2024 Paris Olympic Highlights Day 4: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवशी मंगळवारी (३० जुलै) मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यांनी कोरियन जोडीचा पराभव केला. ट्रॅप नेमबाज पृथ्वीराज तोंडइमान पुढल्या फेरीत जाऊ शकला नाही. भारतीय हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आयर्लंडचा २-० असा पराभव केला. अर्जेंटिनाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताला आयर्लंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिराग या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. परंतु आजचा सामना जिंकत ही जोडी क गटात अव्वल राहिली आहे. अमित पंघाल आणि जास्मिन यांना बॉक्सिंगमध्ये पराभव पत्करावा लागला. तर भारताची भजन कौर तिरंदाजीत राऊंड ऑफ १६मध्ये पोहोचली आहे.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Live Updates: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट्स

22:24 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : ३१ जुलैचं भारताचं वेळापत्रक

८.३० वाजता - टेबल टेनिस - महिला एकेरी (राऊंड ऑफ १६)

मनिका बत्रा

९.२८ वाजता - तिरंदाजी - पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ६४)

तरूणदीप रॉय

१०.०७ वाजता - तिरंदाजी पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ३२)

११.०० वाजता - बॅडमिंटन - पुरूष एकेरी

एच एस प्रणॉय

मध्यरात्री १२.३४ वाजता - ७१ किलो बॉक्सिंग पुरूष (राऊंड ऑफ १६)

निशांत देव

22:24 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भारताचे ३१ जुलैला कोणते सामने असणार?

१.४० वाजता - बॅडमिंटन पुरूष एकेरी (ग्रुप स्टेज)

लक्ष्य सेन

२.३० वाजता - टेबल टेनिस - महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

श्रीजा अकुला

३.५० वाजता - बॉक्सिंग महिला ७५ किलो (राऊंड ऑफ १६)

लोव्हलिना बोरगोहेन

३.५६ वाजता - तिरंदाजी महिला एकेरी (राऊंड ऑफ ६४)

दिपिका कुमारी

४.३५ वाजता - तिरंदाजी महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

पात्र ठरल्यास

७.०० वाजता नेमबाजी महिला ट्रॅप (अंतिम फेरी)

पात्र झाल्यास

22:23 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : ३१ जुलैचं वेळापत्रक

१२.३० वाजता - नेमबाजी पुरूष ५० मी राययफल ३ पोजिशन (पात्रता फेरी)

ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे

१२.३० वाजता - नेमबाजी महिला ट्रॅप (पात्रता फेरी, दिवस दुसरा)

राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग

१२.५० वाजता - बॅडमिंटन महिला एकेरी (ग्रुप स्टेज)

पीव्ही सिंधु

१.२४ वाजता - रोईंग पुरूष एकेरी (सेमीफायनल सी/डी)

बलराज पन्वर

१.३० वाजता - अश्वारोहण ड्रेसेज ग्रँड प्रीक्स (दिवस दुसरा)

अनुष अग्रवाला

21:50 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : जास्मिन लॅम्बोरियाच्या

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या भारताच्या जास्मि लम्बोरियाला फिलिपाईन्सच्या रौप्य पदक विजेती नेस्टी पेटेसिओ विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818320508708151807

21:29 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : जास्मिन लॅम्बोरियाच्या बॉक्सिंग सामन्याला सुरूवात

भारताच्या जास्मिन लॅम्बोरियाचा राऊंड ऑफ ३२ मधील बॉक्सिंग सामना फिलीपाईन्सच्या नेस्टी पेटेसिओ विरुद्ध होणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818313947331899525

19:40 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : अमित पंघाल पराभूत

अमित पंघालचा ५१ किलो गटात झांबियाच्या पॅट्रिक चिनयेम्बा विरूद्ध पराभव झाला आहे. या पराभवामुळे ऑलिम्पिक २०२४ मधून अमित बाहेर झाला आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818286418143130097

19:21 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : अमित पंघाल सज्ज

भारताच्या ५१ किलो गटातील बॉक्सिंग सामन्याला सुरूवात झाली. अमित पंघाल या सामन्यात झांबियाच्या पॅट्रिक चिनयेम्बा विरूद्ध लढत देत आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818279684808872039

19:09 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : सलग तिसरा पराभव

भारताच्या महिला बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रिस्टा यांना सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध जोडीकडून भारताचा १५-२१ आणि १०-२१ असा पराभव झाला.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818278531669078170

18:47 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भारताचा हॉकी संघ टेबल टॉपर

भारताच्या हॉकी संघाने झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन्ही सामने जिंकले आहेत आणि एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे संघाचे ७ गुण झाले आहेत. यासह टीम इंडिया हॉकी संघांच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. पुढील सामना जिंकताच टीम इंडिया क्वालिफाय होणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818272783371235666

18:33 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भारताता हॉकीमध्ये दुसरा विजय

भारताच्या हॉकी संघाने तिसऱ्या हॉकी सामन्यात २-० असा विजय मिळवला. भारताच्या कर्णधाराने हरमनप्रीतने सुरूवातीलाच दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताने शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818269477609599043

18:30 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भजन कौर पुढील फेरीत

भजन कौरने राऊंड ऑफ ३२ मध्ये सलग तिन्ही सेट जिंकत आपला दबदबा राखला. तिन्ही सेट जिंकत भजन राऊंड ऑफ १६ मध्ये भजनने धडक मारली आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818269142505656556

