2024 Paris Olympic Day 5 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी म्हणजे ३१ जुलै २०२४ रोजी भारताच्या बऱ्याच खेळाडूंनी विजय मिळवत आनंदाची बातमी दिली. टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेन पॅरिसमध्ये पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान, दीपिका कुमारीनेही महिला तिरंदाजी रिकर्व्ह प्रकारात अंतिम १६ ची फेरी गाठली. तसेच टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून आपला वाढदिवस खास बनवला. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या एम गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर लक्ष्य सेनने शेवटच्या १६ मध्ये म्हणजे बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India at Paris Olympic 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पाचव्या दिवसाचे हायलाइट्स

13:30 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधूने पहिल्या फेरीत बाजी मारली

पीव्ही सिंधूने पहिल्या फेरीत बाजी मारली

पॅरिस ऑलिम्पिकमधील तिच्या दुसऱ्या गट सामन्यात पीव्ही सिंधूने पहिल्या फेरीत एस्टोनियाच्या कुबाला २१-५ असा विजय मिळवला.

13:27 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : सिंधूने पहिल्या ब्रेकमध्ये 12-2 अशी आघाडी घेतली

सिंधूने पहिल्या ब्रेकमध्ये 12-2 अशी आघाडी घेतली आहे. सिंधूने एस्टोनियाच्या कुबाला एकही संधी दिली नाही. सिंधू आता पहिला गेम सहज जिंकण्याचा प्रयत्न करेल. हा ग्रुप स्टेजचा सामना आहे. सिंधूला तयारीसाठी चांगली संधी आहे.

13:24 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नीलने रायफल थ्री पोझिशनमध्ये सहावे स्थानावर

पुरुषांच्या पात्रता फेरीत स्वप्नीलने रायफल थ्री पोझिशनमध्ये सहावे स्थानावर

पुरुषांच्या रायफल थ्री पोझिशन पुरुष पात्रता फेरीतील प्रोन पोझिशन संपल्यानंतर स्वप्नील सहाव्या स्थानावर आहे तर ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर 10 व्या स्थानावर आहे.

13:20 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधूचा सामना सुरु

पीव्ही सिंधूचा सामना सुरु

पीव्ही सिंधूचा सामना एस्टोनियाच्या क्रिस्टिना कुबासोबत सुरू आहे. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली आहे. सिंधूला हा सामना सहज जिंकायला आवडेल. सिंधू 10 व्या, तर कुबा 75 व्या मानांकित आहे.

13:17 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील 7 व्या आणि ऐश्वर्या 5 व्या स्थानावर पोहोचले

स्वप्नील 7 व्या आणि ऐश्वर्या 5 व्या स्थानावर पोहोचले

ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि स्वप्नील 50 मीटर रायफलच्या पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर आहेत. आता ते अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत.

13:06 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : महिला ट्रॅप पात्रता फेरी सुरू

महिला ट्रॅप पात्रता फेरी सुरू

भारताच्या वतीने राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंग पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या महिला ट्रॅप पात्रता फेरीत सहभागी होत आहेत.

13:00 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील कुसाळेने रायफल थ्री पोझिशन पुरुष पात्रता फेरीत 9वे स्थान पटकावले.

स्वप्नील कुसाळेने रायफल थ्री पोझिशन पुरुष पात्रता फेरीत 9वे स्थान पटकावले.

पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या पात्रता फेरीतील रायफल थ्री पोझिशनमधील पहिली मालिका संपवून स्वप्नील कुसळे ९९ गुणांसह ९व्या क्रमांकावर आहे. या पात्रतेमध्ये टॉप-8 मध्ये असणारे नेमबाज पदक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित करतील.

12:52 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : ऐश्वर्या आणि स्वप्नील ॲक्शनमध्ये

ऐश्वर्या आणि स्वप्नील ॲक्शनमध्ये

पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धा सुरू झाली आहे. भारताच्या ऐश्वर्या प्रताप सिंग आणि स्वप्नील कुसळे ॲक्शनमध्ये आहेत. या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये लक्ष्य ठेवावे लागते. या दोघांकडून पात्रतेत चांगली कामगिरी करून पुढील स्तरासाठी पात्र ठरण्याची अपेक्षा आहे.

