2024 Paris Olympic Day 15 Highlights : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एका पदकाचे स्वप्न भंगले. भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डा आता रेपेचेज फेरीत जाऊ शकणार नाही. किर्गिस्तानचा कुस्तीपटू मेडेट काईजी आणि यूएसएचा कुस्तीपटू केनेडी ब्लेड्स यांच्यातील हेवीवेट गटात (७६ किलो) लढतीवर रितिका हुडाचे भवितव्य अवलंबून होते. मेडेट काईजी जिंकले असती तर रितिका रिपेचेजद्वारे कांस्यपदकापर्यंत पोहोचू शकली असती. मात्र, अमेरिकेचा कुस्तीपटू केनेडी ब्लेड्सच्या विजयानंतर भारताच्या पदकाची आशा संपुष्टात आली. कारणआता रितिका पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने सहा पदकं जिंकली आहेत, ज्यामध्ये पाच कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.

Live Updates

India at Olympic Games Paris 2024 Highlights, 10 August 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १५ व्या दिवसाचे हायलाइट्स

23:22 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची मोहीम संपली

उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत झाल्यामुळे रितिका हुड्डा 76 किलो कुस्ती फ्रीस्टाइल स्पर्धेत पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडली. किर्गिस्तानची कुस्तीपटू अपारी कैजी अंतिम फेरीत पोहोचली असती तर रितिकाला रिपेचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. रितिका बाहेर पडल्याने भारताची पॅरिस ऑलिम्पिक मोहीम संपुष्टात आली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्यपदक जिंकले आहे. विनेशच्या खटल्याचा निर्णय भारताच्या बाजूने आला तर भारताच्या पदकांची संख्या सात होईल. पदकतालिकेत भारत सध्या ६९ व्या क्रमांकावर आहे.

21:47 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : विनेश फोगटच्या खटल्याचा 11 ऑगस्टला निकाल जाहीर होणार

शुक्रवारीच क्रीडा लवादात विनेश फोगटबाबत सुनावणी झाली. याबाबतचा निर्णय आज येणार होता. मात्र, आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, निर्णयाची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता क्रीडा लवाद 11 ऑगस्टपर्यंत निर्णय देऊ शकते. तिला रौप्य पदक देण्याची मागणी विनेशने क्रीडा न्यायाधिकरणाकडे केली होती. 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर विनेशने क्रीडा न्यायाधिकरणासमोर अपील दाखल करून तिला संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. यावरील सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल जाहीर झालेला नाही. ॲनाबेले बेनेट या खटल्याचा निकाल देणार आहेत.

21:45 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : विनेशच्या समर्थनार्थ उतरला नीरज चोप्रा

विनेशच्या समर्थनार्थ उतरला नीरज चोप्रा

कुस्तीपटू विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे केलेले आवाहन यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त करून नीरज चोप्रा म्हणाला की, निर्णय आपल्या बाजूने नसला तरी तिने देशासाठी काय केले हे लोकांनी विसरू नये.

21:30 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : CAS ची स्थापना कधी झाली?

संपूर्ण जगात पहिल्यांदा १८९६ मध्ये ग्रीसमध्ये ऑलिम्पिक खेळवण्यात आले, त्यानंतर ८४ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये काही अडचणी निर्माण होऊ लागल्या, नियमांबाबत खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाले. या वादांमुळे ते कसे सोडवायचे याचा विचार सुरू झाला. क्रीडा विवाद सोडवण्यासाठी १९८४ मध्ये कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) ची स्थापना करण्यात आली. या न्यायालयाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे.

21:17 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : संपूर्ण देश विनेश प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहतोय

संपूर्ण देश विनेश प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहतोय

विनेश फोगटच्या पदक प्रकरणाचा निर्णय लवकरच येऊ शकतो. CAS (क्रिडा लवाद न्यायालय) ने आपला निर्णय देण्यासाठी आज (10 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. अंतिम निर्णय काहीही असला तरी तो भारतीय ऑलिम्पिक इतिहासातील महत्त्वाचा क्षण म्हणून स्मरणात राहील यात शंका नाही. विनेशच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता कमी असली तरी, तरीही भारतीय चाहत्यांना चांगल्या निकालाची आशा आहे.