18:26 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : तिरंदाजीत राऊंड ऑफ ३२ मध्ये भजन कौरची चांगली सुरूवात

तिरंदाजीत राऊंड ऑफ ३२ मध्ये भजन कौरने चांगली सुरूवात करत दोन्ही सेट आपल्या नावे केले आहेत.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818268199051305360

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818267595214119368

18:19 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : सात्त्विक-चिरागने जिंकला सामना

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विकसाईराज आणि चिराग यांनी उत्कृष्ट खेळ दाखवत इंडोनेशियाच्या अल्फियान फजर आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांचा सलग दोन्ही सेट जिंकत पराभव केला. यासह क गटात ही भारतीय जोडी अव्वल स्थानावर आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सेटमध्ये २१-१३, २१-१३ अशा फरकाने विजय मिळवला आहे.

https://twitter.com/Sports18/status/1818264269739184541

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818266877778710669

18:06 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भजन कौर पुढील फेरीत

महिला तिरंदाजीमध्ये भजनने चांगली कामगिरी करत पुढील फेरी गाठली आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818263420833313054

17:25 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भारताने 2-0 अशी आघाडी घेतली

कर्णधार हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत गोल केला. अशा प्रकारे भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी वाढवली. हरमनप्रीतने 19व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818251298598207817

16:43 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: भारत वि आयर्लंड हॉकी सामन्याला सुरूवात

भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिक २०२४मधील तिसऱ्या हॉकी सामन्याला सुरूवात झाली आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतानंतर या सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताचा आयर्लंड संघाविरूद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. हॉकी संघाने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला सामना २-१ अशा फरकाने जिंकला. तर अर्जेंटिनाविरूद्धचा दुसरा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. सामन्याची १.४५ मिनिटे बाकी असताना कर्णधार हरमनने पेनल्टीवर गोल करत सामना बरोबरीत आणला.

14:33 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: पृथ्वीराज पुरूष ट्रॅप स्पर्धेचा दुसरा दिवस

पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत पृथ्वीराजने दुसऱ्या दिवशी शानदार सुरुवात केली. पहिल्या दिवशी तीन फेऱ्यांनंतर त्याचे ६८ गुण होते. तो ३० नेमबाजांपैकी ३०व्या क्रमांकावर होता. चौथ्या फेरीत त्याने सर्व शॉट पूर्ण केले आणि २५ गुणांची कमाई केली. त्याचे ९३ गुण आहेत. अजून दोन फेऱ्या बाकी आहेत.

14:28 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: महिला ट्रॅप नेमबाजीला सुरूवात

महिलांच्या ट्रॅप प्रकारात श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी पात्रता फेरीत खेळत आहेत. पहिल्या फेरीनंतर दोघांचे २२-२२ गुण आहेत. या फेरीत २५ वेळा लक्ष्य गाठावे लागते.

14:08 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकरने दोन पदके जिंकून इतिहास रचला

मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला. पीव्ही सिंधू आणि सुशील कुमार यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत पण ही दोन्ही पदके त्यांनी वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818195399921778988

14:01 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: भारताच्या दुसऱ्या पदक विजयानंतरचा भावुक क्षण

मनू भाकेर आणि सरबज्योत सिंगने १० मी एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकत भारताला यंदाचं दुसरं पदक जिंकून दिलं आहे. या विजयानंतर कोच आणि दोन्ही खेळाडूंना विजयाचा असा आनंद साजरा केला.

https://twitter.com/Sports18/status/1818201528005452191

13:20 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: भारताच्या खात्याल दुसरं ऑलिम्पिक पदक

मनू भाकेर आणि सरबजोतच्या जोडीने १० मी मिक्स्ड एअर पिस्तुलच्या जोडीने १६-१० च्या फरकाने कांस्यपदक पटकावलं आहे. मनू भाकेरने भारताला सलग दुसरं पॅरिस ऑलिम्पिक २०२४चं पदक मिळवून दिलं आहे. भारतीय संघाने पहिला सेट गमावला पण दुसऱ्या सेट पासून सातत्याने आघाडी मिळवली. भारतीय संघ ४ शॉट्सनंतर सातत्याने ६-२ च्या फरकाने पुढे होता. यानंतर कोरियाने एक सेट जिंकला. मनु भाकेर सुरूवातीपासूनच लक्ष केंद्रित करून खेळत होती. सरब पिछाडीवर पडल्यास मनू शानदार नेम साधायची आणि मनू मागे पडल्यास सरब शानदार नेम साधायचा. अशारितीने भारतीय जोडीने जबरदस्त कामगिरी करत हे पदक जिंकलं आहे. स्वतंत्र भारताला एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदकं जिंकून देणारी मनू भाकेर पहिला खेळाडू ठरली आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818192065123307641

13:17 (IST) 30 Jul 2024
Paris Olympic 2024 Live: १४-१०

भारतीय संघाला कांस्यपदक जिंकण्यासाठी एक सेट जिंकण्याची गरज

India at Olympic Games Paris 2024 31 July 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा चौथा दिवस भारताला अजून एक पदक मिळवून देणारा ठरला तर ३१ जुलै रोजी भारताचं वेळापत्रक कसं असणार आहे हे जाणून घ्या.