12:48 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : भारतीय बॉक्सर्सनी केली निराशा

भारतीय बॉक्सर्सनी निराशा केली

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्सनी निराशा केली. अमित पंघाल आणि जास्मिन लांबोरिया यांच्यानंतर प्रीती पवारही उपउपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडली. 54 किलो वजनी गटात प्रितीला पराभवाचा सामना करावा लागला. तिला कोलंबियाच्या येनी मार्सेलाने पराभूत केले. यापूर्वी अमित पंघालने 51 किलो गटामध्ये आणि जस्मिन फिलिपिन्सने 57 किलो गटामध्ये पराभूत केले होते.

12:43 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : अतिउष्णतेमुळे खेळाडू त्रस्त

अतिउष्णतेमुळे खेळाडू त्रस्त

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात मुसळधार पाऊस आणि थंड तापमान होते, तर शनिवारी पावसामुळे काही कार्यक्रम विस्कळीत झाले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. जर्मन हॉकीपटू क्रिस्टोफर रुहरला हा बदल जाणवला. तो म्हणाला- “आधीच्या दिवसांपासून पाऊस पडत होता आणि तापमान 20 अंश होते तेव्हा खूप मोठा बदल झाला होता. पण सगळ्यांनाच सामना करावा लागतो, आणि आता आम्ही बर्फाची आंघोळ करणार आहोत. आमच्याकडे बर्फाचे बनियान आणि बर्फाचे टॉवेल आहेत.”

12:39 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : पाचव्या दिवसाच संपूर्ण वेळाापत्रक

१२.३० वाजता – नेमबाजी पुरूष ५० मी राययफल ३ पोजिशन (पात्रता फेरी)

ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे

१२.३० वाजता – नेमबाजी महिला ट्रॅप (पात्रता फेरी, दिवस दुसरा)

राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग

१२.५० वाजता – बॅडमिंटन महिला एकेरी (ग्रुप स्टेज)

पीव्ही सिंधु

१.२४ वाजता – रोईंग पुरूष एकेरी (सेमीफायनल सी/डी)

बलराज पन्वर

१.३० वाजता – अश्वारोहण ड्रेसेज ग्रँड प्रीक्स (दिवस दुसरा)

अनुष अग्रवाला

१.४० वाजता – बॅडमिंटन पुरूष एकेरी (ग्रुप स्टेज)

लक्ष्य सेन

२.३० वाजता – टेबल टेनिस – महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

श्रीजा अकुला

३.५० वाजता – बॉक्सिंग महिला ७५ किलो (राऊंड ऑफ १६)

लोव्हलिना बोरगोहेन

३.५६ वाजता – तिरंदाजी महिला एकेरी (राऊंड ऑफ ६४)

दिपिका कुमारी

४.३५ वाजता – तिरंदाजी महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

पात्र ठरल्यास

७.०० वाजता नेमबाजी महिला ट्रॅप (अंतिम फेरी)

पात्र झाल्यास

८.३० वाजता – टेबल टेनिस – महिला एकेरी (राऊंड ऑफ १६)

मनिका बत्रा

९.२८ वाजता – तिरंदाजी – पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ६४)

तरूणदीप रॉय

१०.०७ वाजता – तिरंदाजी पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ३२)

११.०० वाजता – बॅडमिंटन – पुरूष एकेरी

एच एस प्रणॉय

मध्यरात्री १२.३४ वाजता – ७१ किलो बॉक्सिंग पुरूष (राऊंड ऑफ १६)

निशांत देव

India at Olympic Games Paris 2024 31 July 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा पाचवा दिवस भारतासाठी खास राहिला. बऱ्याच सामन्यात भारतीय खेळाडूने विजय मिळवत पुढची फेरी गाठली.