21:07 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : विनेश फोगट अपात्र प्रकरणावर निर्णय देणारे CAS नेमकं काय?

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी क्रीडा विश्वातील कोणत्याही वादावर तोडगा काढण्याचे काम करते. या न्यायालयात केवळ खेळाडू आणि प्रशिक्षक कोणत्याही प्रकारच्या निर्णयाविरुद्ध किंवा इतर कोणत्याही वादाच्या बाबतीत अपील करू शकतात. सीएएसमध्ये ८७ देशांतील अंदाजे ३०० मध्यस्थ आहेत, त्यांची निवड क्रीडा कायद्याच्या तज्ञ ज्ञानासाठी केली आहे. विनेश फोगटशी संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही या न्यायालयाचे नाव प्रथमच ऐकले असेल, परंतु सीएएसमध्ये दरवर्षी सुमारे ३०० प्रकरणे नोंदवली जातात.

20:57 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : तब्बल तीन तास चालली होती सुनावणी

तब्बल तीन तास सुनावणी चालली होती

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले होते की एकमेव पंच डॉ. ॲनाबेल बेनेट एसी (ऑस्ट्रेलिया) यांनी विनेश फोगट, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आयओए या सर्व पक्षांचे सुमारे तीन तास ऐकले.

20:21 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीएम मोदींनी अमनशी संवाद साधला

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी अमनला फोन केला. पंतप्रधान मोदींनी 10 ऑगस्ट रोजी वायनाडच्या उद्ध्वस्त भागाला भेट दिली.

19:42 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : भारताचे गोल्फमधील आव्हान संपुष्टात

भारताच्या अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांनी महिलांच्या गोल्फमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. अदिती अशोक आणि दीक्षा डागर महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले गोल्फमध्ये पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या. यासह भारताचे गोल्फमधील आव्हान संपुष्टात आले.

17:03 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : रितिका रेपेचेजमध्ये कांस्यपदकासाठी खेळू शकते

उपांत्यपूर्व फेरीत रितिका हुडाचा पराभव झाला. तिला किर्गिस्तानच्या अव्वल मानांकित अयापेरी मेडेट किझीने पराभूत केले. रितिकाने पहिल्या फेरीत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत किरगिझस्तानी खेळाडूलाही पॅसिव्हिटी वेळेत एक गुण मिळाला आणि गुणसंख्या १-१ अशी बरोबरी झाली. रितिकाचे हे पहिलेच ऑलिम्पिक होते. किर्गिस्तानी कुस्तीपटूने नंतर गुण मिळवले, त्यामुळे ती नियमानुसार जिंकली. या ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या नियमांमुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता रितिकाला किझीने अंतिम फेरीत पोहोचावे असे वाटते जेणेकरून रितिका रेपेचेजमध्ये कांस्यपदकासाठी स्पर्धा करू शकेल.

16:54 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : रितिका हुडाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, आता रिपेचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी

महिला कुस्तीच्या 76 किलो फ्रीस्टाइल गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत, रितिका हुड्डाचा सामना अव्वल मानांकित आणि 2 वेळा जागतिक पदक विजेती अपारी काईजीशी झाला. जिथे भारतीय कुस्तीपटू रितिका हरली. मात्र हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. पण शेवटचा पॉइंट अपारी कैजीने नोंदवला, त्यामुळे तिला उपांत्य फेरीत स्थान मिळाले. आता रितिका रिपेचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. अशा परिस्थितीत रितिकाला अपारी काईजी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची प्रार्थना करावी लागेल.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1822229156878299444

16:35 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live :रितिकाचा सामना सुरू

रितिकाचा सामना सुरू

भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा 76 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत खेळत आहे. तिच्यासमोर अव्वल मानांकित किर्गिस्तानची अयापेरी मेडेट किझी आहे.

16:12 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : रितिकाने तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली

रितिकाने तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली

भारतीय युवा खेळाडूची ही उत्कृष्ट कामगिरी होती. सामन्यात एका मिनिटापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना ती 10-2 अशी सहज लढत सुरक्षित ठेवू शकली असती. पण तिने नेगीवर दबाव कायम ठेवला आणि शेवटी 2-पॉइंटर गोल करत सामना वेळेपूर्वीच संपवला आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर 12-2 असा विजय मिळवला.

