Paris Olympic 2024 India July 30 Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आज म्हणजेच सोमवार २९ जुलै रोजी भारताला ३ पदके जिंकण्याची संधी होती. रविवार, २८ जुलै २०२४ रोजी मनू भाकेरच्या ऐतिहासिक कांस्यपदकानंतर, भारतीय नेमबाजी दलाला आशा होतो की त्यांचे रायफल नेमबाज रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता आपली लय राखू शकले नाहीत आणि पदक जिंकण्याची संधी गमावली. ३० जुलैला भारताचं वेळापत्रक कसं असेल जाणून घ्या.
भारताची कांस्यपदक विजेती मनू पुन्हा अचूक नेम साधताना दिसली. तिने १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबजोत सिंगसह प्रवेश केला आणि कांस्यपदकाच्या सामन्यात स्थान निश्चित केले. तिरंदाजीमध्ये महिला संघाच्या खराब कामगिरीनंतर आता तिसऱ्या मानांकित पुरुष संघावर भारताची तिरंदाजी पदकाची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणण्याची जबाबदारी होती, पण त्यांनीही निराश केले.
लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये आपली लय कायम ठेवाली आहे. पहिला सामना गमावलेल्या अश्विनी-तनिषाने सलग दुसरा सामना गमावला. सात्विक आणि चिरागचा सोमवारचा सामना रद्द झाला, कारण त्यांचा जर्मन प्रतिस्पर्धी मार्क लॅम्सफस दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंग आणि त्याचा संघ अर्जेंटिनाशी भिडला आणि अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीतने गोल करत सामना बरोबरीत सुटला.
७.१६ वाजता - बॉक्सिंग पुरूष ५१ किलो (राऊंड ऑफ १६)
अमित पंघाल
७.५५ वाजता - तिरंदाजी पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ३२)
पात्र झाल्यास
९.२४ वाजता
बॉक्सिंग - महिला ५७ किलो (राऊंड ऑफ ३२)
जास्मिन लम्बोरिया
मध्यरात्री १.२२ वाजता - बॉक्सिंग ५४ किलो (राऊंड ऑफ १६)
प्रिती पवार
२.२३ वाजता - तिरंदाजी - महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)
पुढील फेरीत पात्र झाल्यास
२.३० वाजता - अश्वारोहण ड्रेसेज ग्रँड प्रिक्स एकेरी (दिवस पहिला)
अनुष अगरवाला
४.४५ वाजता - हॉकी पुरूष संघ (ग्रुप स्टेज)
भारत वि आयर्लंड
५.३० वाजता - बॅडमिंटन पुरूष दुहेरी (ग्रुप स्टेज)
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी
७ वाजता - नेमबाजी ट्रॅप (अंतिम सामना)
पात्र झाल्यास
७.१५ वाजता - तिरंदाजी पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ६४)
धीरज बोम्मादेवरा
१२.३० वाजता - नेमबाजी ट्रॅप पुरूष (पात्रता फेरी-दिवस दुसरा)
पृथ्वीराज तोंडाईमन
१२.३० वाजता - नेमबाजी - ट्रॅप महिला (पात्रता फेरी-दिवस पहिला)
राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग
१ वाजता - नेमबाजी मिक्स्ड १० मी एअर पिस्तुल संघ (कांस्य पदक सामना)
सरबजोत सिंग व मनू भाकेर
१.४० वाजता - रोईंग पुरूष एकेरी (उपांत्यपूर्व फेरी)
बलराज पन्वर
१.४४ वाजता - तिरंदाजी - महिला एकेरी (राऊंड ऑफ ६४)
अंकिता भकत
१.५७ वाजता - तिरंदाजी - महिला एकेरी (राऊंड ऑफ ६४)
भजन कौर
पुरुष एकेरीच्या टेनिसमध्ये नोव्हाक जोकोविचने राफेल नदालचा ६-१, ६-४ असा पराभव केला आहे. यासह राफेल नदालचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
तिरंदाजीमध्ये भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना तुर्कीविरुद्ध होता. मात्र भारतीय संघाला हा सामना जिंकण्यात अपयश आलं. भारताने पहिला सेट गमावला आहे. भारताने ५३ तर तुर्कीने ५७ गुण मिळवले. दुसऱ्या सेटमध्ये भारताने ५२ तर तुर्कीने ५५ स्कोअर केला. तिसरा सेट भारताने एका अंकाने जिंकला. भारताने ५५ तर तुर्कीने ५४ स्कोअर केला आहे. तर अखेरच्या सेटमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817914118101143951
