणतेही पदक जिंकले तरी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो स्वातंत्र्यानंतरचा चौथा भारतीय खेळाडू असेल. स्वातंत्र्यानंतर, फक्त बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (एक रौप्य आणि एक कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (एक रौप्य आणि एक कांस्य) आणि नेमबाज मनू भाकर (दोन कांस्य) यांनी भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.
नीरज चोप्रा फायनलसाठी वॉर्म अप करत आहे
नीरज चोप्रा अंतिम आव्हानासाठी सज्ज आहे आणि सामना सुरू होण्यापूर्वी सराव करत आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना आतापासून काही वेळात सुरू होईल.
नीरज चोप्राने तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. येथेही त्याने सुवर्णपदक जिंकल्यास सलग दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम करणारा तो जगातील केवळ पाचवा भालाफेकपटू ठरेल. आत्तापर्यंत या पराक्रम एरिक लेमिंग (1908, 1912), जॉनी मायरा (2004, 2008), आंद्रेस थॉर्किलडसेन (2004, 2008) आहेत. तसेच नीरजचा आदर्श जेन झेलेंजीने 1988 ते 2000 पर्यंत सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकले होते.
अर्शद नीरज चोप्राला टक्कर देण्यास सक्षम
अर्शदने पात्रता फेरीत केवळ नीरज, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर 86.59 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह चौथे स्थान पटकावले. नदीमचा हा प्रयत्न त्याची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. अर्शद हा 90 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करणाऱ्या दोन आशियाई खेळाडूंपैकी एक आहे. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने 90.18 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. पाकिस्तानी भालाफेकपटू तैवानच्या चाओ सुना चेंगच्या 91.36 मीटरला मागे टाकू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
भारतीय हॉकी संघावर पैशांचा पाऊस, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून तब्बल 'इतक्या' कोटींचे बक्षीस जाहीर
अमन सेहरावतचा उपांत्य फेरीत पराभव
भारताच्या अमन सेहरावतला 57 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याला जपानच्या अव्वल मानांकित हिगुची रे याने तांत्रिक श्रेष्ठतेवर पराभूत केले. पहिल्या फेरीत म्हणजे तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत, जपानी कुस्तीपटूने अमनचा पराभव केला आणि 10 गुण मिळवले आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर विजय मिळवला. आता हिगुचीने अंतिम फेरी गाठली आहे. आता अमनला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. तो 9 ऑगस्ट रोजी कांस्यपदकासाठी रोजी पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझ विरुद्ध खेळणार आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1821582197943632019
2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने कारकिर्दीतील सर्वोत्तम 89.94 मीटर थ्रो केला होता. तो अजूनही 90 मीटरच्या पलीकडे थ्रो करण्याच्या प्रतिक्षेत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावल्यानंतर भारतीय खेळाडूही आपल्या विजेतेपदाचे रक्षण करू पाहत आहेत. जगभरातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर भारताला आपल्या स्टार खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा असतील.
कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपतींनी भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्विटरवर लिहिले की, 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल आमच्या हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन. पाच दशकांहून अधिक काळानंतर, भारताने सलग दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय हॉकीच्या पुनरुज्जीवनासाठी हा संघ कौतुकास पात्र आहे. त्यांनी भारताचा गौरव केला आहे. या संघाने दाखवलेले सातत्य, कौशल्य, एकजूट आणि लढण्याची भावना आपल्या तरुणांना प्रेरणा देईल. वेल डन भारतीय हॉकी टीम.'