15:34 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : रितिका उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली

रितिका उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली

तिने महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत तिने हंगेरीच्या बर्नाडेट नागीचा तांत्रिक श्रेष्ठतेने 12-2 असा पराभव केला. आता दुपारी 4 वाजल्यापासून उपांत्यपूर्व फेरीत रितिकाचा सामना कझाकिस्तानचा कुस्तीपटू आयपेरी मेडेट किझीशी होईल. हा सामना दुपारी 4 वाजल्यापासून खेळवला जाईल.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1822207956462567468

15:20 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : रितिका हंगेरियन कुस्तीपटूविरुद्ध 4-2 ने आघाडीवर

रितिका आणि नायगीची सामना सुरू

कुस्तीमध्ये महिलांच्या फ्री स्टाईल ७६ किलो गटाचा प्री-क्वार्टर फायनल सामना रितिका आणि नागी यांच्यात होत आहे. पहिल्या फेरीनंतर रितिका ४-२ अशी आघाडीवर आहे. तिने हंगेरियन कुस्तीपटूवर आघाडी कायम ठेवली आहे.

14:50 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : विनेश प्रकरणाचा निर्णय आज रात्री येण्याची शक्यता

विनेश प्रकरणाचा निर्णय आज रात्री येण्याची शक्यता आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) आज रात्री 9:30 वाजेपर्यंत विनेश प्रकरणावर निर्णय देऊ शकते. विनेश फोगटने 50 किलो महिला फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी एकत्रित रौप्य पदक मिळवण्याचे आवाहन केले होते.

14:26 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : अदिती आणि दीक्षा अनुक्रम ४० आणि ४२ क्रमांकावर आहे

अदिती आणि दीक्षाची स्पर्धा सुरू होते

आदिती अशोक आणि दीक्षा डागर यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. दोन्ही महिला खेळाडू चौथ्या फेरीत वर जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. आदिती सध्या T40 वर आहे आणि दीक्षा T42 वर आहे.

14:02 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : क्रीडा लवादात सुनावणी झाली

क्रीडा लवादात सुनावणी झाली

महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपिलावर क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याच्या अपीलवर एक-दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. तत्पूर्वी, तदर्थ विभागाने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोपपूर्वी निर्णय येऊ शकतो, असे सांगितले होते. विनेशची बाजू सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी मांडली. सुनावणीपूर्वी सर्व संबंधित पक्षकारांना त्यांचे तपशीलवार कायदेशीर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर तोंडी वादावादी झाली.

13:59 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : अदिती आणि दीक्षाकडून भारताला आशा

अदिती आणि दीक्षाकडून भारताला आशा

अदिती अशोक आणि दीक्षा डागर या गोल्फपटू वैयक्तिक गटात आव्हानात्मक आहेत. अदिती आणि दीक्षा सध्या मागे आहेत, पण या दोघींचे पुनरागमन अपेक्षित आहे. दिक्षाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये छाप पाडली होती आणि पदक जिंकण्याच्या जवळ आली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पाच कांस्य आणि एका रौप्यपदकांसह सहा पदके जिंकली आहेत.

13:53 (IST) 10 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : रितिका हुड्डावर नजर

रितिका हुड्डावर नजर

भारतीय कुस्ती संघाची शेवटची कुस्तीपटू रितिका हुड्डा अॅक्शनमध्ये

उतरणार आहे. रितिका 76 किलो गटात आव्हान देईल. हा भारतीय कुस्तीपटू 23 वर्षात वर्ल्ड चॅम्पियन बनणारा देशातील पहिला पैलवान आहे. रितिका प्रथम प्री-क्वार्टर फायनल सामना खेळणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1821939848191557759

India at Paris Olympic Games 2024 Day 15 Live Updates in marathi

India at Olympic Games Paris 2024 Highlights, 10 August 2024 : भारतीय महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीमध्ये पदक जिंकेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती बाहेर पडली आहे. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या सहाच आहे.

Story img Loader