लक्ष्य सेनने सलग दोन्ही सेट जिंकत पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेतील बेल्जियमच्या कॅरागीविरूद्ध सामना जिंकला. पहिला सेट २१-१८ तर दुसरा सेट २१-१४ या फरकाने लक्ष्यने जिंकला. लक्ष्यचा अधिकृतरित्या हा ऑलिम्पिकमधील पहिला सामना होता. पहिला सामना हा गृहित धरला जाणार नसल्याचे BWF ने सांगितले.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817904738324955351
लक्ष्य सेनने बेल्जियमच्या कॅरागीविरूद्धचा पहिला सेट१८-२१ अशा फरकाने जिंकला. सुरूवातीला लक्ष्यने गुण मिळवले पण सामना मात्र अटीतटीचा झाला. अखेरीस लक्ष्यने पहिला सेट जिंकला. दुसरा सेट होताच लक्ष्यने चांगली लीड मिळवली आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817899280952160423
सामन्याची शेवटची दोन मिनिटे बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यानंतर भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. याचा फायदा घेत भारताने गोल केला. भारताचा कर्णधार हरमनप्रीत कौर पहिला गोल करण्यास चुकला, यानंतर पुन्हा एक पेनल्टी भारताला मिळाली आणि तेव्हा मात्र हरमनने चूक केली नाही आणि ए दणदणीत गोल करत सामना १-१ असा बरोबरीत सुटला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817897749989474339
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817898675231768701
बॅडमिंटन एकेरी स्पर्धेतील लक्ष्य सेनच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. लक्ष्यचा सामना बेल्जियमच्या कॅरागीविरूद्ध होणार आहे. लक्ष्यने दोन गुण मिळवत चांगली सुरूवात केली आहे.
दुसऱ्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटाला अर्जेंटिनाने भारतीय बचाव फळी भेदून गोल करण्यात यश मिळवले. यावेळी भारतीय हॉकी संघाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या पीआर श्रीजेशला चेंडू गोलपोस्टमध्ये जाण्यापासून रोखता आला नाही. यासह आता एक हाफ संपल्यानंतर अर्जेंटिनाकडे १-० अशी आघाडी आहे. आता भारतीय संघ कसा कमबॅक करणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817883464604991976
भारत आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांनी आक्रमक खेळाची सुरुवात केली. तिसऱ्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंग मैदानावर उपस्थित आहे. मात्र, अर्जेंटिनाच्या बचावफळीला भेदता आले नाही. काही क्षणांनंतर भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र यावेळीही तो अपयशी ठरला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये५ मिनिटांचा खेळ झाल्यानंतर स्कोअर ०-० असा आहे.
भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांत हॉकीचा सामना सुरू झाला आहे. या दोन देशांतील सामना चुरशीचा होणार आहे. विशेष बाब म्हणजे ४४ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच २९ जुलै १९८० रोजी भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
भारतीय नेमबाज अर्जुन बाबुटाने सुरूवातीपासूनच चांगली लीड मिळवली होती आणि तो कायम दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी राहत चांगली कामगिरी करत होता. पण अखेरच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाच्या शॉटमध्ये अर्जुन एका गुणाने मागे राहिला आणि अशारितीने भारताने थोडक्यासाठी अजून एक पदक हुकले. २०८.४ गुणांसह अर्जुन चौथ्या स्थानी राहिला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817869303057912261
पुरूष नेमबाजी १० मी एअर रायफल स्पर्धेला सुरूवात झाली आहे. ५ शॉट्सनंतर अर्जुन बाबुटा चौथ्या स्थानी आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817864165437874365
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817863673739636948
बॅडमिंटन डबल्सच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ग्रुप स्टेज सामन्यातील सलग दोन सामने गमावल्यानंतर ही जोडी स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. आज झालेल्या जपानविरूद्धच्या सामन्यात ११-२१ आणि १२-२१ एसा पराभव झाला.
भारतीय नेमबाज अर्जुन बाबुटा हा नेमबाजी पुरूष १० मी एअर रायफलच्या अंतिम फेरीत पदकासाठी खेळताना दिसणार आहे. ३.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे. रमिता जिंदालचे पदक हुकल्यानंतर भारताला अर्जुनकडून पदकाच्या आशा आहेत.
भारतीय नेमबाज आणखी एका नेमबाजी स्पर्धेत उतरला आहे. पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत पृथ्वीराज तोंडाईमन चांगली कामगिरी करत आहे. २०२३ ISSF विश्वचषक स्पर्धेत ट्रॅप स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते. त्याच्याशिवाय या स्पर्धेत आजपर्यंत एकाही भारतीयाला पदक मिळालेले नाही.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817853705363882373
३.३० वाजता - नेमबाजी पुरूष १० मी एअर रायफल (अंतिम फेरी)
अर्जुन बाबुटा
३.३० वाजता - टेनिस पुरूष दुहेरी (दुसरी फेरी)
रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी
४.१५ वाजता - हॉकी पुरूष (ग्रुप स्टेज)
भारत वि अर्जेंटिना
भारताच्या तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांचा बॅडमिंटन डबल सामन्यात जपानच्या नामी/चिहारूविरुद्ध सरळ गेममध्ये पराभूत झाल्या. त्यांचा ११-२१, १२-२१ असा पराभव झाला. अश्विनी तनिषा यांचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. ज्यामुळे या भारतीय जोडीवर आता स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817836676355440918
मनू भाकेर आणि सरबजोत सिंग यांची मंगळवारी कांस्यपदकाची लढत होणार आहे. त्यांचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. कांस्यपदकासाठी भारतीय जोडीचा सामना दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांच्याशी होणार आहे.
नेमबाजीत भारताला अजून एक पदक मिळण्याची आशा आहे. मनू भाकेर आणि सरबजोत सिंगच्या जोडीने १० मी मिक्स्ड पिस्तूल संघात एका गुणाने तिसऱ्या स्थानी राहिले. यासह भारताची ही जोडी कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाविरूद्ध लढणार आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817829739530219908
रमिता जिंदाल नेमबाजी १० मी एअऱ रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत खेळत होती. पण रमिताचा अंतिम फेरीतील प्रवास सातव्या स्थानी संपला आहे. अशारितीने भारताचे दुसरे ऑलिम्पिक पदक हुकले आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817829393969930578
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल मिश्र संघाची पात्रता फेरी सुरू झाली आहे. यामध्ये भारताच्या दोन जोड्या सहभागी झाल्या आहेत. सरबजोत सिंग आणि जोडी मनू भाकेर आहे तर रिदम सांगवान आणि अर्जुन सिंग चीमा यांची जोडी आहे. या स्पर्धेत एकूण १७ जोड्या सहभागी होत आहेत. भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानी
भारताची नेमबाज रमिता जिंदाल ५ शॉट्सनंतर चौथ्या स्थानी आहे. १० शॉट्सनंतर रमिता जिंदाल सातव्या स्थानी ९.७ च्या शॉटमुळे रमिता खाली घसरली.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817827201154158619
सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा जर्मन जोडी मार्क लॅम्सफस विरुद्धचा ग्रुप स्टेज सामना हा मार्क लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सामना रद्द करण्यात आला आहे. BWF च्या नियमांनुसार, जर्मन जोडीचे सर्व निकाल रद्द करण्यात आले आहेत.
India at Paris Olympic 2024 30 july Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ३० जुलैचे वेळापत्रक